टेलिमार्केटिंग कंपन्यांना आळा घालण्यासाठी ट्रायने केला नवीन नियम जारी  – TRAI cracks down on unauthorized telemarketers

टेलिमार्केटिंग कंपन्यांना आळा घालण्यासाठी नवीन नियम – TRAI cracks down on unauthorized telemarketers

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपणास दहा अंकी नंबर वरून अनेक अनोळखी काॅल येत असतात.

आपल्याला आलेला काॅल‌ हा दहा अंकी नंबर असलेला असल्यामुळे आपणास वाटते की आपल्याला आलेला काॅल नक्कीच आपल्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कोणाचा आहे.

पण जेव्हा आपण हा काॅल रिसिव्ह करतो तेव्हा समोरून कंपनीवाले बोलत असतात.आपल्या प्रोडक्ट सर्विसचे प्रमोशन करण्यासाठी हा असा प्रकार होत आहे.

म्हणुन यावर आळा घालण्यासाठी ट्रायने एक विशेष पाऊल उचलले आहे.ट्रायने एक नियम बनविला आहे ह्या नियमानुसार जेवढेही दहा अंक असलेले नोंदणी न करण्यात आलेले मोबाईल नंबर आहे ते येत्या चार ते पाच दिवसांमध्ये बंद करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात एक अहवाल आला होता ज्यामध्ये असे दिले आहे की दहा अंकी मोबाईल नंबर वरून प्रमोशनसाठी काॅल करणे चुकीचे आहे.

असे करताना कोणी आढळुन आले तर त्या दहा अंकी नंबर वरून प्रमोशनसाठी येणारया काॅल तसेच मॅसेजला बंद करण्यात येईल.

ट्रायने सदर कठोर पाऊल मोबाईल युझरला सतत प्रमोशनसाठी मॅसेज अणि काॅल करून परेशान करणारया टेलिकाॅम कंपनीला लगाम घालण्यासाठी उचलले आहे.

ट्रायने असे देखील सांगितले आहे की कुठल्याही प्रमोशनसाठी दहा अंकी नंबरचा वापर करणे हे चुकीचे आहे.

खर पाहायला गेले तर दैनंदिन जीवनात आपणास रोज येणारा ओळखीच्या व्यक्तींचा साधा काॅल अणि कंपनीकडुन प्रमोशनसाठी केले जाणारे काॅल आपल्या लगेच लक्षात येऊन जातात

कारण याकरीता वेगवेगळे नंबर जारी करण्यात आले आहेत.त्यामुळे कोणता काॅल आपल्या ओळखीच्या व्यक्तींचा आहे अणि कोणता कंपनीचा आपण सहजपणे ओळखुन घेतो.

पण काही केसेस मध्ये असे देखील निदर्शनास आले आहे की टेलिकॉम कंपनींकडुन नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

साध्या काॅल साठी वापरलया जाणारया दहा अंकी नंबर वरून प्रमोशनसाठी मोबाईल युझरला मेसेज तसेच काॅल करून परेशान करण्यात येत आहे.

म्हणून ट्रायने याबाबत गंभीर दखल घेतली आहे आता येणारया चार पाच दिवसांत टेलिकाॅम सर्विस प्रदात्यांकडुन जर ज्या दहा अंकी नंबर वरून प्रमोशनसाठी काॅल मेसेज केले जात आहेत त्यावर बंदी घालण्यात नाही आली तर टेलिकाॅम कंपनीविरूदध ट्राय कडुन कारवाई केली जाणार आहे.

ट्रायचा फुलफाॅम काय होतो? TRAI Full form in aMarathi

 ट्रायचा फुलफाॅम telecom regulatory authority of India असा होतो.भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) हे भारतातील दूरसंचार क्षेत्राचे स्वतंत्र नियामक म्हणून ओळखले जाते.

ट्राय ही एक वैधानिक संस्था आहे ज्याची स्थापना भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण कायदा१९९७ च्या कलम तीन अंतर्गत भारत सरकारने केली होती.

जुनी पेंशन योजना अणि नवीन पेंशन योजना मध्ये नेमका काय फरक आहे?

ट्रायचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

ट्राय ही एक वैधानिक संस्था आहे जिचे मुख्य उद्दिष्ट हे TRAI कायद्यांतर्गत दूरसंचार सेवांचे नियमन करणे हे आहे याचसोबत विवादांचे निराकरण करणे, अपील निकाली काढणे आणि सेवा प्रदात्यांच्या तसेच ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे काम देखील ट्राय करते. 

दूरसंचार क्षेत्राच्या सुव्यवस्थित विकासाला चालना देणे आणि त्याबाबद खात्री करणे हे देखील हया कायद्याचे मुख्य उद्दिष्ट मानले जाते.