पैशांची बचत – How To Save Money In Marathi
आज पैसे तर आपण सगळेच कमावतो पण त्या कमावलेल्या पैशांची बचत करणारे खुपच मोजके जण असतात.
कारण आपल्यातील काही जण अशा मतांचे असतात की आजचा आलेला सर्व पैसा आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करण्यात,हौसमौस चैनचंगळीच्या वस्तु खरेदी करण्यात आजच खर्चुन टाकायचा कारण उद्या कोणी बघितला आहे.
ही गोष्ट नक्की आहे मित्रांनो की उद्या काय होईल हे आपण काहीच सांगु शकत नाही.
म्हणुन आपण नेहमी वर्तमानाचा आनंद घ्यायला हवा वर्तमानात जगायला हवे.
पण वर्तमानाचा आनंद घेण्याचा अर्थ हा असा नसतो की आपण निरर्थक अशा वस्तु खरेदी करण्यात चैनचंगळ करण्यात सर्व कमविलेला पैसा खर्च करावा ज्याची आपल्याला मुळीच आवश्यकता नाही.
आपण आपल्या कमविलेल्या पैशांमध्ये काही टक्के पैशांची नेहमी बचत करायला हवी.
कारण अडीअडचण कधी आणि केव्हा आयुष्यात येईल हे आपण कोणीच सांगु शकत नाही.म्हणुन यासाठी आपण आधीपासुनच आर्थिक दृष्टया सज्ज आणि सावध असणे फार गरजेचे आहे.
आपल्याला देखील आपल्या अडीअडचणीसाठी पैशांची बचत करता यावी याचसाठी आज आपण पैशांची बचत कशी करावी?आणि त्यासाठी आपण काय काय करायला हवे याविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
दुर्मिळ संकरित सूर्यग्रहण कुठे आणि कसे पहावे?
आपल्या पैशांची बचत करण्यासाठी आपण काय करायला हवे – How To Save Money In Marathi
पैसा तर आपण सगळेच कमवतो पण तो कमविलेला पैसा आपल्याला मँनेज देखील करता येणे खुप महत्वाचे आहे.
कारण आज आपण मनी मँनेजमेंट शिकलो तरच आपल्याला भविष्यासाठी,वर्तमानातील अडीअडचणीसाठी पैशांची बचत करता येईल.
म्हणुन आज आपण पैशांची बचत करण्यासाठी काय काय करायला हवे?तसेच काय काय करणे गरजेचे आहे?हे समजून घेऊया.
आधी बचत मग खर्च :
आपल्याला जर खरच पैशांची बचत करायची असेल तर आपण आधी बचत मग इतर खर्च ही सवय स्वताला लावायला हवी.
कारण जेव्हा आपली सँलरी,तसेच इन्कम येत असते सगळयात पहिले आपण त्या सँलरीचा जीवनावश्यक तसेच इतर चैनचंगळीच्या वस्तु खरेदी करण्यात खर्च करत असतो.
आणि मग उरले सुरलेले थोडेफार पैशांची बचत करत असतो.असे केल्याने आपल्याला पाहिजे तेवढया पैशांची बचत करता येत नाही.आणि आपले बचतीचे मुख्य आर्थिक ध्येय आपणास पुर्ण करता येत नसते.
म्हणुन आपण आपल्या प्रत्येक महिन्याच्या सँलरीमधील 10 टक्के पैसे आधी सेव करायला हवे.मग इतर खर्च करायला हवा.
ग्रीड आणि नीड या दोघांमधील फरक ओळखायला हवा:
आपल्या गरजा ह्या खुप मोजक्याच असतात ज्या आपण काही पैशातच भागवू शकतो.पण आपली हौस मौस अधिक प्राप्त करण्याचा हावरटपणा हा आपल्याला गरज नसलेली वस्तु देखील खरेदी करण्यास भाग पडत असतो.
म्हणुन आपण कुठलीही वस्तु खरेदी करण्याआधी स्वताला एक प्रश्न विचारायला हवा.
● ही वस्तु खरेदी करणे माझ्यासाठी आत्ता खरच खुप गरजेचे आहे का?आणि समजा आपले उत्तर होय असे येत असेल तरच आपण ती वस्तु खरेदी करावी अन्यथा नाही.
आपली ग्रीड आणि नीड कशी ओळखावी?
● संपर्कासाठी मोबाईल खरेदी करणे ही आपली नीड असु शकते पण तो मोबाईल साधा आणि कमी पैशांचा नही तर चांगला 25 हजाराचाच महागडा असायला हवा. ही आपली नीड नाही तर एक ग्रीड आहे जी आपण लक्षात घ्यायला हवी.आणि तिचा त्याग करायला हवा.
फक्त गरजेपुरताच खर्च करणे आणि अधिकाधिक पैशांची बचत करणे :
पैशांची बचत करण्याचा अजुन एक मार्ग म्हणजे गरजेपुरताच खर्च करणे आणि उरलेल्या पैशांची जास्तीत जास्त बचत करणे हा आहे.
याने आपण जास्तीत जास्त पैशांची अडीअडचणीच्या काळासाठी बचत करू शकतो.त्यासाठी आपण वायफळ खर्च करणे बंद करायला हवे.
