जागतिक रक्तदाता दिनाविषयी माहीती – World blood donor day information in Marathi

Table of Contents

जागतिक रक्तदाता दिनाविषयी माहीती world blood donor day information in Marathi

मित्रांनो रक्तदान,रक्तदाता हे दोन शब्द आपणास नेहमी ऐकायला तसेच वाचायला मिळत असतात.पण जेव्हा आपल्या घराच्या आजुबाजुला तसेच आपल्या शहरात, गावात एखादे रक्तदान शिबिर आयोजित केले जात असते.

तेव्हा आपण हा कार्यक्रम बघत असतो.आणि अठरा वर्षाच्या पुढील असलो तर आपण सुदधा रक्तदान करत असतो.

पण रक्तदान दिवस दरवर्षी जगभरात का साजरा केला जातो?त्याचा मुळ इतिहास काय आहे?हा दिवस कधी आणि केव्हापासुन साजरा केला जाऊ लागला?ह्या दिवसाचे महत्व काय आहे?रक्तदान करण्याचे फायदे कोणकोणते असतात?हे आपल्यापैकी खुप जणांना माहीतच नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण रक्तदाता दिन म्हणजे काय?रक्तदान म्हणजे काय?रक्तदान कोणाला करता येते?रक्तदान दिवस दरवर्षी जगभरात का साजरा केला जातो?त्याचा मुळ इतिहास काय आहे?हा दिवस कधी आणि केव्हापासुन साजरा केला जाऊ लागला?ह्या दिवसाचे महत्व काय आहे?रक्तदान करण्याचे आपणास कोणकोणते फायदे होत असतात?इत्यादी बाबींविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

See also  एच-सी-एलचा काय फुलफाँर्म काय होतो?- HCL Full Form In Marathi

चला तर मग मित्रांनो अधिक वेळ वाया न घालवता जाणुन घेऊया रक्तदाता दिन आणि रक्तदाना विषयी अधिक सविस्तरपणे.

रक्तदाता म्हणजे काय?who is blood donor,meaning of blood donor in Marathi

रक्तदाता म्हणजे अशी एक विशिष्ट व्यक्ती जी आपले रक्त एखाद्या गरजु व्यक्तीला दान करत असते.

रक्तदान म्हणजे काय?what is blood donation,meaning of blood donation in Marathi

रक्तदान म्हणजे एखाद्या गरजु तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींसाठी आपले रक्त देणे होय.

जागतिक रक्तदाता दिवस म्हणजे काय?meaning of world blood donor day in Marathi

जागतिक रक्तदाता दिवस हा तो दिवस आहे ज्या दिवशी संपुर्ण जगभरात गरजु व्यक्तींसाठी जागतिक पातळीवर रक्तदान केले जाते.

जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी कधी असतो?

जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा आणि कधी साजरा केला जातो?When is World Blood Donor Day celebrated every year?

संपूर्ण जगभरात दरवर्षी 14 जुन रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.

2022 मध्ये जागतिक रक्तदाता दिन कधी आहे?When is World Blood Donor Day in 2022 in Marathi

2022 मध्ये जागतिक रक्तदाता दिन 14 जुन रोजी आहे.

दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन का साजरा केला जातो?Why is World Blood Donor Day celebrated every year?

जागतिक रक्तदानाच उद्दिष्ट काय आहे?What is the purpose of celebrating World Blood Donor Day every year?

जगभरातील सर्व गरजु तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी हा दिवस दर वर्षी साजरा केला जातो.

याचसोबत जनतेत रक्तदानाविषयी जागृकता निर्माण करणे त्यांना रक्तदानाचे फायदे आणि गरज लक्षात आणुन देणे जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्ती रक्तदान करतील हा देखील रक्तदाता दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतु आहे.

जे व्यक्ती दरवर्षी गरजु व्यक्तींना आपले रक्त देत असतात अशा व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक रक्तदान दिनाचा इतिहास ?history of blood donor day in Marathi

मेडिकल क्षेत्रात आपले अमुल्य योगदान दिलेल्या कार्ल लँण्डस्टायनर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी जागतिक पातळीवर रक्तदाता दिवस साजरा केला जातो.

