हक्क दर्शक ॲप विषयी माहिती – Haqdarshak App Information in Marathi

हक्क दर्शक ॲप -HAQDARSHAK APP INFORMATION IN MARATHI

हक्क दर्शक काय आहे?

हक्क दर्शक हा विविध सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या त्याकरीता लाभार्थी ठरत असलेल्या गावखेडयातील ग्रामीण भागातील लोकांसाठी राबविण्यात आलेला एक प्रकल्प तसेच उपक्रम आहे.

Haqdarshak APP Information in Marathi
Haqdarshak APP Information in Marathi

हक्क दर्शक हे एक असे आॅनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे आपणास सर्व प्रकारच्या शासकीय योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

आपल्या भारत देशातील एकूण लोकसंख्या ही १५० करोड इतकी आहे ज्यात ९० करोड इतके लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत.

अशा आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकार कडुन आतापर्यंत तेरा हजार पेक्षा अधिक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

शासनाने ह्या सर्व योजना आर्थिक दारिद्र्य दुर करण्यासाठी राबवलेल्या आहेत.पण ह्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक गरीब व्यक्तीला मिळतोच असे नाही कारण आपण कोणत्या योजनेसाठी पात्र ठरतो हेच बरयाच नागरीकांना माहीत नसते.

ह्या समस्येला दुर करण्यासाठी अनिकेत डोंगर नावाच्या एका व्यक्तीने एक स्टार्ट अप प्रोजेक्ट सुरू केला आहे आहे.हया प्रोजेक्ट करीता अनिकेत डोंगर यांना शार्क टॅक सिजन टु मध्ये ह्या प्रोजेक्ट करीता फंडिंग देखील देण्यात आली आहे.

अनिकेत डोंगर एक असे ॲप बनवले आहे.जिथे नागरिकांना शासनाने सुरू केलेल्या विविध सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

सर्व लाभार्थींना शासकीय योजनेपर्यत पोहचवण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे असे ह्या ॲपच्या को फाऊंडर तसेच सीईओ अनिकेत डोंगर यांनी सांगितले आहे.

हक्क दर्शक हे ॲप वापरायचे कसे?