अत्यावश्यक आणि जीवनाश्यक वस्तु खरेदी करण्यासाठीच पैसे खर्च करायला हवे.चैन चंगळ तसेच इतरांना शो आँफ करण्यासाठी कुठलीही वस्तु खरेदी करायची नाही.ह्या नियमांचे पालन करायला हवे.
आपल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणे :
आपण आपल्या प्रत्येक छोटयात छोटया खर्चाचा देखील हिशोब ठेवायला हवा याने आपला पैसा कुठे खर्च करतो आहे? कसा खर्च होतो आहे? आणि किती प्रमाणात खर्च होतो आहे याचा रेकाँर्ड आपल्याकडे राहील.
याचा अजुन एक हा फायदा होईल की ज्या ठिकाणी आपले पैसे विनाकारण खर्च होता आहे तो खर्च आपल्या चटकन लक्षात येईल आणि आपण तो खर्च करणे टाळु शकतो.किंवा कायमचे बंद करू शकतो.
अनावश्यक शाँपिंग तसेच आँनलाईन वस्तुंची खरेदी बंद करायला हवी-
आपल्यातील खुप जणांना नेहमी नवनवीन आँनलाईन विक्रीस येणारे लेटेस्ट मोबाईल लेटेस्ट वस्तु प्रोडक्ट खरेदी करण्याची आँनलाईन कपडयांची तसेच इतर वस्तुंची शाँपिंग करायची सवय असते.ती आपण टाळायला हवी.
हाँबी तसेच हौस मौस म्हणून कुठलीही वस्तु खरेदी न करता आपण गरज असेल तेव्हाच शाँपिंग तसेच कुठल्याही वस्तुची खरेदी करायला हवी.
कशासाठी बचत करायची आहे आणि किती बचत करायची आहे हे नमुद करून ठेवावे-
आपण आपल्याला कशासाठी बचत करायची आहे आणि किती बचत करायची आहे हे एका डायरीत नमुद करून ठेवायला हवे.
याने आपल्याला आपल्या बचतीचे मुख्य उददिष्ट माहीत असल्याने त्यानुसार दर महिन्याला तेवढया फिक्स रक्कमेची बचत करता येईल.आणि याने आपले बचतीचे मुख्य उददिष्ट देखील लवकरात लवकर पुर्ण होईल.
डोक्यावर कुठलेही कर्जाचे ओझे ठेवू नये :
आपण आपल्या डोक्यावर कुठल्याही बँकेच्या कर्जाचे किंवा कोणाच्या उधारीचे ओझे ठेवू नये.कारण कर्ज घेतल्यानंतर घेतलेले कर्ज आणि त्याचे वरचे व्याज फेडण्यातच आपली सर्व कमाई जाऊन लागत असते ज्याने आपल्याला पैशांची हवी तेवढी बचत करता येत नाही.
म्हणुन आपण शक्यतो कर्ज घेणे टाळायलाच हवे आणि जरी थोडेफार कर्ज घेतले घेतले असेल तरी ते लवकरात लवकर फेडुन मोकळ व्हावे.
दिर्घकाळासाठी गुंतवणुक करणे :
आपण आपल्या पैशांची बचत करून त्यातील काही काही पैसे लाँग टर्मसाठी अशा एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवायला हवे जिथून आपल्याला भविष्यात चांगले रिटर्न प्राप्त होतील.
क्रेडिट कार्डचा गरजेपुरताच आणि मोजकाच वापर करणे :
आपल्याकडे जेव्हा क्रेडिट कार्ड असते तेव्हा आपण गरज नसलेली कुठलीही वस्तु क्रेडिट कार्डने खरेदी करत असतो.ज्याने आपल्याकडे अडीअडचणीत कुठलीही सेविंग उरत नसते.
म्हणुन आपण शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर करणे टाळावे किंवा क्रेडिट कार्डचा मर्यादीतच वापर करावा.
खर्चावर नियंत्रण ठेवणे :
आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे उठसुठ कुठलीही वस्तु खरेदी करत बसु नये.
यासाठी आपल्याला दर महिन्याला लागत असलेल्या गरजेच्या वस्तुंची महिन्याच्या खर्चाची एक यादी करून घ्यावी आणि त्यापलीकडे कुठलीही वस्तु खरेदी करण्यात वायफळ खर्च करायचा नाही असा दृढ निश्चय मनाशी करायचा.
नेहमी हाँटेलातुन जेवण मागवणे बंद करावे –
आपल्यातील खुप जण असे असतात ज्यांना आँनलाईन अँप्सवरून तसेच आसपासच्या हाँटेलातुन जेवण आँडर करायची सवय असते.
याने आपले रोजच्या हाँटेलातील खाण्यातच खुप बचत पैसे खर्च होत असतात ज्याने आपली वरची बचत हाँटेलातील खाणे मागवण्यातच खर्च होऊन जात असते आणि शिवाय हाँटेलातील जेवणात अधिक तेल असते,तळलेले पदार्थ जंक फुड असतात.
जे आपल्या शरीरासाठी घातक असते.ज्याने आपली तब्येत बिघडुन आपल्याला दवाखान्याचा खर्च देखील उचलावा लागु शकतो.
म्हणुन आपण रोज हाँटेलातुन जेवण मागवणे बंद करायला हवे.विरंगुळा म्हणुन चेंज म्हणुन महिन्यातुन एकदाच हाँटेलचे अन्न खायला हवे.