भारतातील 10 बेस्ट क्रेडिट कार्ड – 2021 – Best credit cards information Marathi

भारतातील 10 बेस्ट क्रेडिट कार्ड – 2021 – Best credit cards information Marathi

आज क्रेडिट कार्डचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात.आणि ह्या उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय असा निवडणे ज्यात आपल्या गरजा देखील पुर्ण होत असतात.आणि ते आपल्या जीवणशैलीशी देखील मँच होत असते.हे आपल्यासाठी थोडे अवघड ठरत असते.

आज क्रेडिट कार्ड आँफर करत असलेल्या अनेक कंपन्या विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड आपल्याला आँफर करत असतात.आणि यात त्यांचे देखील काही फायदे असतात.जे पुर्ण करण्यासाठी ते आपल्यासमोर काही पात्रतेच्या अटी ठेवत असतात.आणि निर्धारीत शुल्क देखील आकारत असतात.

अशा परिस्थितीत आपण देखील आपल्या गरजांना आणि जीवणशैलीला अनुकुल असे क्रेडिट कार्ड शोधत असतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण आपल्या गरजा आणि जीवणशैलीस अनुकुल अशा भारतातील 2021 मधील काही बेस्ट क्रेडिट कार्डची माहीती सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपल्याला कँश बँक,रिवाँर्डस,शाँपिंग,फ्युल आणि ट्रँव्हलिंग इत्यादी मध्ये चांगली सुट देखील प्राप्त होणार आहे.आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व क्रेडिट कार्ड विविध उत्पन्न पातळी असलेल्या तसेच क्रेडिट प्रोफाईल असलेल्या कस्टमरसाठी डिझाईन करण्यात आलेली आहेत.

म्हणजे यात हाय इन्कम आणि हाय इस्टेट असलेल्या व्यक्तींचा नाही तर सर्व क्रेडिट प्रोफाईल असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे.ही ह्या सर्व क्रेडिट कार्डची वैशिष्टये आहेत.

2021 मधील भारतातील 10 बेस्ट क्रेडिट कार्ड कोणकोणती आहेत?

2021 मधील भारतातील दहा बेस्ट क्रेडिट कार्डची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) अँक्सिस बँक ACE :

2) एस बी आय कार्ड ई लाईट :

3) एचडी एफसी रिगालिया क्रेडिट कार्ड :

4) फ्लीप कार्ट अँक्सिस बँक क्रेडिट कार्ड :

5) अँमेझाँन पे आयसी आयसी आय क्रेडिट कार्ड :

6) सिटी प्रिमियर मिल्स क्रेडिट कार्ड :

7) एचडी एफसी मिलेनिया क्रेडिट कार्ड :

8) स्टँन्डर्ड चार्टड डिजी स्मार्ट :

9) एच एस बीसी कँश बँक क्रेडिट कार्ड :

10) एचडी एफसी बँक डिनर क्लब प्रिव्हीलेज :

1)अँक्सिस बँक ACE :

अँक्सिस बँक ACE क्रेडिट कार्ड हे कँशबँकसाठी भारतातील सर्वोत्तम क्रेडिट कार्ड म्हणुन ओळखले जाते.कारण हे क्रेडिट कार्ड 2 टक्के पेक्षा अधिक कँशबँक दरात आपणास उपलब्ध होते.

आँक्सिस बँक एसीई क्रेडिट कार्डची वैशिष्टये :

  • जाँईनिंग फी ही 499 रूपये इतकी आहे.
  • आणि समजा पहिल्या 45 दिवसांत दहा हजार खर्च केले तर जास्त देखील फी आकारली जाते.
  • कार्ड रिनिव्हल करण्यासाठी आपल्याला 499 रुपये लागत असतात.पण जर समजा आपण मागील वर्षामध्ये दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक खर्च ह्या क्रेडिट कार्डवरून केला तर जास्त देखील रिनिव्हल चार्जेस घेतले जाऊ शकतात.
  • ह्यासाठी आपले इन्कम किमान किती असावे लागते हे सोर्सिग करताना आपल्याला सुचित केले जाते.
See also  भारतात कधी साजरी होणार ईद? तारीख, महत्त्व | When Is Eid Al-Fitr 2023 In Marathi

