पोस्ट ऑफिसमंथली इन्कम स्कीम काय आहे?post office monthly income scheme meaning in Marathi
ज्या व्यक्तींना पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करून दरमहा मासिक उत्पन्न प्राप्त करायचे आहे अशा व्यक्तींसाठी पोस्ट ऑफिस उत्तम योजना घेऊन आले आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही पोस्ट आॅफिसची एक अत्यंत खात्रीशीर उत्पन्न देणारी योजना आहे.
ह्या योजनेत आपणास एकरकमी जमा करावे लागतात ज्याच्या बदल्यात दरमहा एक निश्चित अणि खात्रीशीर मासिक उत्पन्न प्राप्त होते.
ह्या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाजारात कितीही चढ उतार सुरू असले तरी आपल्याला आपले निश्चित खात्रीशीर इन्कम यातुन प्राप्त होते.
म्हणजे मार्केट मधील अप अणि डाऊनचा कुठलाही परिणाम ह्यातील गुंतवणूक केलेल्या पैशांवर होत नाही.
म्हणूनच ह्या स्कीमला केंद्र सरकारची एक अत्यंत सुरक्षित स्कीम म्हणून देखील ओळखले जाते.
ह्या स्कीम मध्ये आपणास फक्त एकाच वेळी गुंतवणूक करावी लागते ह्या स्कीमचा मॅच्युरिटी पिरीअड पाच वर्षे इतका असतो.
पण पाच वर्षे पूर्ण होण्या अगोदर देखील आपणास ही स्कीम बंद करता येऊ शकते.पण पैसे काढण्यासाठी ठेवीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होऊ देणे आवश्यक आहे.
ह्या स्कीम मध्ये असा नियम आहे की जर आपण मॅच्युरिटी पिरीअड संपण्याच्या आत एक किंवा तीन वर्षांत पैसे काढले तर ठेव रकमेतुन दोन टक्के इतकी रक्कम कट करण्यात येत असते.मग उर्वरित रक्कम आपणास दिली जाते.
ह्या योजनेत खाते उघडण्यासाठी फक्त हजार रुपये लागतात.यात आपणास संयुक्त तसेच सिंगल अशी दोन्ही प्रकारची खाती उघडता येतात.
जर आपण यात सिंगल अकाऊंट ओपन केले तर आपणास यात जास्तीत जास्त ९ लाखाची गुंतवणूक करता येईल अणि संयुक्त खाते असल्यास यात आपणास १५ लाख रुपये इतकी गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते.
ह्या योजनेत कुठलाही भारतातील नागरीक गुंतवणूक करण्यास पात्र आहे.१ जुलै २०२३ पासुन पोस्ट आॅफिसच्या ह्या योजनेत ७.४ टक्के पर्यंत व्याज दिले जाते आहे.
मंथली इन्कम स्कीम मध्ये एक महिना पुर्ण झाल्यापासून मॅच्युरिटी होईपर्यंत दरमहा आपणास व्याज दिले जाते.
मंथली इन्कम स्कीमचे फायदे –
ह्या योजनेअंतर्गत आपणास व्याजाच्या स्वरूपात दरमहा इन्कम प्राप्त असते.अणि स्कीम मॅच्युरिटी पिरीअड संपल्यावर आपल्याला जमा केलेली रक्कम दिली जाते.
म्हणजे यात आपणास स्कीम मॅच्युअर होईपर्यंत पाच वर्षे इतक्या कालावधी पर्यंत व्याजाच्या स्वरूपात दरमहा फिक्स इन्कम प्राप्त होते याचसोबत मॅच्युअर झाल्यावर आपले जमा केलेले पैसे देखील आपणास वापस मिळतात.
स्कीम मॅच्युअर झाल्यावर देखील आपणास पुन्हा गुंतवणूक करता येते.
महत्वाची बाब म्हणजे यात प्राप्त होणारे व्याज हे करपात्र असते.अणि ह्या गुंतवणूकीवर कुठल्याही प्रकारचा टीडीएस कट केला जात नाही.
किती गुंतवणूक केल्यास किती पैसे – उत्पन्न ?
मंथली इन्कम स्कीम मध्ये ७.४ व्याजदानुसार जर आपण पाच लाखाची गुंतवणूक केली तर आपणास दरमहा ३ हजार रूपयांपर्यत मासिक उत्पन्न व्याजाच्या स्वरूपात प्राप्त होते.