  1. हे ॲप वापरण्याची पद्धत देखील अगदी सोपी आहे.सर्वात आधी आपणास ही ॲप प्ले स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करायची आहे. -https://play.google.com/store/apps/details?id=com.haqdarshak.jana&hl=en_IN&gl=US
  2. मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करून झाल्यावर ॲप ओपन करून घ्यायचे आहे.
  3. ॲप ओपन केल्यावर आपणास आपले राज्य जे आहे ते दिलेल्या राज्यांच्या यादीतुन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.समजा आपले राज्य महाराष्ट्र आहे तर आपणास महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
  4. यानंतर आपणास आपली भाषा निवडायची आहे.इथे दोन आॅप्शन देण्यात आले आहेत मराठी अणि इंग्रजी आपणास इंग्रजी समजत नसेल तर आपण मराठी देखील सिलेक्ट करू शकता.
  5. यानंतर आपणास आपला जिल्हा निवडायचा आहे.इथे एकुण ३८ जिल्हे देण्यात आले आहेत.आपण ज्या जिल्ह्यात वास्तव्यास असाल तो जिल्हा आपणास इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
  6. हे सर्व करून झाल्यावर आपणास आपली नोंदणी करण्यासाठी काही माहीती भरावी लागणार आहे.
  7. आपले नाव -आपले नाव मग आडनाव टाकायचे
  8. आपला मोबाईल नंबर टाकायचा
  9. आपले लिंग -आपण स्त्री आहे की पुरुष का इतर गटातील आहेत हे द्यायचे
  10. आपले सध्याचे वय किती आहे ते टाकायचे
  11. आपला पिन कोड -आपण राहतो त्या एरियाचा पिनकोड टाकायचा आहे.
  12. आपण व्यवसाय करत असाल तर होय करायचे व्यवसाय करत नसाल तर नाही वर क्लिक करायचे आहे.
  13. वरील सर्व माहिती भरून झाल्यावर खालील दिलेल्या SIGN UP ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.
  14. यानंतर आपल्या माहीतीत भरलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठविला जाईल हा ओटीपी आपणास इथे जसाच्या तसा इंटर करायचा आहे.
  15. यानंतर जे व्यक्ती व्यवसाय करीत आहे त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या शासनाने सुरू केलेल्या नवनवीन स्कीम येथे पाहायला मिळतात SCHEME FOR YOUR BUSINESS मध्ये
  16. SCHEME FOR YOUR FAMILY मध्ये आपणास घरातील कुटुंबातील व्यक्तींसाठी असलेल्या योजना पाहायला मिळणार आहे.
  17. आपण आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार तसेच वयानुसार कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत हे कसे चेक करायचे?
  18. आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत शैक्षणिक अहर्तेनुसार वयानुसार हे चेक करण्यासाठी आपणास वर दिलेल्या CHECK ELIGIBILITY ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
  19. यानंतर आपणास आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत हे सांगण्यासाठी काही माहीती विचारली जाईल यात आपणास इलिजीबिलीटी ही स्वतासाठी देखील चेक करता येईल तसेच आपले आई, वडील,आजोबा, बहिण,भाऊ इत्यादींकरीता देखील चेक करता येणार आहे.
  20. आता आपणास CHECK ELIGIBILITY मध्ये ज्याच्यासाठी चेक करत आहोत त्याला सिलेक्ट करायचे आहे.
  21. यात आपणास आपण ज्याची इलिजीबिलीटी चेक करतो आहे त्याचे नाव,लिंग,वय टाकावे लागेल.
  22. यानंतर SCHEME CATEGORY सिलेक्ट करून घ्यायची आहे.इथे आपणास PENSION,HEALTH, EDUCATION असे अनेक पर्याय दिसुन येतील यात आपणास हवी असलेली कुठलीही एक कॅटॅगरी निवडू शकतो किंवा आॅल देखील सिलेक्ट करू शकता.
  23. WHAT IS YOUR OCCUPATION STATUS मध्ये आपणास आपण (ज्याची इलिजीबिलीटी चेक केली जात आहे)तो सध्या काय करीत आहे हे टाकायचे आहे.आपण नोकरी करता आहात व्यवसाय करता आहात किंवा बेरोजगार आहात विद्यार्थी आहात निवृत्त कर्मचारी आहात ड्राॅप आऊट विद्यार्थी आहात हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
  24. DO YOU HAVING ADHAR CARD मध्ये आपल्याकडे आधार कार्ड असेल तर यस करायचे किंवा नो करायचे आहे.
  25. DO YOU HAVE DISABILITY तुम्ही अपंग आहात का हे इथे होय किंवा नाही म्हणुन सांगायचे आहे.
  26. MARRIED STATUS मध्ये हे टाकायचे आहे आपण विवाहित आहे किंवा अविवाहित
  27. DO YOU HAVE BANK ACCOUNT मध्ये आपले बॅकेत खाते ओपन असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचे.
  28. MAXIMUM LEVEL OF EDUCATION ACHIEVED कितवी पर्यंत आपण जास्तीत जास्त शिक्षण घेतले आहे किंवा कितवीत शिकत आहात हे सिलेक्ट करायचे आहे.
  29. HAVE YOU DEFAULT ANY BANK LOAN मध्ये आपण बॅकेकडुन याआधी लोन घेतलेले असेल तर यस करायचे नसेल घेतले तर नो करायचे आहे
  30. ANY RECENT DEATH IN FAMILY LAST YEAR नुकतेच आपल्या कुटुंबातील कोणी वारले असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचे आहे.
  31. ARE YOU COVERED PM SURAKSHA YOJNA आपण पीएम सुरक्षा योजना मध्ये येत असाल तर यस करा नाहीतर नो करा.
  32. DO YOU HAVE ANY HEALTH INSURANCE आपण हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असेल तर हो करायच नाहीतर नाही करायचे
  33. आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे का लिंक असेल तर हो करायचे नाहीतर नाही करायचे.
  34. FAMILY MONTHLY INCOME किती आहे ते टाकायचे आहे.
  35. RATION CARD TYPE रेशन कार्ड आपल्याकडे कोणत्या प्रकारचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे.
  36. DO YOU HAVE GAS CONNECTION आपण गॅस कनेक्शन घेतले असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचे
  37. आपले बॅक अकाऊंट आधार कार्ड सोबत लिंक आहे का होय किंवा नाही करून सांगायचे आहे.
  38. यानंतर आपल्यासमोर हे दाखविले जाईल की आपण तसेच ज्याची इलिजीबिलीटी आपण चेक केली आहे ती व्यक्ती एकुण किती योजनांसाठी पात्र आहे.
  39. यानंतर आपणास आपण पात्र असलेल्या सर्व योजनांची यादी देखील दाखवली जाते यात दिलेल्या प्रत्येक योजनेवर क्लिक करून आपण त्याची माहिती प्राप्त करू शकतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक पात्रतेच्या वयाच्या अटी काय दिल्या आहेत हे बघू शकतो.
  40. यानंतर PROCEED वर क्लिक करून यासाठी अर्ज कसा करायचा हे देखील बघता येणार आहे.
  41. अशा पद्धतीने इत्यादी विचारण्यात आलेली सर्व माहिती नीट व्यवस्थित भरून झाल्यावर आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहे हे आपणास सांगितले जाते.अणि कोणत्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपणास कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे देखील आपणास इथे सांगितले जाते.
  42. यानंतर आपण ज्या योजनेसाठी पात्र असु त्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.
See also  ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे काय?-Global hunger index meaning in Marathi