आँक्सिस बँक एसीई क्रेडिट कार्डचे फायदे :

  • गुगल पे चा वापर करून जर आपण एखादे बिल पे केले तसेच मोबाईलला रिचार्ज केला तर त्यावर आपल्याला 5 टक्के कँशबँक दिला जातो.
  • स्वीगी,झोमँटो,ओला इत्यादी आँनलाईन आँडर्रवर बुकिंगवर आपल्याला 4 टक्के कँशबँक मिळत असतो.
  • आणि प्राप्त केलेल्या कँशबँकवर कोणतीही कमाल मर्यादा लागु नसते.
  • बाकीच्या इतर खर्चावर देखील कमीत कमी दोन टक्के सवलत प्राप्त होत असते.
  • प्रत्येक कँलेंडर ईयरमध्ये आपल्याला चार मोफत लाऊंजला भेट देता येते.यातही 400 ते 4000 ट्रान्झँक्शन मध्ये एक टक्के इंधन दर आपल्याला माफ होत असते.

2) एस बी आय कार्ड ई लाईट :

 

 

एसबी आय कार्ड ई लाईट हे एक उत्तम क्रेडिट कार्ड आहे ज्यात आपल्या हाय फाय लाईफ स्टाईलला अनुकुल सुविधा प्रदान करण्यात येतात.

यात आपल्याला प्रिमियम ब्रँण्डची शाँपिंग व्हाऊचर्स, मुव्ही तिकिट,वेलकम गिफ्ट देखील दिले जाते.

मोफत लाऊंज भेट तसेच रिवाँर्ड पाँईण्ट देखील मिळतात.

एस बी आय कार्ड ई लाईटचे फायदे :

  • ईयरली चार्जेस 4,999 + जीएसटी
  • रिनिव्हल चार्जेस 4,999 + जीएसटी
  • ह्यासाठी आपले महिन्याचे इन्कम किमान 60,000 असावे लागते.
  • फ्री मुव्ही तिकिटस एका वर्षात सहा हजार आणि महिनाभरात 250 व्हाऊचर्स.
  • किराणा खरेदी करताना आँनलाईन फुड आँडर्र करताना क्रेडिट कार्डवर 5 एक्स रिवाँर्ड पाँईण्ट दिला जात असतो.
  • मोफत प्रायाँरिटी पाससोबत जगातील कुठल्याही हजार विमानतळ लाऊंजमध्ये इंट्री.याचसोबत आपल्याला एका वर्षामध्ये 6 फ्री विमानतळ लाऊंज भेटी आणि दोन देशांतर्गत लाऊंज भेटी देखील देण्यात आल्या आहेत.

3) एचडी एफसी रिगालिया क्रेडिट कार्ड :

एच डी एफसी रिगालिया क्रेडिट कार्डवर आपल्याला जेवण,प्रवास,आणि खरेदीवर मोठा लाभ प्राप्त होत असतो.

जे कस्टमर आपला सर्वागिन फायदे शोधत असतात त्यांच्यासाठी हे एक बेस्ट क्रेडिट कार्ड आहे.

  • यात जाँईनिंग फी 2,500 असते + जीएसटी
  • रिनिव्हल चार्जेस 2,500 इतके असते.+ जीएसटी
  • ह्यासाठी आपले मंथली इन्कम किमान 70,000 असावे लागते.
  • प्रत्येक कँलेंडर ईयरमध्ये 12 फ्री नँशनल विमानतळ लाऊंज मध्ये प्रवेश
  • जगभरातील रेस्टाँरंटमध्ये गुड फुड ट्रेल डायनिंग प्रोग्रँम अंतर्गत जेवणाची सुविधा करण्यात येते.
  • इंशुरन्स,शिक्षण,भाडे इत्यादी संबंधित किरकोळ खर्चावर चार टक्के रिवाँर्ड पाँईण्ट देण्यात येतो.
  • फ्लाईट बुकिंग,हाँटेल बुकिंग इत्यादी सुविधांमध्ये चांगली सुट
  • एक करोडचा अँक्सीडेंटल डेथ कव्हर देखील ह्यात देण्यात येतो.

