म्युझिक थेरपी उपचार अणि करिअर संधीविषयी माहीती Music therapy treatment and career opportunity information in Marathi

Table of Contents

म्युझिक थेरपी -Music therapy treatment and career opportunity information in Marathi

मित्रांनो कानात हेडफोन टाकुन मोबाइल वर सुमधुर गाणे ऐकायला आपणा सर्वानाच आवडते.

जेव्हा आपण कधी गाडीने प्रवास करत असतो तेव्हा आपण टाईमपास म्हणुन प्रवासात कानात हेडफोन लावून सुमधुर गाणे ऐकत असतो.

किंवा रोजच्या प्रवास,लगबगीने कामाच्या तणावाने गोंधळाने जेव्हा आपण एकदम थकलेलो असतो तेव्हा सुदधा आपण आपला माईंड रिलँक्स करायला गाणे ऐकत असतो.

मनोरंजनाचे एक चांगले अणि प्रभावी साधन म्हणुन आपण म्युझिककडे बघतो.

पण म्युझिक आज ऐवढयापुरतेच सीमीत राहीलेले नाहीये टाईमपास अणि मनोरंजन या व्यक्तीरीक्त देखील
म्युझिकचे अनेक आरोग्यास लाभदायी असे फायदे आहेत.

हे मेडिकल सायन्सने देखील मान्य केले आहे.म्युझिक ऐकल्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच,माईंड शांत होतो दिवसभराचा थकवा कमी होत असतोच शिवाय अनेक आजार देखील याने बरे होतात हे रिसर्चमधुन सिदध झाले आहे.

म्हणुनच म्युझिकला एक थेरपी म्हणुन रूग्णांना बरे करण्यासाठी आज विविध हाँस्पिटलमध्ये वापरण्यात येत आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच म्युझिक थेरपीविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

म्युझिक थेरपी म्हणजे काय?Music therapy meaning in Marathi

म्युझिक थेरपी हा सुदधा रूग्णांना बरे करण्यासाठी हाँस्पिटलमध्ये वापरल्या जात असलेल्या एक थेरपीचाच उपचाराचाच एक मुख्य प्रकार आहे.

यात हाँस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या रूग्णांना म्युझिक थेरपी उपचार देऊन सुमधुर संगीताच्या माध्यमातुन बरे केले जाते.

म्युझिक थेरपीचे प्रकार

म्युझिक थेरपीच्या पदधती कोणकोणत्या आहेत?

म्युझिक थेरपीमध्ये पुढील बाबींचा समावेश होत असतो-

म्युझिक थेरपी मध्ये एखादे सुमधुर संगीत गाणे ऐकण्याचा समावेश तर होतोच याचशिवाय यामध्ये एखादे म्युझिकल इंस्टुमेंट वाजवणे,गाणे लिहिणे,गाणे म्हणने इत्यादींचा समावेश देखील होतो.

See also  CIBIL म्हणजे काय ? CIBIL full form in Marathi

म्युझिक थेरपीच्या काही प्रमुख पदधती तसेच प्रकार –

1)गृप म्युझिक थेरपी सेशन –

सिंगालाँग नावाचे हे एक म्युझिक थेरपी सेशन असते जे डाँक्टर रूग्णांना बरे करण्यासाठी वापरत असतात.

सिंगालाँग म्युझिक थेरपीमध्ये रूग्णाच्या शरीरातील तणावाचे स्तर कमी करण्यासाठी,शरीराला होत असलेल्या वेदना कमी करण्यासाठी,त्याच्या मुडमध्ये बदल घडुन आणण्यासाठी रूग्णाला एक म्युझिक थेरपी ट्रिटमेंट दिली जात असते.

यात सर्व रूग्ण मिळुन एकत्रितपणे म्युझिकल थेरपीस्टने एक्सपर्टसने लिहुन दिलेल्या तसेच सांगितलेल्या संगीताचे गायन करतात.

2) साँग राईटिंग –

ब्लँक आऊट सांँग राईटिंग ह्या म्युझिक थेरपीच्या प्रकारामध्ये डाँक्टर तसेच चिकित्सक हे रूग्णांना वेगवेगळया गाण्याचे बोल देत असतात.अणि ते गाण्याचे बोल ओळखुन त्यांना ते गाणे ओळखायचे असते.अणि लिहायचे असते.

