सुरक्षेसाठी सलमान खानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही परदेशातुन मागवली – Salman Khan gets bulletproof Nissan Patrol SUV for safety in Marathi

सुरक्षेसाठी सलमान खानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही परदेशातुन मागवली – Salman Khan gets bulletproof Nissan Patrol SUV for safety in Marathi

Salman Khan gets bulletproof Nissan Patrol SUV
Salman Khan gets bulletproof Nissan Patrol SUV

मागील काही दिवसांपासून सलमान खान याला जिवे मारण्याच्या सतत धमक्या येत असल्याने सलमान खान याने आपल्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

सलमानने आता एक नवीन अत्यंत महागडी बुलेटप्रुफ कार विकत घेतली आहे.ही कार सलमान खान याने परदेशातुन आयात केली आहे.

ही एक अशी कार आहे जिच्यावर कोणी बंदुकीने गोळ्या झाडल्या तरी देखील आतल्या व्यक्तीला काही होणार नाही.

हे पाऊल सलमान याने प्रवासादरम्यान अचानक गुंडांनी आपल्या कारवर गोळी दरबार केल्यावर आपल्या जिवीतास धोका पोहोचू नये म्हणून उचलले आहे.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही बुलेटप्रुफ कार अद्याप भारतात मार्केट मध्ये कुठेही लॉन्च देखील झाली नाहीये.भारतात ही कार वापरणारा सलमान पहिला व्यक्ती बनला आहे.

याआधी देखील सलमानने अनेक कार खरेदी केल्याचे सांगितले जात आहे ही एक नवीन कार आता त्याच्या कार कलेक्शन मधील ताफ्यात जमा झाली आहे.

सलमानच्या ह्या नवीन महागड्या अलिशान कारचे फोटो जागोजागी सोशल मिडिया वर व्हायरल होत आहेत.

निसान पेट्रोल एसयुव्ही काय आहे

सलमानने विकत घेतलेल्या ह्या नवीन बुलेट प्रुफ कारचे नाव निसान पेट्रोल एसयूव्ही असे आहे.हया कारचा रंग सफेद आहे.एका जपानी कंपनी कडुन ही कार बनवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

ही एक बुलेटप्रुफ कार आहे.जिच्यावर गोळ्या झाडल्या तरी आत बसलेल्या व्यक्तीला ती गोळी लागणार नाही.

असे सांगितले जाते आहे की सलमान खान याने विकत घेतलेली ही कार मध्य पुर्व तसेच दक्षिण आशियाई देशात फार लोकप्रिय कार म्हणून प्रचलित आहे.बुलेटप्रुफिंगसाठी म्हणजे सुरक्षेसाठी इथे ह्या कारला खुप मागणी आहे.

See also  चालु घडामोडी मराठी - 15 मे 2022 Current affairs in Marathi

निसान पेट्रोल एसयुव्ही कारची किंमत काय आहे?

निसान पेट्रोल एसयुव्ही कारची भारतीय बाजारपेठेतील अंदाजे किंमत १ करोडच्या आसपास आहे.

निसान पेट्रोल एसयुव्ही कारची इतर वैशिष्ट्य कोणती आहेत?

निसान पेट्रोल एसयुव्ही ह्या कार मध्ये ५.७ लीटर व्ही ८ पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे.हे ४०६ एचपी पाॅवर तसेच ४६० नॅनो मीटर इतका टाॅर्क जनरेट करते असे ह्या कारविषयी सांगितले जात आहे.

टोयोटा कंपनीच्या फाॅरचयुन कारपेक्षा दुप्पट ताकद निर्माण करण्यास ही कार सक्षम आहे.

ह्या कारमध्ये फोर व्हील ड्राईव्ह ७ स्पीड आॅटोमॅटिक गेअरबाॅक्स सोबत रिअल लाॅकिंग डिफरनशिअल सिस्टमची सुविधा देण्यात आली आहे.