4) फ्लीप कार्ट अँक्सिस बँक क्रेडिट कार्ड :

फ्लीप कार्ट अँक्सिस बँक क्रेडिट कार्ड वरून आपल्याला फ्लीप कार्ट तसेच मंतरा वरून आँनलाईन खरेदी करताना 5 टक्के कँशबँक प्राप्त होते.

तसेच स्विगी,ऊबर,क्युअर फिट वरून आँनलाईन आँडर्र केल्यावर आपल्याला चार टक्के कँश बँक मिळत असतो.

  • सर्व आँनलाईन तसेच आँफलाईन खरेदीवर5 टक्के कँशबँक मिळत असतो.
  • यात आपल्याला ईयरली चार्जेस 500 रूपयांपर्यत आकारला जातो.
  • रिनिव्हल चार्जेस सुदधा 500 रूपये असतो.

मागील वर्षी दोन लाख खर्च करण्याबाबद सवलत देखील प्राप्त होत असते.

  • सँलरी घेऊन नोकरी करत असलेल्यांसाठी इन्कमची अट महिन्याचे 15 हजार आणि ज्यांचा स्वताचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी 30 हजार महिना अशी ठेवण्यात आली आहे.
  • भारतामध्ये प्रत्येक वर्षी चार फ्री लाऊंज प्रवेश देखील ह्यात देण्यात आले आहे.
  • तसेच भारतातील प्रत्येक पेट्रोल पंपवर इंधन भरण्यात एक टक्के सुट देखील देण्यात येते.
See also  आज वैशाख अमावस्या, जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजा पद्धती | Vaishakh Amavasya 2023 info In Marathi

5) अँमेझाँन पे आयसी आयसी आय क्रेडिट कार्ड :

अँमेझाँन पे आयसी आयसी आय क्रेडिट कार्ड हे भारतातील को ब्रँण्डेड कार्ड मानले जाते.अँमेझाँन वरून आँनलाईन खरेदी करताना यात आपल्याला सर्व खर्चावर कँश बँकची आँफर देखील मिळत असते.याचसोबत इतर प्लँट फाँर्मवरून इतर खरेदी केल्यावर देखील आपण कँशबँक प्राप्त करू शकतो.

बाकीच्या क्रेडिट कार्डमध्ये जशी आपल्याला जाँईनिंग फी रिनीव्हल चार्जेस भरावे लागतात तसे कुठलेही चार्जेस आपल्याला इथे भरावे लागत नसतात.यात इन्कम किती असावे लागते हे देखील सोर्सिगच्या वेळेतच सांगितले जात असते.

  • अँमेझाँन प्राईम कस्टरला खरेदी करताना चालु आँफर सोबत पाच टक्के कँशबँक देखील दिला जातो.
  • एवढेच नाही तर नाँन प्राईम कस्टमरला देखील 3 टक्के कँश बँक मिळत असते.
  • मोबाईल रिचार्ज बिल पेमेंटवर देखील दोन टक्के कँश बँक आँफर दिली जाते.
  • सर्व प्रकारच्या खरेदीवर कमीत कमी एक टक्के कँश बँक मिळतो.
  • कोणत्याही खरेदीवर ईएम आय भरावा लागत नाही.
  • भारतातील प्रत्येक पेट्रोल पंपवर इंधन भरण्यास 1 टक्के सुट देखील दिली जाते.

6) सिटी प्रिमियर मिल्स क्रेडिट कार्ड :

  • सिटी प्रिमियर मिल्स क्रेडिट कार्डचे ईयरली चार्जेस तीन हजार रूपये + जीएसटी आहेत.
  • रिनिव्हल चार्जेस देखील 3000 +जीएसटी आहे.
  • यासाठी आपले इन्कम कमीत कमी 25 हजार महिना असावे लागते.
  • भालतामधील विमानतळ लाऊंजमध्ये आठदा फ्री इंट्री

7) एचडी एफसी मिलेनिया क्रेडिट कार्ड :

यात आपल्याला प्रत्येक व्यवहारावर कँशबँकची सुविधा दिली जात असते.