3)सिंगिग साँग थेरपी –

यात रूग्णांना एखाद्या म्युजिशियनच्या मदतीने सांँग थेरपी दिली जाते.विविध हाँस्पिटलमध्ये रूग्णांना सुमधुर संगीत गाणे ऐकवून ठिक करण्यासाठी एक म्युझिक थेरपीस्टला अपाँईट केले जात असते.

यात म्युझिक थेरपीस्ट हा स्वता सुमधुर संगीत गाणे म्हणुन तसेच एखादे संगीत वाद्य वाजवून रूग्णांना बरे करण्याचे काम करत असतो.

याव्यतीरीक्त रूग्णांना विविध इंस्ट्रूमेंट वाजवायला सांगुन म्युझिकल इंस्ट्रुमेंट दवारे देखील बरे केले जाते.

म्युझिक थेरपीची आवश्यकता तसेच गरज,

रूग्णालयात रूग्णांना म्युझिक थेरपी का दिली जाते?

म्युझिक थेरपी ही अनेक शारीरिक आणि मानसिक विकार आजारांवर उपयुक्त आहे.

म्युझिक थेरपी हा मानसिक अस्वस्थता,कर्करोग,निद्रानाश,डिप्रेशन,स्ट्रेस,सिजोफ्रेनिया,पँरेलिसेस,डोकेदुखी,आँटिझम स्पेक्ट्रम डिसाँर्डर,अस्थमा,डिमेंशिया इत्यादी अशा अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य विषयक समस्या दुर करण्याचा उत्तम मार्ग आहे.

याचसोबत संगीत ऐकल्याने आपली बाँडी अणि मन देखील रिलँक्स होत असते.म्हणुन रूग्णालयात रूग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी मेडिसिन,इंजेक्शन सलाईन,आँपरेशन,टेस्ट ह्या ट्रिटमेंटसोबत म्युझिक थेरपीची ट्रिटमेंट सुदधा दिली जात असते.

म्युझिक थेरपीचे महत्व तसेच आरोग्यदायी फायदे-

● संगीत ऐकल्याने,संगीत म्हटल्याने,म्युझिकल इंस्ट्रुमेंट वाजवल्याने आपल्या मनस्थितीत परिवर्तन घडुन येत असते.

● म्युझिक ऐकल्याने बाँडी रिलँक्स होते अणि शरीरातील तणावाची पातळी कमी होत असते.

● आपणास वेदना होत असेल तर ती देखील काही प्रमाणात का होईना म्युझिक थेरपीमुळे संपुष्टात येते.

● ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा प्राँब्लेम आहे त्यांचा रक्तदाब कमी होत असतो.यासाठी आपल्या आवडीचे कुठलेही एक सुमधुर संगीत डोळे बंद करून मन एकाग्र चित्त करून ऐकावे लागते.

See also  गुड फ्रायडे २०२३ मराठीत । Good Friday 2023 In Marathi

● म्युझिकल थेरपीमुळे आपल्या हदयाचे ठोके देखील नियंत्रणात राहत असतात.आपला श्वास देखील नियंत्रित राहत असतो.

● मायग्रेन डोकेदुखीच्या आजारावर म्युझिक थेरपी हा एक चांगला पर्याय आहे कारण याने आपल्या मेंदुमधील रक्तवाहिनी शांत होतात अणि आपला मेंदु स्थिर होत असतो.

● असे देखील म्हटले जाते की म्युझिक थेरपीमुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढण्यास मदत होते.कारण म्युझिकमुळे आपल्या मेंदुला मँसेज पोहचतो अणि मग आपला मेंदु शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी आवश्यकता असलेले हार्मोन्स वाढविण्याचे काम करत असतो.

● म्युझिकल थेरपीमुळे मन शांत होतेच शिवाय आपला मेंदु देखील तल्लख होत असतो.

● ज्यांना विसरण्याची समस्या त्यांना देखील म्युझिक थेरपीमुळे फायदा होत असतो कारण याने स्मरण शक्तीत वाढ देखील होते.

