अटल निवासी शाळा म्हणजे काय?ह्या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहेत? – Atal Residential School

अटल निवासी शाळा म्हणजे काय?ह्या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहेत? – 𝐀𝐓𝐋 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥

उत्तर प्रदेश राज्य सरकारने १२५० कोटी रूपयांच्या बजेटसह १८ अटल निवासी शाळांना नुकतीच मंजुरी दिली आहे.

उत्तर प्रदेश राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या ह्या अटल निवासी शाळांसाठी तब्बल १२५० कोटी रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

अणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने जवळपास अठरा अटल निवासी शाळांना यासाठी मंजुरी देखील दिली आहे.ह्या सर्व अटल निवासी शाळांना नवोदय विद्यालया प्रमाणे तयार करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

ह्या अठरा अटल निवासी शाळांना विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विशेषतः चालविण्यात येणार आहे.

अटल निवासी शाळा म्हणजे काय?ह्या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहेत? -  Atal Residential School
अटल निवासी शाळा म्हणजे काय?ह्या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहेत? – Atal Residential School

ह्या अठरा अटल निवासी शाळांची विद्यार्थी सामावण्याची क्षमता हजार विद्यार्थी प्रति शाळा इतकी असणार आहे.यात पाचशे मुली तसेच पाचशे मुलांचा समावेश असणार आहे.

अटल निवासी शाळांमधील अभ्यासक्रम हा सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना महामारीमुळे विस्कळीत झाले होते अशा विद्यार्थ्यांना देखील ह्या शाळेचा लाभ घेता येईल.

अटल निवासी शाळेत सर्वप्रथम सहावीच्या विद्यार्थ्यांचे वाचन सुरू करण्यात येईल.अणि उर्वरीत दोन शाळांना वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित केले जाणार आहे.

ह्या शाळेकरीता शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया अणि विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया देखील पुर्ण झाली आहे.इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे.

अटल निवासी शाळा का सुरू करण्यात आली आहे?

अटल निवासी शाळा गरीब,अनाथ तसेच मजदुरांच्या मुलामुलींना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा असलेले शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यात ह्या शाळा चालवल्या जाणार आहेत.यातील‌ जवळपास सोळा जिल्ह्यातील शाळांची बांधकाम पूर्ण देखील झाले असल्याचे सांगितले जात आहे.

अटल निवासी शाळांमध्ये कोणकोणत्या सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त होतील?

अटल निवासी शाळेमध्ये सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

See also  फेक लोन अ‍ॅप्स म्हणजे काय? | Fake loan apps information in Marathi

अटल निवासी शाळेत विद्यार्थ्यांना होसटेलची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.विदयार्थ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबची देखील सोय करण्यात आली आहे.

उदा कंप्यूटर लॅब, सायन्स लॅब,एक्सपीरीमेंट लॅब इत्यादी.

अटल निवासी शाळा कोणकोणत्या ठिकाणी बनविण्यात येत आहे? – – Atal Residential School

  • अटल निवासी शाळा
  • कानपुर,मोराबाद,बरेली,लखनौ,
  • अयोध्या,ललितपुर,गोरखपूर,
  • प्रयागराज,आग्रा,वाराणसी,
  • अलिगढ,बुलंदशहर, बस्ती,
  • आझमगड,गोंडा,सोनभद्र,
  • मुजफ्फरनगर,अलिगड,बांदा,
  • इत्यादी ठिकाणी अटल निवासी शाळा बांधण्यात आल्या आहेत.