ईरानने लाॅच केले मोहजेर १० ड्रोन – IRAN launched Mohajer 10 drone
अमेरिकेसोबतचा अणुकरार तोडल्यानंतर इराण आपल्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यात सातत्याने वाढ करताना दिसुन येत आहे.
नुकतेच इराण ह्या देशाने आपले एक नवीन ड्रोन लाॅच केले आहे.ईराणने आपल्या ह्या नवीनच लाॅच केलेल्या ड्रोनचे नाव मोहजेर १० ड्रोन असे ठेवले आहे.
आजच्या लेखात आपण इराणच्या ह्या मोहजेर १० ड्रोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये जाणुन घेणार आहोत.
इराणने आपल्या मोहजेर १० ड्रोन विषयी अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की हे ड्रोन इस्रायलमध्ये घुसून लक्ष्य म्हणजे शत्रुला टार्गेटला नष्ट करू शकण्यास सक्षम आहे.
असे सांगितले जात आहे की ईराणने आपले हे नवीन ड्रोन मोहजेर १० हे अमेरिकेच्या एम क्यु नाईन रिपर ड्रोन अणि शहीद १२९ ह्या दोघांचे एकत्रीकरण करून बनवण्यात आले आहे.
इराण कडुन असा दावा करण्यात आला आहे की त्यांचे हे मोहजेर १० ड्रोन वेगवेगळ्या प्रकारचे बाॅम्ब अणि अॅटी रडार उपकरणांना घेऊन जाण्यास सक्षम आहे.
हे ड्रोन साधारणत तीनशे किलो इतकी वजनाची अवजारे घेऊन जाण्यास सक्षम आहे.तसेच याचा वेग २१० किलोमीटर प्रति तास इतका आहे.
हया ड्रोनमध्ये ४५० लीटर इतके इंधन भरण्याची क्षमता देखील आहे.हे ड्रोन सात हजार मीटर पासुन दोन हजार किलोमीटर इतक्या उंचावर न थांबता उडण्यास सक्षम आहे.
सध्या इराण इस्राईल या दोघे देशांमधील संबंध अत्यंत तणावपूर्ण स्वरुपाचे आहेत.त्यामुळे हया ड्रोन दवारे ईराण कडुन इजराईल वर देखील हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.