आयटीआर फाईल करण्याचे फायदे – ITR filing benefits in Marathi
आयटीआर फाईल करण्याचे आपणास अनेक फायदे होत असतात आजच्या लेखात आपण हेच फायदे जाणून घेणार आहोत.
१)बॅकेकडुन वित्तीय संस्थेकडुन लोन मिळण्यास सोपे जाते –
आयटीआर फाईल करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आयटीआर फाईल केल्याने आपणास कुठल्याही बॅक वित्तीय संस्थे कडुन लोन प्राप्त करता येत असते.
हे कर्ज आपण आपल्या घर,कार, जमीन उद्योग व्यवसाय, इत्यादी करीता प्राप्त करू शकतो.
दरवर्षी आयटीआर फाईल केल्याने आपणास आयकर विवरणाची एक प्रत दिली जात असते.
ही प्रत आपण कर्ज देत असलेल्या विशिष्ट बॅक वित्तीय संस्था कंपन्या यांना आपल्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून दाखवू शकतो.जेणेकरून त्या आपणास आपल्या घरावर कारवर किंवा जमीन व्यवसाय इत्यादी वर कर्ज उपलब्ध करून देतील.
ह्या सुविधेचा लाभ विशेषत असे व्यक्ती घेऊ शकतात जे कुठलीही नोकरी करत नाहीये पण त्यांना आपल्या एखाद्या मालमतेवर कर्ज काढायचे आहे.
२) अपघाती मृत्यूच्या भरपाईसाठी अधिक फायदेशीर –
समजा आपण विमा कंपनीकडे विमा काढला आहे अणि अचानक विमा काढल्यानंतर आपला एखाद्या रस्ते अपघातात मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना विम्याची रक्कम आर्थिक साहाय्य म्हणुन प्रदान करण्यासाठी विमा कंपनी एक ठाराविक रक्कम निश्चित करते ही रक्कम आपल्या उत्पन्नानुसार ठरविली जात असते.
अशावेळी आपल्या उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आपले कुटुंब आपली आयटीआरची प्रत दाखवू शकते.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर आयटीआरची प्रत याने आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपल्या मृत्युनंतर आपल्या विम्याच्या रक्कमेसाठी दावा करता येतो.
३) परदेशात जाण्यासाठी व्हिजा प्राप्त करायला देखील उपयुक्त –
ज्या व्यक्तींना अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देशामध्ये म्हणजे परदेशात जायचे आहे त्या़ंना पासपोर्ट व्हिजा काढण्याची अत्यंत आवश्यकता असते.
पण अमेरिका सारख्या देशात व्हिजा जारी करण्याअगोदर आपल्या आयटीआर रिटर्नची प्रत मागितली जाते.जेणेकरून त्या देशाला हे जाणुन घेता येईल की आपल्या देशात प्रवेश करत असलेल्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती फायनानशिअल स्टेटस काय आहे?
४) सरकारी खात्याकडुन कंत्राट प्राप्त करण्यासाठी देखील आवश्यक –
ज्या व्यक्तींना एखाद्या सरकारी खात्याकडुन काॅनट्रॅक्ट घेऊन एखादा उद्योग व्यवसाय करायचा आहे.त्या व्यक्तींना आयटीआर फाईल करणे गरजेचे असते.
किमान पाच वर्षे इतका आयटीआर फाईल केल्याने सरकारी खात्यात काॅनट्रॅक्ट घेऊन आपणास उद्योग व्यवसाय सुरू करता येत असतो.
५) मोठमोठ्या विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरते –
जेव्हा आपणास १ कोटी पेक्षा अधिक जास्त किंमतीची एखादी विमा पॉलिसीची खरेदी करावयाची असते तेव्हा विमा कंपनीकडुन आपली आयटीआर फाईलिंगची प्रत विचारली जात असते.
आपण एवढ्या मोठ्या रक्कमेचा विमा खरेदी करण्यासाठी खरोखर पात्र आहे किंवा नाही हे ठरवायला तसेच जाणुन घ्यायला विमा कंपनी कडुन ही आयटीआर फाईलिंगची प्रत मागितली जाते.
६) आयकर परतावा प्राप्त होतो –
अनेक परिस्थितीत पगारदार व्यक्तीचे इन्कम आयकर विभागाच्या कक्षेत येत नसताना देखील त्याचा टीडीएस कट केला जात असतो अशावेळी त्या पगारदार व्यक्तीला परतावा पुन्हा प्राप्त करायला आयटीआर रिटर्न भरावा लागत असतो.
म्हणजेच याने आपल्याला कर परतावा प्राप्त करण्यासाठी दावा करण्यास साहाय्य होते.आपला केलेल्या दाव्यावर आयकर विभागाकडुन मुल्यांकन केले जाते.यात आपला परतावा निघतो आहे का हे बघितले जाते समजा आपला परतावा निघत असेल तर ही परताव्याची रक्कम आपणास आपल्या नोंदणीकृत खात्यावर हस्तांतरित करण्यात येत असते.
७) नुकसानीचा दावा करता येतो –
जे वैयक्तिक कर भरणारे आहेत त्यांना जेव्हा एखाद्या व्यवसाय उद्योगातील विशिष्ट नुकसानीचा दावा करायचा असतो तेव्हा त्याला देय तारखेच्या आत आयटीआर रिटर्न फाईल करणे आवश्यक असते.
८) शेअर मार्केट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी उपयुक्त –
जे व्यक्ती शेअर मार्केट म्युच्युअल फंड मध्ये नियमित गुंतवणूक करत असतात अशा गुंतवणुकदारांसाठी हे आयटीआर रिटर्न फाईलिंग हे एक चांगले साधन ठरते.
समजा आपल्याला वाटते आहे की गुंतवणुकीत आपल्याला तोटा होण्याची शक्यता आहे तर अशा परिस्थितीत आपणास वेळेवर आयटीआर भरून हे नुकसान पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करता येते.
अणि मग पुढच्या वर्षी नफा प्राप्त झाला की आपण मागच्या वर्षीची तोट्याची रक्कम कॅरी फॉरवर्ड करता येणार असते.
याने आपणास हा फायदा होतो की याने आपल्याला कर सवलत प्राप्त होत असते.