● म्युझिक थेरपीमुळे आपला माईंड रिलँक्स होतो अणि त्यात हँपी हार्मोन्स देखील तयार होतात.

● मानसिक अस्वस्थता,कर्करोग,निद्रानाश,डिप्रेशन,स्ट्रेस,सिजोफ्रेनिया,पँरेलिसेस,डोकेदुखी,आँटिझम स्पेक्ट्रम डिसाँर्डर,अस्थमा,डिमेंशिया इत्यादी असे शारीरीक अणि मानसिक आजार आज म्युझिक थेरपीमुळे आजवर पुर्णत बरे झाले आहेत.अणि याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नसतो.

म्युझिक थेरपीस्ट कसे बनावे?

ज्यांना गायनाची आवड आहे,एखादे वाद्य संगीत वाजवायला आवडते अणि संगीत क्षेत्रात आपले करिअर करायची ईच्छा आहे अशा व्यक्तींसाठी म्युझिक थेरपी हे एक नवीन चांगले अणि उत्तम करिअर आँप्शन ठरू शकते.

भारतामध्ये म्युझिक थेरपी अजुन एवढी प्रचलित नाहीये पण लवकरच भारतात देखील ह्या क्षेत्राचा स्कोप वाढणार आहे.अणि दिवसेंदिवस वाढत देखील आहे.आज भारतातील विविध मोठमोठया हाँस्पिटलमध्ये रूग्णांना बरे करण्यासाठी म्युझिक थेरपीस्टला अपाँईट केले जात आहे.

म्युझिक थेरपीस्ट कोण असतो त्याचे काम काय असते?

म्युझिक थेरपीस्ट हा एक असा डाँक्टर असतो जो कुठलाही मानसिक तसेच शारीरिक विकार असलेल्या रूग्णांना इंजेक्शन गोळया औषधे न देता म्युझिकच्या माध्यातुन बरे करत असतो.त्यांच्यावर उपचार करत असतो.अणि त्यांना स्ट्रेस फी टेंशन मुक्त करत असतो.

म्युझिक थेरपीस्ट क्षेत्रात काम करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे?

म्युझिक थेरपीस्ट हा सर्व रूग्णांचे म्युझिकच्या माध्यमातुन मानसिक विकार दुर करत असतो म्हणुन यात म्युझिक थेरपीस्टला कुठल्या रुग्णाची मनोदशा कशी आहे मानसिक स्थिती कशी आहे हे समजायला हवे.यासाठी म्युझिक थेरपीस्टने रूग्णांच्या मनोदशेचा मानसिक स्थितीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

कारण म्युझिक थेरपीस्टला कुठल्या रूग्णाचा मनोदशा कशी आहे हे माहीत असेल तरच तो रूग्णावर उपचार करण्यासाठी नेमका कुठल्या पदधतींचा वापर करावा हे ठरवू शकेल.

याचसोबत रूग्णांसोबत मैत्रीपूर्ण प्रेमपुर्वक व्यवहार ठेवावा लागेल त्यांच्याशी एका मित्राप्रमाणे वागावे लागेल.आपण त्या रूग्णावर जो उपचार करीत आहे त्याने तो एकदिवस नक्की पुर्णत बरा होईल त्याचा मानसिक आजार नाहीसा होईल अशी खात्री त्या प्रत्येक रूग्णाला पटवून द्यावी लागेल.ज्यांच्यावर आपण उपचार करीत आहात.

See also  अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी का केली जाते? ह्या दिवशी सोने खरेदीचे महत्व काय आहे? - Why buy gold on Akshaya Tritiya?

म्युझिक थेरपीस्ट बनण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता योग्यता –

● आर्टस काँमर्स सायन्स या तिघांपैकी कुठल्याही एका क्षेत्रातुन आपण आपली बारावी पुर्ण केलेली असावी.फक्त त्यात मुख्य विषय संगीत घेतलेला असावा.

● याचसोबत सायकोलाँजी हा विषय घेऊन आपण बँचलर डिग्री घेतलेली असावी.उपचारापुर्वी रूग्णांची मानसिकता मनोदशा समजुन घेण्यासाठी सायकोलाँलीचे नाँलेज आपणास असायला हवे.

● संगीत ह्या विषयाचे उत्तम ज्ञान असायला हवे.

