गुगल बार्ड म्हणजे काय?Google bard information in Marathi
गुगल बार्ड हे गुगलने लाॅच केलेले एक नवीन फिचर आहे.चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलने मार्केट मध्ये नुकतेच हे नवीन फिचर लाॅच केले आहे.
नेहमी आपल्या युझर्सला वेगवेगळ्या सुविधा सेवा फिचर्स पुरवत असलेल्या गुगल कंपनीने आपल्या कस्टमरला आर्टिफिशियल इंटलिजन्सचा अनुभव प्राप्त करून देण्यासाठी हे फिचर लाॅच केले असल्याचे सांगितले जात आहे.
एका गुगल आय ओ २०२३ नावाच्या कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ह्या फिचर विषयी घोषणा केली होती.
आतापर्यंत हे फिचर १८० पेक्षा अधिक देशांमध्ये सुरू केले गेले आहे.आता भारतात देखील हे फिचर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे.
गुगल बार्डची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
गुगल बार्ड हे फिचर इंग्लिश भाषेच्या व्यतिरीक्त लवकरच जपानी तसेच कोरिअन भाषेत देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.लवकरच हिंदी बांगला फारशी अशा इतर भाषेत देखील हे फिचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गुगल बार्डला २० पेक्षा अधिक कोडिंग भाषा अवगत आहेत.हे फिचर ४० पेक्षा अधिक भाषांमध्ये आणले जाणार आहे.
गुगल बार्ड मध्ये मजकुर लिहिण्यासोबत आता चित्र फोटो ईमेज वगैरे टाकुन त्यावर देखील मजकुर स्वरूपात माहिती शोधता येईल असे सांगितले जाते आहे.
ए आय बेझ्ड गुगल बार्ड हे अत्यंत सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे यामध्ये युझरला व्हिज्युअल सपोर्ट देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गुगल बार्ड हे एकापेक्षा जास्त भाषांमध्ये कोडिंग करू शकते.
गुगल बार्ड हे इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर आपल्या विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.हे गुगलच्या सेवे व्यतिरीक्त अॅडोब फायर प्लाय सोबत देखील काम करेल.
गुगल बार्डचा वापर कसा करायचा?
- सर्वप्रथम गुगल बार्डच्या bard.google.com ह्या आॅफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.
- यानंतर आपल्यासमोर गुगल बार्डचे पेज ओपन होईल.थोड स्क्रोल करून खाली आल्यावर खाली उजव्या कोपऱ्यात आपणास ट्राय बार्ड नावाचे आॅप्शन दिसुन येईल.
- यानंतर पेजच्या खाली दिलेल्या प्रायव्हसी पॉलिसीला स्वीकारण्यासाठी खाली दिलेल्या आय एॅम अँग्री ह्या बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपण प्रतिक्षा यादीविना गुगल बार्ड हे फ्री मध्ये वापरू शकता.याआधी हे फिचर प्रतीक्षा यादी दवारे युके तसेच युएस मध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते.आता हे फिचर १८० पेक्षा अधिक देशांत वापर करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- सध्या हे फिचर बिटा मोडमध्ये असल्याने चाचणी टप्प्यात असल्याने यात काही मिस्टेक देखील होण्याची संभावना आहे.
- याआधी सर्व युझर चॅट जीपीटीचा वापर कुठल्याही विषयावर माहीती सर्च करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी करत होते.अणि काही सेकंदामध्ये युझर्सला त्यांच्या विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देत होते.
- आता हेच काम गुगल बार्ड देखील करणार आहे.त्यामुळे आता बाजारात चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी एक नवीन प्रतिस्पर्धी आला आहे असे देखील म्हटले जाते आहे.
- असे सांगितले जाते आहे की गुगल आपल्या नवीन एल एल एम large language model पालम टु वर काम करत आहे जेणेकरून हे माॅडेल अजुन भारी बनेल चॅट जीपीटीपेक्षा अधिक जास्त प्रभावी फिचर आपल्या युझरला देऊ शकेल.
गुगल बार्डचे फायदे कोणते आहेत?
गुगल बार्ड हे स्वताच्या भाषेवर आधारित माॅडेल आहे ज्याला लॅमडा असे म्हटले जाते.गुगल बार्ड ही आर्टिफिशियल इंटलिजन्सवर आधारीत चॅट बोट सेवा आहे.
आपण विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर गुगल बार्ड देऊ शकते.हे उत्तर टेक्स्ट आधारित किंवा ईमेज फोटो आधारीत असणार आहे.
युझरने टेक्स्ट टाईप करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर हे फोटो किंवा इमेजच्या स्वरुपात देऊ शकते.
यात प्रोग्रामिंग भाषांचा वापर यात केला जात असल्याने यात कोडिंग करणे देखील सहज तसेच सोपे होणार आहे.
गुगल मॅप गुगल डाॅक इत्यादी संबंधित कुठलेही काम करण्यात गुगल बार्ड सक्षम आहे.
लवकरच गुगल बार्ड दवारे आपणास चाळीस पेक्षा अधिक भाषांमध्ये आपल्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त होणार आहेत.