  • ह्या कार्डचे वैशिष्टय हे देखील आहे की हे कार्ड कस्टमरच्या मागील हजारो वर्षीच्या खर्चाची पदधत जाणुन घेऊन त्याप्रमाणे तयार केले गेले आहे.
  • आणि हे कार्ड अशा व्यक्तींसाठी फार फायदेशीर आहे ज्यांना आँनलाईन शाँपिंग तसेच कुठलीही खरेदी करायला आवडत असते.
  • यात आपल्याला कँश बँक सोबत फ्री लाऊंजची सुविधा देखील देण्यात येत असते.
  • याचे जाँईनिंगचे ईयरली चार्जेस 1000 आहेत.आणि मागील वर्षात जर आपण एक लाखापर्यत खर्च केला तर आपल्याला चांगली सुट देखील दिली जाते.
  • यात उत्पन्नाची अट नोकरदारांसाठी 35000 आणि स्वताचा उद्योग व्यवसाय असलेल्यांसाठी 6 लाखाचे इन्कम असावे लागते.

आपण जर अँमेझाँन,मँत्रा,स्विगी,झोमँटो,ऊबर अशा आँनलाईन प्लँटफाँर्मवरून खरेदी केली किंवा काही आँडर्र दिली तर त्यात आपल्याला पाच टक्के कँशबँक दिला जातो.

बाकीच्या इतर खर्चावर देखील 1 टक्के कँशबँक दिला जातो.आणि जाँईनिंग फी भरून झाल्यावर आपल्याला कँश पाँईण्ट देखील दिले जातात.

आणि भारतातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलमध्ये एक टक्के सुट देखील दिली जाते.

8) स्टँन्डर्ड चार्टड डिजी स्मार्ट कार्ड:

आपल्याला जर आँनलाईन शाँपिंग,ट्रँव्हलिंग हाँटेल रेस्टाँरंटमधून आँनलाईन आँफलाईन फुड आँडर करणे यात चांगली आँफर देणारे कार्ड हवे असेल तर आपण स्टँन्डर्ड चार्टड डिजी स्मार्ट क्रेडिट कार्डची निवड करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

  • मंत्रा,यात्रा,झोमँटो यासारख्या प्लँटफाँर्मवरून खरेदी करण्यासाठी हे कार्ड अधिक उपयुक्त ठरते.
  • यात महिन्याचे जाँईनिंग जार्जेस हे 49 रूपये इतके आहे
  • आणि रिनिव्हल चार्जेस देखील 49 आहेत आणि मागील महिन्यात जर आपण पाच हजारपेक्षा अधिक खरेदी केली तर चांगली सुट देखील मिळत असते.
  • यात उत्पन्नाची अट 50 हजार मंथली ठेवण्यात आली आहे.
  • यात मँत्रा डाँट काँमवर खरेदी केल्यावर दर महिन्याला 20 टक्के सुट दिली जाते.
  • दर महिन्यातुन पाच वेळेस ग्रोफर वर दहा टक्के सुट देखील दिली जाते.
  • झोमँटोवरील कोणत्याही ट्रान्झँक्शनवर महिन्यातुन पाच वेळेस 10 टक्के सुट
  • नँशनल एअरपोर्टवर 20 टक्के तर इंटरनँशनल एअरपोर्टवर देखील 10 टक्के सुट
  • ईनाँक्स मुव्हिजवर फ्री मुव्हिज तिकिट देखील मिळते.
See also  म्युझिक थेरपी उपचार अणि करिअर संधीविषयी माहीती Music therapy treatment and career opportunity information in Marathi

9) एच एस बीसी कँश बँक क्रेडिट कार्ड :

जे लोक वारंवार खरेदी करतात आणि त्यांना नेहमी काहीतरी खरेदी करायला आवडते अशा व्यक्तींनी हे क्रेडिट कार्ड वापरायला हवे.

  • कारण यात प्रत्त्येक खरेदीवर आपल्याला कँश बँक मिळत असतो.
  • यात जाँईनिंग फी काहीच नसते.आणि रिनिव्हल चार्ज देखील फक्त 750 असतो विद जीएसटी.
  • यासाठी आपले उत्पन्न दरवर्षी 400,000 असावे लागते
  • नँशनल तसेच इंटरनँशनल विमानतळ लाऊंजमध्ये प्रवेश
  • ईएम आयवर कँशबँक लागु अशा अनेक सुविधा यात दिल्या जातात.आणि क्रेडिट कार्डची रक्कम आपण ईएम आयवर देखील पे करू शकतो.

