आजच्या विज्ञान अणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला 5 जी तंत्रज्ञानाविषयी माहीती असणे फार गरजेचे आहे.त्या शिवाय ह्या तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाशी जुळवुन घेतल्याशिवाय आपला सर्वाचा टिकाव लागणे अशक्य आहे म्हणुन 5 जी तंत्रज्ञानाविषयी थोडी बेसिक माहीती व्हावी म्हणून हा छोटासा लेख.
आता आपण वापरत असलेल्या ४-जी आणि ५-जी यांच्यातील मुख्य फरक – ‘आता अस्तीत्वात असलेले मोठे मोबाइल टॉवर विरुद्ध लहान सेल !
४-जीचे मोबाइल टॉवर खेडोपाडी , वड्या वस्तींवर मोबाइल नेटवर्क पोहोचवू शकतात. परंतु हल्ली मागणी इतकी वाढत आहे की ही क्षमता, वेग कमी पडू लागला आहे. तसेच नवीन मोबाइल टॉवर उभारणे आर्थिकदृष्टय़ा प्रचंड महाग आणि खूप वेळ खाऊही आहे. त्याउलट, ५-जी तंत्रज्ञानामध्ये मोबाइल टॉवर ची जागा ही लहान सेल घेणार असून लहान वायफाय राऊटरच्या आकाराचे सेल जागोजागी उभारले जाणार आहेत.
4 जी तंत्रज्ञान कसे कार्य करते?
जगात३४ देशांमधील ३७८ शहरांमध्ये 5G तंत्रज्ञाना उपलब्ध आहे. दक्षिण कोरियातील,चीन,अमेरिकेतील ५० तर ब्रिटनमधल्या काही शहरांचा यात समविष्ट आहेत.
या ट्रायल मध्ये मध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल तसंच आयडिया वोडफोन या कंपन्या भाग घेणार आहेत हे. ह्या ट्रायल च कालावधी काय असेल हे याबबात मात्र अद्याप काहीही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. या ट्रायल साठी कोणत्याही चायनिज कंपन्यांना परवानगी नाकारल्याच अधिकाऱ्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसापासून भारतातल्या 5G सेवेसंदर्भात तयारी सुरु होत्या. मात्र, 5G ट्रायल बाबतच्या परवानगीची कंपन्यांना वाट पाहत होत्या . रिलायन्स जिओने यापूर्वीच आपण Indigenous स्वदेशी 5G नेटवर्क उभारणार असल्याच सांगितलं आहे . स्वतःची 5G उपकरणं उभारणी वर काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
भारतातलं 5G नेटवर्क हे १८००, २१००, २३००, ८००, ९०० मेगाहर्ट्झ Frequency काम करणार आहे.
5 जी कुठे अणि कसे वापरले जाते, काही प्रश्न ?
5 जी तंत्रज्ञानाचा वेग कसा अणि किती आहे?
5 जी आता आपल्यासाठी उपलब्ध आहे का आहे तर कशापदधतीने उपलब्ध आहे?
आपल्याला आता 5 जी फोन हवा का?
आपल्याकडे तो असणे गरजेचे आहे का? आहे तर का गरजेचे आहे?
5 जी हे एक पाचव्या पिढीचे मोबाईल नेटवर्क आहे.1 जी 2 जी 3जी 4जी नेटवर्क नंतरचे हे एक नवीन जागतिक वायरलेस मानक म्हणुन जगभर गणले तसेच ओळखले जाते.
5 जी वायरलेस तंत्रज्ञानाचा अर्थ म्हणजे उच्च मल्टी-जीबीपीएस अधिक वेग,अल्ट्रा लो लेटेन्सी,अधिक विश्वासार्हता,भव्य नेटवर्क क्षमता,वाढीव उपलब्धता.
थोडक्यात ४-जी वेग जर एक सिनेमा इंटरनेटवरून डाऊनलोड करायला आपल्याला सहा मिनिटे आज लागत असतील तर तिथे ५-जी फक्त चार सेकंद पूर्ण सिनेमा तुमच्या स्टोरेज ल येईल ! हे सर्व शक्य होईल ५-जीच्या एक सुपर फास्ट इंटरनेट स्पीड मुळे
5 जी चा शोध कोणी लावला?
तसे पाहायला गेले तर एक कोणतीही विशिष्ट कंपनी किंवा विशिष्ट व्यक्ती 5 जी ची मालक नाहीये.कारण मोबाईल इकोसिस्टममध्ये अशा अनेक कंपन्या आहेत.ज्या 5 जी तंत्रज्ञानाला अस्तित्वात आणण्यासाठी आपले योगदान देताना आपणास दिसुन येतात.म्हणुन कोणत्याही एका कंपनीला 5 जी चे मालक म्हणने हे योग्य ठरणार नाही.
अशी खुप कारणे आपल्याकडे आज सांगण्यासाठी आहेत ज्यामुळे 5 जी हे 4 जी पेक्षा अधिक सरस अणि प्रभावी ठरते.अणि ज्यामुळे हे सिदध होते की 5 जी 4 जी पेक्षा अधिक चांगले आहे.
5 जी चा वेग 4जी पेक्षा अधिक लक्षणीय आहे.
5 जी ची क्षमता ही 4 जी पेक्षा अधिक आहे. 5 जी मध्ये 4 जी पेक्षा कमी वेळ लागतो.
4 जी एलटीई 3 जी पेक्षा अधिक वेगवान मोबाइल ब्रॉडबँड सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करत असताना 5 जी एक एकत्रित,अधिक सक्षम व्यासपीठ म्हणून डिझाइन केलेले आहे जे केवळ मोबाइल ब्रॉडबँड अनुभवांनाच प्रगत करते असे नाही तर
मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन्स म्हणजे निर्णयक माहितीची देवाणघेवाण – व भव्य आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज _ सारख्या नवीन सेवांना देखील समर्थन देते.
5 जी 4 जीपेक्षा लक्षणीय वेगवान आहे,कारण ती 20 गिगाबिट्स प्रति सेकंद (जीबीपीएस) पीक डेटा दर आणि 100+ मेगाबिट्स प्रति सेकंद (एमबीपीएस) सरासरी डेटा दर वितरीत करते.
आज आलेल्या बातमीनुसार भारतात 5G ट्रायल परवानगी देण्यास सुरवात झाली असून लवकरच ही टेकनोलोजी लोककरता उपलब्ध होणार आहे