सीआरपीएफ शौर्य दिवस म्हणजे काय? याचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे | CRPF Valour day in Marathi

CRPF Valour day in Marathi

आज ९ एप्रिल २०२३ म्हणजेच सीआरपीएफ शौर्य दिवस आहे. ९ एप्रिल १९६५ पासुन केंद्रीय पोलिस बलात हा शौर्य दिवस साजरा केला जात आहे.

असे सांगितले जाते की ९ एप्रिल रोजी गुजरात येथे कच्छ येथील रणभुमीत सरदार पोस्ट वर पाकिस्तानी सैन्याने अचानक हल्लाबोल केला होता.

पण भारतातील सीआरपीएफच्या दोन तुकडीने पाकिस्तानी सैन्याचे हे मनसुबे उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांना अयशस्वी ठरवले.

अचानक हल्ला करणारया पाकिस्तानी सैन्याची संख्या अधिक असताना देखील भारतीय सैन्य बलाने मोठया धैर्याने धाडस अणि शौर्याचे प्रदर्शन करीत दाखवत पाकिस्तानी सैन्यासोबत रणांगणावर संघर्ष केला.

CRPF Valour day in Marathi
CRPF Valour day in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार

ह्या लढाई मध्ये भारतीय सीआरपीएफच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्यातील तब्बल ३४ सैनिकांना धारातीर्थी पाडले.म्हणजे मृत्युमुखी पाठविण्यात यश प्राप्त केले.अणि चार पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडण्यात भारतीय सीआरपीएफच्या जवानांना यश आले होते.

ह्या युदधात चिमुटभर म्हणजेच मोजकीच संख्या असलेल्या भारतीय सीआरपीएफच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याला मुॅहतोड उत्तर देत रणांगणातुन पळवून लावले.

पण ह्या युदधा दरम्यान जसे पाकिस्तानी ३४ सैनिक मारले गेले तसे भारतातील देखील काही ६ ते ७ सैनिक आपल्या शौर्याच्या प्रदर्शन करताना देशासाठी लढता लढता शहीद झाले.

सीआरपीएफच्या वीर जवानांच्या ह्याच शौर्य गाथेला सीआरपीएफच्या शौर्य दिनाच्या नावाने संबोधित करण्यात आले.

तेव्हा पासुन दरवर्षी हा दिवस सीआरपीएफ central reserve police force मधील शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

सैन्य लढाईतील हा पहिला दिवस होता ज्यात सीआरपीएफच्या एका छोट्याशा तुकडीने पाकिस्तानच्या विशाल सैन्यासोबत रणांगणावर लढाई केली अणि त्यांना पराभुत देखील केले.

CRPF Valour day in Marathi

वेकोम सत्याग्रह म्हणजे काय? हा सत्याग्रह कशासाठी करण्यात आला होता? 

म्हणुन सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या ह्या धाडसाबददल,दाखवलेल्या अफाट शौर्याबददल कौतुक करण्यासाठी तसेच ह्या युदधात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी ९ एप्रिल रोजी सीआरपीएफ शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

सीआरपीएफची स्थापणा ही २७ जुलै १९३९ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय भारतात नवी दिल्ली ह्या शहरात आहे.

दरवर्षी २७ जुलैला सीआरपीएफचा स्थापणा दिवस साजरा केला जातो.सीआरपीएफचे आदर्श वाक्य सेवा अणि प्रामाणिकपणा हे आहे.

सीआरपीएफचे वर्तमान काळातील महानिर्देशक कुलदीप सिंह हे आहेत.

सीआरपीएफ शौर्य दिवस संपुर्ण भारतात ९ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हया वर्षी २०२३ मध्ये सीआरपीएफचा ५८ वा सीआरपीएफ शौर्य दिवस साजरा केला जाणार आहे.

CRPF Valour day in Marathi