See also  सोशल नेटवर्क म्हणजे काय ? What is social network in Marathi

थोर शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांचा आँस्ट्रेलिया ह्या देशात झाला होता.1937 सगळयात पहिले रक्तगटाचा शोधही कार्ल लँडस्टायनर यांनीच लावला होता.

यानंतरच रक्ताचे वेगवेगळया गृपमध्ये वर्गीकरण करण्यास सुरूवात झाली.याने लाखो लोकांचे प्राण वाचवण्यास मदत होऊ लागली

कार्ल लँडस्टायनर यांनी चिकित्सा क्षेत्रामध्ये दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानासाठी त्यांना एक विशेष पदवी बहाल करण्यात आली होती.जिचे नाव फादर आँफ ट्रान्सफ्युझन मेडिसिन असे होते.

विज्ञान क्षेत्रात देखील कार्ल लँण्डस्टायनर यांनी अनेक महत्वाची कार्ये करत आपले अमुल्य योगदान दिले ज्याचे परिणामस्वरूप त्यांना फिजिओलाँजी आणि मेडिसिन क्षेत्रातील अत्यंत मानाचा मानला जात असलेला नोबेल पुरस्कार देखील बहाल करण्यात आला.

अशा ह्या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यु 1943 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी झाला होता.तेव्हापासुन कार्ल लँडस्टायनर यांच्या आठवणीत दरवर्षी हा रक्तदाता दिन साजरा केला जातो.

जगात सर्वात प्रथम रक्तदाता दिन कधी साजरा केला गेला होता?When was the first Blood Donor Day celebrated in the world in Marathi

जगात सगळयात पहिले रक्तदाता दिन 2005 मध्ये साजरा केला गेला होता.आणि याला जागतिक आरोग्य संघटनेने आपले समर्थन देखील दिले होते.

संपुर्ण जगभरात जागतिक रक्तदाता दिन कसा साजरा केला जातो?How is World Blood Donor Day celebrated around the world in Marathi

दरवर्षी जागतिक स्तरावर 14 जुन रोजी रक्तदाता दिवस हा साजरा केला जात असतो.भारतात या दिवशी एखाद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

या दिवशी लोकांना रक्तदानाचे महत्व गरज पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.रक्तदानाविषयी सामाजिक जागृती निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

रक्तदान कोणती व्यक्ती करू शकते?Who can donate blood?

ज्या व्यक्तीचे वय 18 पेक्षा अधिक असेल अणि 65 पेक्षा कमी असेल अशी कुठलीही व्यक्ती रक्तदान करू शकते.याचसोबत जी व्यक्ती रक्तदान करते आहे तिचे वजन किमान 45 किंवा 50 किलो इतके असायला हवे.

रक्तदान कोणाला करता येत नाही?Who can’t donate blood?

पुढील काही व्यक्ती रक्तदान करून आपले रक्त दुसरयाला देऊ शकत नाही –

● अशी व्यक्ती जिला एडसची लागण झाली आहे तिचा रिपोर्ट एच आयव्ही पाँझिटिव्ह आला आहे.

See also  आपला मोबाईल गरम होण्याचे कारण काय? - Why does my phone get hot Marathi information

● अशी व्यक्ती जिला हिपँटेटीस ए आणि बी चा आजार आहे.

● अशी व्यक्ती जिच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण खुप कमी आहे.

● ज्या व्यक्तींना सर्दी खोकला तसेच पोटाशी संबंधित कुठलाही त्रास असेल अशा व्यक्तींनी देखील रक्तदान करू नये.

● अशी व्यक्ती जिला रक्ताशी संबंधित आजार आहे.

रक्तदान करण्याचे फायदे कोणकोणते असतात?advantages of blood donation in Marathi

रक्तदान करण्याचे पुढील काही अत्यंत महत्वाचे फायदे आपणास प्राप्त होत असतात-

● नियमित रक्तदान केल्याने आपल्याला कँन्सर तसेच इतर कुठलाही आजार जडत नाही.

● रक्तदान केल्याने आपले रक्त पातळ होण्यास मदत होते.

● नियमित रक्त दान केल्यास आपल्या हदयाचे आरोग्य उत्तम राहते आपल्याला हदयाशी संबंधित हार्ट अटँक तसेच इतर कुठलीही आजाराची समस्या भेडसावत नही.