● यानंतर आपण म्युझिक थेरपीचा एखादा सर्टीफिकेट कोर्स करू शकतो.किंवा म्युझिक थेरपीमध्ये एखादा डिप्लोमा करू शकतो.

म्युझिक थेरपीस्ट म्हणुन आपण कुठे कुठे जाँबला लागु शकतो?

● एखाद्या प्रायव्हेट नर्सिग होम मध्ये आपण जाँबला लागु शकतो.

● म्युझिक थेरपीस्ट सेक्रेटिक हाँस्पिटलमध्ये सुदधा आपण जाँबला लागु शकतो.

● विविध हेल्थ एजंसीमध्ये आपण जाँबला लागु शकतो.

● एखाद्या रिहँबिलिटेशन सेंटरमध्ये आपण जाँब करू शकतो.

● विविध एनजीओ मध्ये एज्युकेशन सेंटर मध्ये म्युझिक टिचर म्हणुन आपण जाँबला लागु शकतो.

● आपल्या म्युझिक थेरपीदवारे लाखो दिव्यांग मुलांचे उपचार करू शकतो.

म्युझिक थेरपीस्ट क्षेत्रात आपण कोणकोणता व्यवसाय करू शकतो?

जर आपणास म्युझिक थेरपिस्ट मध्ये कुठेही जाँब न करता स्वताचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण स्वताचे एखादे म्युझिक थेरपिस्ट सेंटर सुरू करू शकतो.

म्युझिक थेरपीस्ट बनण्याचे फायदे –

● आपण आपले गायनाचे पँशन फाँलो करण्यासोबत लाखो रूग्णांची म्युझिक थेरपीदवारे सेवा करून मदत करून त्यांना बरे करून खुप पुण्य कमवू शकतो.देशातील रूग्णांना बरे करून देशाची समाजाची एक प्रकारे सेवा करू शकतो.

● याचसोबत आपल्याला एक चांगले वेतन देखील यात प्राप्त होत असते.

म्युझिक थेरपी कोर्स करण्यासाठी काही उत्तम काँलेज -best college for music therapy courses in Marathi

● नाद सेंटर फाँर म्युझिक थेरपी नवी दिल्ली

● मुंबई म्युझिक थेरपी ट्रस्ट इंडिया नवी दिल्ली

● चेन्नई मधील इंडियन इंस्टिटयुट आँफ मेडिकल थेरपी

● इंडियन असोसिएशन आँफ म्युझिक थेरपी

● सेंट मीरा काँलेज पुणे

म्युझिक थेरपीस्ट बनण्यासाठी कोणता कोर्स करायचा Courses of music therapy in Marathi

● म्युझिक थेरपीस्ट बनण्यासाठी आपण सेंट मीरा काँलेजमध्ये एक वर्षाचा तसेच दोन वर्षाचा फुल तसेच पार्ट टाईम पोस्ट ग्रंँज्युएट डिप्लोमा करू शकतो.

● नाद सेंटर फाँर म्युझिक थेरपी इथून आपण एखादा म्युझिक थेरपीचा सर्फिफिकिट कोर्स करू शकतो.हा कोर्स एक डिसटन्स लर्निग कोर्स असतो.

म्युझिक थेरपीस्टचे वेतन काय असते?music therapist salary in Marathi

जर आपण भारतात म्युझिक थेरपीस्ट म्हणुन लागले तर आपले वेतन किमान ३० ते ३५ हजार महिना इतके सुरूवातीला असणार आहे.जसजसा आपला ह्या क्षेत्रातील कामाचा अनुभव वाढतो तसतसे आपले वेतन अजुन वाढत जाते.

म्युझिक थेरपीविषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –

1) म्युझिक थेरपी हे एक उत्तम करिअर आँप्शन आहे का?याला भविष्यात स्कोप असेल का?

म्युझिक थेरपी हे एक बेस्ट करिअर आँप्शन आहे अणि याला भविष्यात देखील खुप स्कोप राहणार आहे.

कारण भारत देशात वाढता ताणतणाव,डिप्रेशन,टेंशनमुळे मानसिक विकारांचे प्रमाण मेंटल हेल्थचे आजार समस्या लोकांमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.