संत कबीर यांच्याविषयी माहीती- Sant Lord Kabir Information In Marathi

संत कबीर यांच्याविषयी माहीती– Sant Lord Kabir Information In Marathi

 आतापर्यत आपल्या भारतभुमीत अनेक संत तसेच महात्मा होऊन गेले.यांच्यातीलच एक महान विचारांचे व्यक्ती संत कबीर हे देखील होऊन गेले.

संत कबीर हे एक महान संत तर होतेच याचसोबत ते एक कवी आणि समाजसुधारक देखील होते.संत कबीर यांना आज उत्तर भारतातील एक थोर संत म्हणुन ओळखले जाते.

आजच्या लेखात आपण ह्याच महान संत संत कबीर यांच्याविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया संत कबीर यांच्याविषयी अधिक सविस्तरपणे.

संत कबीर यांची जयंती,प्रकट दिन 2022 मध्ये कधी आहे?

संत कबीर यांची जयंती तसेच प्रकट दिन 2022 मध्ये 14 जुन रोजी मंगळवारी आहे.

असे म्हटले जाते ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काशी बनारस येथील लहरतारा नावाच्या एका तलावात एका कमळाचे फूलावर एक तेजस्वी प्रकाशात संत कबीर हे प्रकट झाले होते.

संत कबीर कोण होते?

 संत कबीर हे एक पुरोगामी विचारांचे संत कवी तसेच एक थोर समाजसुधारक होते.ज्यांनी समाजाला आपल्या विचारातुन अनेक महान शिकवणी दिल्या.

संत कबीर यांचे पूर्ण नाव काय होते?

संत कबीर यांचे पुर्ण नाव संत कबीरदास असे होते.

See also  ज्यांचा मोबाईल नंबर पोस्ट खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यातील व्यवहार आता बंद केले जाणार - Post office update 2023 link mobile number with post office account in Marathi

 संत कबीर यांचा जन्म कोठे आणि कधी झाला?

संत कबीर यांचा जन्म झाला नव्हता तर ते इसवी सन 1149 ते 1398 मध्ये काशी बनारस येथील लहरतारा ताल ह्या तलावामध्ये एका दिव्य प्रकाशात प्रकट झाले होते.

पण संत कबीर यांचा जन्म नेमका कधी झाला होता याविषयी अनेक जणांच्या मतामध्ये मतभेद आहेत.

म्हणुनच कोणी असे गृहीत धरते की संत कबीर यांचा जन्म प्रकट दिन इसवी सन 1149 आहे तर कोणी असे देखील मानते की त्यांचा प्रकटदिन 1398 आहे.

संत कबीर यांचा मृत्यु कधी आणि कुठे झाला होता?

संत कबीर यांचा 1518 मध्ये मृत्यु झाला नव्हता तर ते मगहर येथुन सशरीर सतलोकात गमन झाले होते ज्याचे साक्षीदार तेथील अष्टानंद त्रषी आहेत.

संत कबीर यांच्या आईचे नाव काय होते?

संत कबीर हे निमा आणि निरू या दोघांना लहरतारा तलावात सापडले होते.तेव्हा निमा आणि निरू हे आपल्यासोबत संत कबीर यांना घेऊन गेले त्यांनीच संत कबीर यांचे पालनपोषण केले म्हणुन यांच्या आईचे नाव निमा असे होते.

संत कबीर यांच्या वडिलांचे नाव काय होते?

संत कबीर यांच्या वडीलांचे नाव निरू असे होते.

संत कबीर यांच्या पत्नीचे नाव काय होते?

 संत कबीर यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते.पण काही इतिहासकार याबाबद असे देखील म्हणतात की संत कबीर यांचा विवाह झाला नव्हता आणि कमाल आणि कमाली हे त्यांचे दत्तक पुत्र होते.

संत कबीर यांना किती अपत्ये होती?

संत कबीर यांना एकुण दोन अपत्य होती त्यांचे नाव कमाल आणि कमाली असे होते.

संत कबीर हे कोणत्या धर्माचे होते?

संत कबीर यांच्या धर्माविषयी अद्याप कोणालाही काही स्पष्ट माहीती नाहीये.पण असे म्हटले जाते की संत कबीर यांचा धर्म ईस्लाम होता आणि स्वामी रामानंद यांच्या सान्निध्यात राहुन त्यांनी हिंदु धर्माविषयी ज्ञान प्राप्त केले.पुढे जाऊन रामानंद हे त्यांचे गुरू देखील बनले होते.

See also  डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड या दोघांमधील फरक - Difference between credit card and debit card in Marathi

संत कबीर यांचे सामाजिक आणि धार्मिक आणि अध्यात्मिक विचार कसे होते?संत कबीर यांनी जगाला कोणती शिकवण दिली?

 संत कबीर यांना धार्मिक भेदभाव अजिबात मान्य नव्हता याचकरीता त्यांनी सर्व धर्मामधील चांगल्या विचारांना समानपणे आत्मसात केले होते.