10) एचडी एफसी बँक डिनर क्लब प्रिव्हीलेज :

हे क्रेडिट कार्ड हे एक आँ राऊंडर क्रेडिट कार्ड आहे कारण यात आपण शाँपिंग,ट्रँव्हलिंग,प्रिमियम साठी देखील लाभ उठवू शकतो.

  • या कार्डचा वापर करत असलेल्या कस्टमरला मंथली माईलस्टोन तसेच सबस्क्रिप्शनचा देखील हक्क दिलेला असतो.या कार्डचा वापर आपण इंशुरन्स सोबत जिम,स्पा,कटिंग इत्यादीसाठी देखील करू शकतो.
  • याची जाँईनिंग ठी 2,500 इतकी असते तर ईयरली चार्जेस देखील 2,500 असतो.
  • यात किमान उत्पन्नाची मर्यादा 70,000 ठेवण्यात आली आहे.जगभरातील १००० पेक्षा अधिक लाऊंजमध्ये आपण १२ विमानतळ लाउंज प्रवेश करू शकतो.
  • एक कोटीचा हवाई डेथ कव्हरेज अशा अनेक सुविधा यात दिल्या जात असतात.

आपण आपल्यासाठी उत्तम क्रेडीट कार्डची निवड कशी करावी?

आपण आपल्यासाठी उत्तम क्रेडिट कार्डची निवड करण्यासाठी पुढील स्टेप्स फाँलो करायला हव्यात :

1)आपण क्रेडिट कार्डची सुविधा कशासाठी घेतो आहे आधी निश्चित ठरवायला हवे.म्हणजेच आपण क्रेडिट कार्ड मोठी खरेदी करता यावी यासाठी घेतो आहे का हाय क्रेडिट लिमिटेशन मिळण्यासाठी किंवा आँफर मिळण्यासाठी करतो आहे हे निश्चित करून त्यानुसार क्रेडिट कार्ड निवडायला हवे.

2) आपल्याला क्रेडिट कार्ड का हवे आहे हे समजून झाल्यावर आपण आपले क्रेडिट प्रोफाईल चेक करून कोणत्या क्रेडिट कार्डला आपले प्रोफाईल मँच करते आहे हे बघून क्रेडिट कार्ड निवडायला हवे.

3) आपल्या पात्रतेनुसार आपण काही क्रेडिट कार्डची निवड करून त्याची यादी तयार करायला हवी.याने आपला वेळ शोधाशोध करण्यात जो वेळ जातो तो देखील वाचतो.

4) ज्या क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला आपल्या बजेटनुसार आणि आपल्याला हव्या त्या सर्व सोयी सुविधा मिळत असतात आपण असे एकच क्रेडिट कार्डची निवड करायला हवी.

क्रेडिट कार्डविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न –

1) भारतामध्ये कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वात उत्तम आहेत

भारतात आज अनेक बँक क्रेडिट कार्डच्या आँफर देणारी बँका उपलब्ध आहेत ज्यात एचडीएफसी,एसबीआय,कोटक महिंद्रा इत्यादी बँक ह्या सर्वात लोकप्रिय बँका म्हणुन ओळखल्या जातात.

2) भारतातील सर्व सर्वोत्तम क्रेडिट कार्डमध्ये वर्षाला उच्च शुल्क आकारणी केली जाते का?

भारतात काही असे देखील क्रेडिट कार्ड आहेत जे आपल्याला फ्री आँफ चार्जेस सुविधा देतात तसेच मिनिमम चार्जेस मध्ये उच्च सुविधा देतात.

ज्यात एचडीएफसी मनीबँक,आयसी आयसी आय अँमेझाँन पे क्रेडिट कार्ड,सिटी कँश बँक क्रेडिट कार्डसारख्या बँकाचा समावेश होतो.

1 thought on “भारतातील 10 बेस्ट क्रेडिट कार्ड – 2021 – Best credit cards information Marathi”

Comments are closed.