वेकोम सत्याग्रह म्हणजे काय?हा सत्याग्रह कशासाठी करण्यात आला होता?
नुकतेच केरळचे तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी वेकोम सत्याग्रहाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन केले आहे.
आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडला असेल की हा वेकोम सत्याग्रह काय आहे अणि हा का करण्यात आला होता.
आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी आज आपण थोडक्यात ह्या सत्याग्रहा विषयी माहिती जाणून घेऊया.
केरळ मध्ये अस्पृश्यतेच्या एका वाईट प्रथेविरूदध आवाज उठविण्यासाठी वेकोम सत्याग्रह हा १९२४-१९२५ मध्ये सुरू करण्यात आला होता.
ह्या सत्याग्रहाचे मुख्य उद्दिष्ट हे त्रावणकोर मधल्या मंदिराजवळच्या रस्त्यांचा वापर हा तेथील अस्पृश्य जातीच्या लोकांना देखील करण्यास परवानगी प्राप्त करून देणे.हा सत्याग्रह अहिंसक मार्गाने खालच्या जातीतील अस्पृश्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी केला गेला होता.
त्रावणकोर मधल्या वेकोम ह्या गावात हिंदु मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात यावा तसेच तेथील सार्वजनिक रस्त्यांवर अस्पृश्यांना देखील फिरण्याचा ह्या रस्त्यांचा वापर करण्याचा हक्क देण्यात यावा यासाठी हे आंदोलन ही चळवळ सुरू करण्यात आली होती.
त्याकाळी केरळ राज्यात उच्च नीच्च जाती भेदाची अस्पृश्यतेची मुळे ही फार खोलवर रूजलेली होती.येथील अवर्णांना म्हणजेच एझावा अणि पुलैय्या ह्या खालच्या जातीतील लोकांना सवर्णांपासुन १५ फुट इतके अंतर हया वाईट प्रथेमुळे राखावे लागत होते.
पुढे जाऊन १९ व्या शतकात जेव्हा नारायण गुरू,एन कुमारन,टीके माधव असे विचारवंत केरळ राज्यात उदयास आले तेव्हा ह्या विचारवंतांकडुन ह्या वाईट प्रथे विरूद्ध आवाज उठविण्यात आला होता.
येथील खालच्या जातीतील अस्पृश्य लोकांना देखील हिंदु मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी एक आंदोलन करण्यात आले ह्या आंदोलनाचे नेतृत्व केपी केशव मेनन,के केलापण,टीके माधवन यांनी केले होते.
३० मार्च १९२४ मध्ये केरळ राज्यात काॅग्रेसच्या एका गटाने तसेच समुहाने वेकोम ह्या गावातील हिंदु मंदिरात प्रवेश केला ह्या समुहामध्ये सवर्ण अणि अवर्ण दोन्ही गटातील व्यक्ती समाविष्ट होते.
हिंदु मंदिरात अवर्ण म्हणजेच खालच्या जातीतील लोकांनी प्रवेश केला हे तेथील सवर्ण वर्गाला कळाले ज्याला ब्राहमण तसेच इतर सर्व उच्च वर्णियांनी कडाडुन विरोध देखील केला होता.
यानंतर मंदिरात अवर्णानी प्रवेश करू नये यासाठी मंदिराच्या गेटाला कुलूप लावण्यात आले मंदिरात कोणी अवर्णांनी आपल्या अनुपस्थित प्रवेश करू नये म्हणून मंदिरात बॅरिकेटस देखील बसवण्यात आले.
पण ३० मार्च १९२४ रोजी एकेदिवशी केपी केशव यांच्या नेतृत्वाखालील सर्व सत्याग्रहींनी मंदिराच्या पुजारी तसेच येथील शासनाने मंदिराच्या गेटाला लावलेले कुलुप बॅरिकेटस तोडले अणि मंदिरात प्रवेश केला.
यानंतर सर्व सत्याग्रहींना अटक देखील करण्यात आली होती ह्या सत्याग्रहाविषयी जागोजागी वार्ता पसरली अणि जगभरातील स्वयंसेवक इथे वायकोम मध्ये येऊ लागले.
यानंतर मार्च 1925 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली त्रावणकोरच्या राणीच्या मंदिरात प्रवेश करण्याबाबत आंदोलकांशी एक करार करण्यात आला होता.