 

  • संत कबीर हे गुरूला परमेश्वराच्या आधी स्थान द्यायचे एक कुंभार जसा मातीला आकार देऊन भांडे तयार करतो तसाच एक गुरू आपल्या शिष्याच्या व्यक्तीमत्वाला आकार देत असतो.
  • संत कबीर आपल्या दोह्यांतुन लोकांना हे सांगायचे की इतरांमध्ये वाईट गुण शोधण्यापेक्षा आपण आपल्या मधील वाईट गुणांना शोधायला हवे आणि त्यांचा नाश करायला हवा.
  • संत कबीर असे म्हणायचे की आपण नेहमी अशी भाषा बोलायला हवी ज्याने ऐकणारयाच्या मनाला चांगले वाटेल कारण याने इतरांना चांगले तर वाटतेच सोबत आपल्याला देखील हर्ष प्राप्त होत असतो.
  • आपण कुठल्याही साधु संतांला त्याची जात विचारू नये त्याचे ज्ञान बघायला हवे.म्हणजेच आपण विचारांना ज्ञानाला कर्माला महत्व द्यायला हवे ते विचार ज्ञान मांडत असलेल्याच्या जातीला नव्हे.
  • संत कबीर यांनी लोकांना सामाजिक धार्मिक एकतेची शिकवण दिली.

संत कबीर यांच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्य कोणकोणती होती?

  • संत कबीर यांना अनेक भाषांचे ज्ञान होते अनेक भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते.
  • संत कबीर हे अनेक ठिकाणी भ्रमण करण्यास जात असल्याने त्यांना विविध भाषा अवगत झाल्या होत्या.प्रत्येक ठिकाणी आपले विचार आणि अनुभव इतरांसमोर मांडण्यासाठी ते त्या जागेवरील स्थानिक भाषेचा वापर करायचे.
  • संत कबीर हे नेहमी खरे बोलायचे आणि ते नेहमी न घाबरता निर्भिडपणे जगायचे.खरे तेच बोलायचे.
  • संत कबीर हे आजुबाजुच्या निंदा करत असलेल्या व्यक्तींना नेहमी आपले हितचिंतक मानत असत.कारण आपले निंदक हेच आपल्याला अजुन पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असतात.

संत कबीर यांनी रचलेले दोहे आणि त्यांचा अर्थ:

 1)बुरा न देखन मै चला बुरा न मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसा बुरा न कोई-

  • संत कबीर आपल्या दोहयातुन असे म्हणायचे आहे की बुरा न देखन मै चला बुरा न मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसा बुरा न कोई(जेव्हा मी इतर लोकांमध्ये वाईट शोधायला गेलो तर मला त्यांच्यात वाईट काहीच आढळले नाही पण जेव्हा मी माझ्या स्वताच्या हदयातुन डोकावून बघितले तर माझ्यापेक्षा वाईट मला इतर कोणीच दिसले नाही.म्हणजे ह्या दोहयातुन संत कबीर आपणास हे सांगतात की इतरांमध्ये वाईट गुण शोधण्यापेक्षा आपल्या मधील वाईट गुणांना शोधा आणि त्यांचा नाश करा.
See also  ढगफुटी म्हणजे काय? - Cloud burst meaning in Marathi

2) ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए औरो को शितल कर आपहु शितल होय

 आपण नेहमी अशी भाषा बोलायला हवी ज्याने ऐकणारयाच्या मनाला चांगले वाटेल कारण याने इतरांना चांगले तर वाटतेच सोबत आपल्याला देखील हर्ष प्राप्त होत असतो.

3) जाती पुछो साधु की पुछे उसका ज्ञान मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान

आपण कुठल्याही साधु संतांला त्याची जात विचारू नये त्याचे ज्ञान बघायला हवे.म्हणजेच आपण विचारांना ज्ञानाला कर्माला महत्व द्यायला हवे ते विचार ज्ञान मांडत असलेल्याच्या जातीला नव्हे असे संत कबीर यांना आपणास ह्या दोहयातुन सांगायचे आहे.

4) निंदक नियरे सखिए आँगन कुटी छताय बिन पाणी साबुन बिन निर्मल करे सुभाय

 जे आपली निंदा करतात अशा व्यक्तींना नेहमी आपण आपल्या जवळ ठेवायला हवे कारण तेच आपल्याला आपल्या कमतरता दोष सांगुन आपल्याला पाणी,साबन न लावता स्वच्छ निर्मल करीत असतात.

 संत कबीर यांनी केलेले कार्य  

  • संत कबीर यांना सामाजिक तसेच धार्मिक भेदभाव अजिबात मान्य नव्हता.यासाठी त्यांनी समाजातील जातीभेद धर्मभेद दुर करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले.
  • समाजातील अनेक सामाजिक तसेच धार्मिक अनिष्ठ रूढी परंपरांचा संत कबीर यांनी ठामपणे विरोध केला.
  • आपल्या दोहयांमधुन त्यांनी समाजाला अनेक चांगले उपदेश तसेच चांगल्या शिकवणी दिल्या.सामाजिक प्रबोधन केले.

 संत कबीर यांच्या प्रमुख रचना,तसेच त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावे  

  • बीजक
  • साखी
  • रमैनी
  • सबद

Leave a Comment