हक्क दर्शक ॲपचा मुख्य हेतु काय आहे?

शासनाकडुन भारतीय गरीब जनतेसाठी जसे की वृद्ध पेंशनर घरगृहिणी विद्यार्थी इत्यादी गरजु लोकांसाठी ज्या विविध सरकारी योजना सुरू केल्या जात असतात.हया सर्व योजनांविषयी माहीती देण्याचे काम हे ॲप करते.कोणत्या योजनेसाठी आपण पात्र आहे कोणत्या योजनेसाठी नाही यासाठी काय कागदपत्र आपणास लागणार आहे हे इथे आपणास ह्या ॲपच्या माध्यमातून सांगितले जाते.

हक्क दर्शक ॲपचे फायदे –

ह्या ॲपच्या माध्यमातून वृदध पेंशनर,विद्यार्थी,घरगृहिणी इत्यादी सर्व जण आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार वयानुसार आपण पात्र आहोत अशा सरकारने सुरू केलेल्या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकणार आहे.

वृदध तसेच पेंशनर्स साठी सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे हे आपणास कळविले जाते.हया योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कोणते कागदपत्र लागणार हे सर्व आपणास इथे सांगितले जाते.

विद्यार्थ्यांकरीता कोणती नवीन स्काॅलरशिप तसेच स्कीम सुरू शासनाकडुन सुरू करण्यात आली आहे हे देखील आपणास कळविले जाते.हया योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कोणते कागदपत्र लागणार आहेत हे कळविण्यात येते.

महिला विधवा घरगृहिणी यांच्यासाठी सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे हे देखील आपणास इथे कळविण्यात येईल ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काय कागदपत्र लागणार हे देखील इथे सांगितले आहे.

एकंदरीत पाहता सर्व महिला पुरुष विद्यार्थी वर्गासाठी ही ॲप फायदेशीर ठरणार आहे.हया योजनेद्वारे आपणास केंद्र अणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन योजनांविषयी माहीती प्राप्त होणार आहे.