नवीन व्हाटस अप आंतरराष्ट्रीय कॉलिंग घोटाळा विषयी माहिती New WhatsApp international calling scam information in Marathi

नवीन व्हाटस अप आंतरराष्ट्रीय कॉलिंग घोटाळा New WhatsApp international calling scam information in Marathi

आज लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन पर्यायांचा वापर करीत असतात.व्हाटस अप स्कॅमिंग सुदधा असाच एक नवीन स्कॅमिंग करण्याचा नवीन प्रकार तसेच पद्धत आहे.

New WhatsApp international calling scam
New WhatsApp international calling scam

यात व्हाटस अप युझर्सला वेगवेगळ्या देशांच्या अनोळखी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून काॅल केले जातात.अणि व्हाटस अप दवारे युझर्सची फसवणूक केली जाते.

सध्या अनेक व्हाटस अप युझर्सला मागील काही दिवसांपासून आपल्या व्हाटस अप नंबरवर वेगवेगळ्या अनोळखी इंटरनॅशनल नंबर वरून काॅल केला जातो आहे.अणि ह्या स्कॅमिंग मध्ये भारतीय व्हाटस अप युझर्सला विशेष करून टार्गेट केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

ह्या स्कॅमिंग दवारे भारतातील व्हाटस अप युझर्सला जाॅब देण्याच्या बहाण्याने किंवा इतर कुठल्याही कारणाने फसवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यात एखादी लिंक व्हाटस अप युझर्सला दिली जाऊ शकते जिच्यावर क्लिक केल्यावर मालवेअर आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाॅल होऊन युझर्सचा वैयक्तिक डेटा जसे की महत्वाच्या फाईल फोटो व्हिडिओ डाॅक्युमेंट इत्यादी
चोरी होण्याची शक्यता आहे.

मोबाईल मधील स्टोअर केलेली बॅक अकाऊंट डिटेल हॅक होऊन बॅक खाते रिकामे होण्याची देखील शक्यता आहे.

किंवा एखाद्या कंपनीमधील एच आर बोलत आहे असे सांगत नोकरी देण्याच्या बहाण्याने कर्ज देण्याच्या बहाण्याने आपल्या कडुन पैसे देखील यात लुबाडले जाण्याची शक्यता आहे.

म्हणुन अशा कुठल्याही अनोळखी इंटरनॅशनल मोबाईल नंबर वरून आपल्याला व्हाटस अप वर काॅल आल्यास मोबाईल युझरने काॅल न उचलता किंवा अशा मोबाईल नंबर वर काॅल बॅक न करता किंवा मेसेज देऊन रिप्लाय वगैरे न देता तो मोबाईल नंबर लगेच ब्लँक लिस्ट मध्ये टाकावा.याने आपल्याला अशा नंबरवरून वारंवार काॅल येणार नाही.

अणि सरळ आपण सदर नंबर विषयी स्पॅमिंग रिपोर्ट व्हाटस अपला करायला हवे.याने व्हाटस अपला अशा स्पॅमिंग नंबर विषयी माहिती प्राप्त होईल.

See also  World Kidney Day 2023 In Marathi : किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपणास कुठल्याही गृप मध्ये आपल्या परवानगी शिवाय समाविष्ट करता येऊ नये यासाठी who can add me मध्ये my contact अशी सेंटिंग करून ठेवायला हवी.

कशा नंबर वरून व्हाटस अप युझर्सला मोबाईलवर इंटरनॅशनल काॅल केले जात आहे?

+61 +21 +1 अशा कुठल्याही मोबाईल नंबरवरून भारतातील व्हाटस अप युझर्सला व्हाटस अप वर इंटरनॅशनल काॅल केले जात आहे.