जागतिक पर्यावरण दिवस विषयी माहीती- World Environment Day Information In Marathi

जागतिक पर्यावरण दिवस विषयी माहीती- World Environment Day Information In Marathi

जर आपल्याला स्वस्थ,निरोगी आणि प्रदुषणमुक्त आयुष्य जगायचे असेल तर आपण आपल्या आजुबाजुचे पर्यावरण नेहमी स्वच्छ ठेवणे फार आवश्यक असते.

याचसाठी दरवर्षी आपण पर्यावरण दिवस जागतिक स्तरावर साजरा करत असतो.जगभरात पर्यावरण संरक्षणाविषयी प्रबोधन करीत असतो.

ह्या वर्षी 2022 मध्ये देखील दरवर्षी प्रमाणे हा दिवस आंतरराष्टीय स्तरावर साजरा केला जाणार आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण 2022 मध्ये हा दिवस कधी साजरा केला जाणार आहे?ह्या वर्षीची याची थीम काय असणार आहे?इत्यादी सर्व महत्वाच्या बाबींविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो?जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो?

जागतिक पर्यावरण दिवस दर वर्षी संपुर्ण जगभरात 5 जुन रोजी साजरा केला जात असतो.

2022 मध्ये जागतिक पर्यावरण दिवस कधी आहे?

2022 मध्ये जागतिक पर्यावरण दिवस 5 जुन रोजी रविवारच्या दिवशी आहे.

जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम काय आहे?

या वर्षीची जागतिक पर्यावरण दिवसाची थीम ही Only One Earth केवळ एक पृथ्वी आहे ही आहे.

म्हणजेच आपण सर्व जिथे राहतो ती पृथ्वी एक आहे म्हणुन आपण सर्वानी मिळुन ह्या पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन राखायला हवे पर्यावरणाची काळजी घेत सदभावनेने आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी,आपल्या आजुबाजुचे पर्यावरण सुरक्षित ठेवायला हवे आणि हे खुपच महत्वाचे देखील आहे हे ह्या थीममधुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

See also  मराठी पत्रलेखन कसे  करावे - समर्पक, मुद्देसूद व प्रभावी - Effective Marathi Patra Lekhan Types and tips

जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यास आरंभ कधीपासुन झाला?

पर्यावरण दिवस साजरा करावयास सर्वप्रथम 1972 मध्ये संयुक्त राष्टाकडुन आरंभ केला गेला होता.तेव्हापासुन दरवर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

जगभरात पर्यावरण दिवस का साजरा केला जातो?पर्यावरण दिवस साजरा करण्याचा हेतु कोणता आहे?

प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी जनतेमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी,संपुर्ण जगाला पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वाना प्रेरित करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाविषयी जगभरात प्रबोधन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जगभरात पर्यावरण दिवस कसा साजरा केला जातो?

5 जुन रोजी संपूर्ण जगभरात विविध ठिकाणी पर्यावरण दिवस साजरा केला जात असतो.शाळा महाविद्यालयामध्ये ह्या दिवशी विविध सांस्कृतिक तसेच पर्यावरण विषयक जागृती निर्माण करत असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जगभरात-पर्यावरण-दिवस-कसा-साजरा-केला-जातो

विदयार्थ्यांसाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज पर्यावरण संवर्धनाचे महत्व इत्यादी अशा पर्यावरणाचे महत्व पटवून देत असलेल्या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सगळयांमध्ये जागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये रँली काढुन पर्यावरण संवर्धन विषयी घोषणा केल्या जातात.पर्यावरण संवर्धनाविषयी जागोजागी भिंतींवर घोषवाक्ये लिहीली जातात.पोस्टर लावले जातात.शाळा महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्व विदयार्थ्यांना पटवून देण्यापुरता एखादी एकांकिका तसेच नाटक
आयोजित केले जाते.

आजुबाजुचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी एखादी खास मोहीम राबवली जाते.

अशा वेगवेगळया प्रकारे जागोजागी पर्यावरण दिवस साजरा केला जातो.

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्यात?

● आपल्या अवतीभोवती जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करणे.

● नदी तसेच उघडयावर कचरा न फेकता तो कचरापेटीत टाकायला हवा.

● आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करायला हवा.

● इंधनाची बचत करायला हवी.

● इतरांना देखील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रेरित करायला हवे.

सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या देशात साजरा केला गेला होता?

See also  MCA म्हणजे काय ? MCA full form in Marathi - Master of Computer Application

जागतिक पातळीवर पर्यावरण दिन सर्वप्रथम स्वीडन ह्या देशाची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथे साजरा करण्यात आला होता.

पहिली जागतिक पर्यावरण परिषद कोठे भरली होती?

1972 मध्ये स्टॉकहोम येथे एक पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती,हीच परिषद जगातील पहिली पर्यावरण परिषद म्हणुन ओळखली जाते. ज्यामध्ये तब्बल 120 देशांनी आपला सहभाग नोंदवला होता.

भारतातील पर्यावरण संरक्षण विषयक कायदा कसा आहे?

भारतात पर्यावरण संरक्षणाच्या विषयाकडे भारत सरकार अतिशय गांभीर्याने लक्ष देत आहे.याचसाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने काही कडक कायदे देखील बनविले आहेत.

भारत देशामध्ये पर्यावरण संरक्षण विषयक कायदा कधी लागु करण्यात आला होता?

भारतात पर्यावरण संरक्षण विषयक कायदा सगळयात पहिले 1986 मध्ये लागु करण्यात आला होता.

 

पर्यावरणाची काळजी – साध्य सोप्या 15 गोष्टी – नक्की हातभार लावा – How can we take care of environment in Marathi

1 thought on “जागतिक पर्यावरण दिवस विषयी माहीती- World Environment Day Information In Marathi”

Comments are closed.