● नियमित रक्तदान केल्याने आपले वजन देखील नियंत्रणात राहत असते.

● रक्तदान केल्यानंतर आपले शरीर शरीरात असलेली रक्ताची सर्व कमतरता भरून काढत असते. ज्याने आपल्या शरीरात जास्तीत जास्त प्रमाणात लाल रक्तपेशी(red sales) तयार होतात.ज्याचे परिणामस्वरूप आपले आरोग्य नेहमी उत्तम राहत असते.

रक्तदान करण्याचे नुकसान कोणकोणते आहे?disadvantages and side effects of blood donation in Marathi

रक्त दान केल्याने आपल्याला दुसरयाचा जीव वाचवता येतो तसेच स्वताला देखील याचे आरोग्यविषयक अनेक लाभ प्राप्त होत असतात.रक्तदान केल्याने आपली कुठलीही आरोग्यविषयक शारीरीक हानी होत नाही.

एकदा रक्तदान करून झाल्यानंतर आपण पुन्हा कधी रक्तदान करू शकतो?Once we have donated blood,then when can we donate blood again?

● एकदा रक्तदान केल्यानंतर आपणास पुढील रक्तदानासाठी कमीत कमी 55 ते 56 दिवस थांबावे लागत असते.

● जर आपण प्लेटलेटस दान केले असेल तर पुढील रक्तदान करण्यासाठी आपणास दोन आठवडा थांबावे लागते.

● जर आपण प्लाझ्मा दान केले असेल तर पुढील रक्तदान करण्यासाठी आपणास चार ते पाच आठवडा थांबावे लागते.

● जर आपण डबल रक्तपेशी दानकेली असेल तर पुढील रक्तदान करण्यासाठी आपणास 115 दिवस थांबावे लागते.

जागतिक रक्तदाता दिनाचे महत्व काय आहे?importance of blood donation in Marathi

● ह्या दिवशी जगभरातील रक्तदान करत असलेल्या रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले जातात.त्यांचा सत्कार केला जातो.

● रक्तदानाचे महत्व,गरज तसेच सामाजिक आणि आरोग्यविषयक फायदे लोकांच्या लक्षात आणुन दिले जातात.

● रक्तदानाविषयी प्रबोधन केले जाते.

आपण रक्तदान का करायला हवे?Why should we donate blood?

मित्रांनो आपण डोनेट केलेल्या रक्तामुळे कित्येक लोकांचे जीव वाचत असतात.

आज खुप ठिकाणी वेळेवर रक्त न मिळल्याने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत असतात.पण जर आपण प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केले तर अशा लाखो लोकांचे प्राण वाचु शकतात.कारण आपले दान केलेले रक्त त्या गरजु व्यक्तींना उपलब्ध करून दिले जाते.आणि याचा आपल्याला काही आरोग्य विषयक तोटा देखील नसतो.उलट हे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.

म्हणुन आपण इतरांसाठी नव्हे तर स्वताच्या आरोग्यासाठी तरी रक्तदान करायलाच हवे.

ब्लड ट्रान्सफ्युझन कशाला म्हटले जाते?blood transfusion meaning in Marathi

ब्लड ट्रान्सफ्युझन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात एका व्यक्तीचे रक्त दुसरया व्यक्तीच्या शरीरात स्थलांतरीत करण्यात येते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पुरेसे रक्त नसेल तेव्हा त्याच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युझन ही मेथड वापरली जात असते.यात एका व्यक्तीचे थोडे रक्त दुसरया व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सफर केले जाते.

फादर आँफ ट्रान्सफ्युझन मेडिसिन ही पदवी कोणाला देण्यात आली?Who was conferred the title of Father of Transfusion Medicine?

कार्ल लँडस्टायनर यांनी चिकित्सा क्षेत्रामध्ये दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानासाठी त्यांना एक विशेष पदवी बहाल करण्यात आली होती.जिचे नाव फादर आँफ ट्रान्सफ्युझन मेडिसिन असे होते.

1 thought on “जागतिक रक्तदाता दिनाविषयी माहीती – World blood donor day information in Marathi”

Comments are closed.