बांदीपुर टायगर रिझर्व – Bandipur Tiger Reserve
नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्नाटक येथे जंगल सफारी करतानाचे प्राण्यांच्या सोबतचे फोटो न्युज वर पाहावयास मिळाले आहेत.
बांदीपुर टायगर रिझर्व प्रोजेक्ट याला ५० वर्षं पूर्ण झाल्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक येथे बांदीपुर येथे भेट देण्यासाठी वाघांची संख्या मोजण्यासाठी गेले असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे प्रत्येक ठिकाणी न्युज चॅनलवर तसेच प्रसारमाध्यमांवर आपणास बांदीपुर टायगर रिझर्व प्रोजेक्ट हे नाव ऐकायला मिळत आहे.
आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हा बांदीपुर टायगर रिझर्व प्रोजेक्ट काय आहे?हा का सुरू करण्यात आला होता?
आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
कर्नाटक मध्ये स्थित असलेल्या बांदीपुर टायगर रिझर्वने प्रोजेक्ट टायगर रिझर्व ह्या रूपात १ एप्रिल २०२३ रोजी तब्बल ५० वर्षे पुर्ण केली आहेत.
काय आहे हा बांदीपुर टायगर रिझर्व प्रोजेक्ट? –
१९७३ दरम्यान कर्नाटक मधील वाघांची कमी होत असलेली लोकसंख्या लक्षात घेता वाघांचे संरक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७३ मध्ये ह्या प्रकल्पाला सुरूवात केली होती.
असे सांगितले जाते आहे की जेव्हा ह्या प्रकल्पाला आरंभ करण्यात आला तेव्हा येथील वाघांची लोकसंख्या फक्त १२ होती पण ह्या प्रकल्पाला सुरूवात केल्यानंतर वाघांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्यात आल्यानंतर येथील वाघांची संख्या ही १७३ इतकी झाली आहे.
असे सांगितले जाते की इथे वाघांसोबत हत्ती सिंह असे अनेक प्रकारचे प्राणी देखील आपणास पाहावयास मिळतात.
नरेंद्र मोदी कर्नाटक मध्ये का रवाना झाले आहेत?
न्युज चॅनलवर असे सांगितले जाते आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक मधील टायगर रिझर्व प्रोजेक्टला ५० वर्षे पुर्ण झाल्यामुळे त्याचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे ह्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी नरेंद्र मोदी कर्नाटक येथे रवाना झाले आहेत.
असे सांगितले जात आहे की ह्याच दरम्यान नरेंद्र मोदी वाघांच्या सफारीचा आनंद लुटणार आहेत अणि याचसोबत आपल्या भारत देशातील वाघांच्या सध्याच्या आकडेवारीची एकुण संख्या सुद्धा जाहीर करणार आहेत.
व्याघ्र संवर्धन संरक्षणासाठी विविध उपक्रम देखील सुचवणार आहेत.
बांदीपुर टायगर रिझर्व प्रोजेक्टचे फायदे –
टायगर रिझर्व प्रोजेक्ट मुळे भारत देशातील वाघांच्या घटत्या संख्येला आळा बसण्यास मदत झाली आहे.वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे.