ओ एन-डी-सी म्हणजे काय ONDC चे फायदे ?ONDC project information in Marathi

ओ एन-डी-सी म्हणजे काय ONDC चे फायदे ?ONDC project information in Marathi

जगातील संपुर्ण ईकाँमर्स क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवुन आणणारा एक मोठा उपक्रम सरकार सध्या राबवत आहे ज्याचे नाव आहे ओएन डीसी.

आजच्या लेखात आपण सरकारच्या ह्याच महत्वाच्या उपक्रमाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

सोबत ह्या उपक्रमाला राबविण्यामागचे सरकारचे मुख्य उददिष्ट काय आहे?ह्या उपक्रमाचा कोणाकोणास फायदा होणार आहे?कोणता फायदा होणार आहे?अणि कोणाला तोटा होऊ शकतो काय तोटा होऊ शकतो हे देखील आपण समजुन घेणार आहे.

ओ एन डीसी चा फुलफाँर्म काय होतो?ONDC full form in Marathi

ओ एन डी सी चा फुलफाँर्म open network for digital commerce असा होतो.

ओ एन-डी सी म्हणजे काय?ONDC meaning in Marathi

ओएन डीसी हा एक जागतिक पातळीवरचा प्रथम उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाअंतर्गत ओ एन डी सी हे डिजीटल काँमर्ससाठी सुरू करण्यात आलेले एक ओपन प्रोटोकाँलवर आधारीत असे डिजीटल नेटवर्क तसेच प्लँटफाँर्म आहे.

डिपी आयायटी डिपार्टमेंट फाँर प्रमोशन आँफ इंडस्ट्री अँण्ड इंटरनल ट्रेड ह्या सरकारच्या एका विभागाने ओएन डिसी ह्या डिजीटल मक्तेदारीला संपुष्टात आणत असलेल्या प्रकल्पाला लाँच करण्यासाठी एक सल्लागार समितीचे गठन केले होते.

See also  एप्रिल महिन्यात बॅकेचे कामकाज इतके दिवस राहणार बंद Bank holiday April 2023 in Marathi

हे ईकाँमर्स क्षेत्राला ओपन सोर्स बनवण्यासाठी सरकारने उचललेले पहिले पाऊल आहे.

ओपन सोर्स म्हणजे काय? Open source meaning in Marathi

ओपन सोर्स म्हणजे जे सगळयांसाठी उपलब्ध आहे ज्याचा वापर सर्व जण करू शकतात.ज्याला कोणीही बघु शकते,त्यात हवे ते चेंजेस देखील करू शकते.आपल्या पदधतीने त्याचे वितरण करू शकते.

ओपन सोर्स प्लँटफाँर्म म्हणजे काय open source platform meaning in Marathi

ओपन सोर्स प्लँटफाँर्म म्हणजे एक असे प्लँटफार्म तसेच साँफ्टवेअर ज्याचा वापर सर्व आँनलाईन रिटेलर्सला करता येणार आहे.जे सगळयांसाठी उपलब्ध असणार आहे.एकदम त्याच पदधतीने ज्या पदधतीने युपी आयचा वापर सगळयांना आज करता येतो.

ओपन सोर्स प्लँटफाँर्मचा फायदा –

● ओपन सोर्स प्लटफाँर्मदवारे विक्रेता ज्या वस्तु विकणार आहे त्यांची आँनबोरडिंग सेलर्स,व्हेंडर डिस्कव्हरी,प्राईज,प्रोडक्ट कँटलाँग यात सहजपणे मेंशन करता येणार आहे.यात फाँरमेशन तयार करण्याची कुठलीही आवश्यकता राहणार नाही.

ओ एन डी सी नेमके काय करणार आहे?

ओएन डीसी हे अँमेझाँन अणि फ्लीपकार्ट प्रमाणे सर्व डिजीटल सेलर्स,विक्रेत्यांसाठी ओपन सोर्स प्लँटफाँर्म उपलब्ध करून देणार आहे.

जेणेकरून डिजीटल सेलर्स,विक्रेत्यांना आपल्या टारगेट कस्टमरपर्यत पोहचण्यास अधिक सोपे होणार आहे.

ओ एन डी सी चे प्रमुख उददिष्ट काय आहे?

वस्तु अणि सेवा यांच्या खरेदी तसेच विक्रीवर लादण्यात आलेली अँमेझाँन अणि फ्लीपकार्ट सारख्या बडया कंपनींची डिजीटल मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या हेतुने सरकारने हे प्लँटफाँर्म सर्व डिजीटल विक्रेत्यांसाठी सुरू करायचे ठरवले आहे.

ओएन डीसीचे फायदे कोणकोणते आहेत?

● ओएन डीसीमुळे कस्टमर्सला म्हणजेच ग्राहकांना आपल्या पसंतीची वस्तु प्रोडक्ट खरेदी करण्याचे अणि विक्रेत्यांना देखील आपले प्रोडक्ट वस्तु विकण्याचे खरे स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे.म्हणजेच यात ग्राहक अणि विक्रेता या दोघांचा चांगलाच फायदा ओएन डीसीमुळे होणार आहे.

● याआधी आँनलाईन शाँपिंगचे खरेदीचे डिजीटल,आँनलाईन मार्केट जे फक्त काही शहरांपुरता मर्यादित होते ते विविध दुर्गम आदीवासी भागात खेडयापाडयात देखील सहजपणे पोहचण्यास मदत होणार आहे.म्हणजे खेडयापाडयावरचे लोक देखील ओएन डीसीच्या मदतीने ईकाँमर्स साईट वरून आँनलाईन शाँपिंग खरेदी करू शकणार आहे.

See also  नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप कसे असणार आहे? New Education policy in Marathi

● डिजीटल क्षेत्रात आपले वर्चस्व असलेल्या बडया कंपनींच्या बरोबरीने लहान सहान छोटया किरकोळ अशा सेलर्सला देखील आपले वस्तु प्रोडक्ट ओएन डिसी प्लटफाँर्मदवारे सेल करता येणार आहे.याने छोटछोटया उद्योग व्यवसायीकांना ईकाँमर्स क्षेत्रात अँमेझाँन फ्लीपकार्ट सारख्या मोठया कंपनींच्या बरोबरीने प्रगती करण्याची एक प्रकारची संधी मदत तसेच प्रोत्साहन प्राप्त होणार आहे कारण याने छोटछोटया विक्रेत्यांना देखील मोठमोठया कंपनींसोबत स्पर्धा करता येणार आहे हा एक खुप महत्वाचा फायदा ओएन डिसीमुळे आपणास प्राप्त होणार आहे.

● म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर ओएन डीसी मुळे ईकामर्स क्षेत्राचे एक प्रकारचे लोकशाहीकरण होणार आहे.कारण यात प्लँटफाँर्म केंद्रीय मांँडेलला बंद करून ओपन नेटवर्क माँडेलची सुरूवात केली जाणार आहे.

● खरेदीकर्ते अणि विक्रेते एका विशिष्ट ईकाँमर्स पोर्टलशी जोडलेले असताना देखील ओएनडिसीवर देखील व्यवहार करू शकणार आहे.

● ओएनडिसीमुळे कुठल्याही छोटया विक्रेत्याला वेगवेगळया प्लँटफाँर्मवर जाऊन आपले सामान विकण्यासाठी अँमझाँन फ्लीपकार्ट सारख्या विविध प्लँटफा़र्मवर रेजिस्टर करावे लागणार नाही.कारण ओएन डीसी ह्या ओपन सोर्स साँफ्टवेअर मुळे एकाच ठिकाणी रेजिस्टर केल्यावर कुठल्याही लहान सहान विक्रेत्याचे सामान देखील विविध प्लँटफाँर्मवर एकाच वेळी दिसुन येणार आहे त्याला सेपरेट जाऊन रेजिस्ट्रेशन करण्याची कुठलीही गरज भासणार नाही.

● वस्तु खरेदी करणारया कस्टमर्सला देखील खरेदी करायला गेल्यास एकाच वेळी सर्व प्लँटफाँर्मवरील प्रोडक्ट वस्तु दिसुन येतील याने कस्टमर हे चेक करू शकतात की कोणाचा प्रोडक्ट रेटिंग उत्तम आहे.कोणाचा प्रोडक्ट रेटिंग खराब आहे.कोणाचे प्राईज जास्त आहे कोणाचे कमी आहे

सरकार ईकाँमर्स कंपन्यांची डिजीटल मक्त्तेदारी का संपवत आहे?याचे कारण काय आहे?

मोठया ईकाँमर्स कंपनींविरूदध छोटया ईकाँमर्स कंपनींकडुन विक्रेत्यांकडुन अशी तक्रार केली जात होती की त्या मार्केटमध्ये ईकाँमर्स क्षेत्रात त्यांचा जो प्रभाव आहे वर्चस्व आहे.

त्याचा गैरवापर करू लागले आहेत.ईकाँमर्स क्षेत्रात अयोग्य पदधतीने लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्या कस्टमरला वस्तुंच्या प्रोडक्टच्या खरेदीवर अधिक सवलती सुट देत आहेत.ज्याचा फटका छोटया विक्रेत्यांना सहन करावा लागत होता.

See also  भारतीय राज्यघटना (Indian Constitution In Marathi) - जाणून घ्या आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य

कारण वस्तुच्या खरेदीवर अधिक सवलती मिळत असल्याने विक्रेते ह्या मोठया कंपनींच्या प्लँटफाँर्मवरून अधिक खरेदी तसेच शाँपिंग करत होते ज्याचा परिणाम छोटया ईकाँमर्स विक्रेत्यांच्या धंद्यावर कस्टमर्सच्या संख्येवर कमाईवर सातत्याने पडत होता.

ओएनडीसीमुळे कोणाला तोटा होऊ शकतो अणि का तोटा होऊ शकतो?

ओएन डिसीमुळे अँमेझान,फ्लीपकार्ट सारख्या मोठमोठया ईकाँर्मस कंपन्यांना तोटा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कारण याने त्यांची ईकाँमर्स क्षेत्रात असलेली डिजीटल मोनोपाँली याने संपुष्टात येणार आहे.

कारण सर्व ईकाँमर्स कंपनीना सारख्या प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.याआधी मोठमोठया ई काँमर्स कंपन्या ज्या तंत्रज्ञानाचा ज्या विशिष्ट पदधतीचा वापर करायचे जी आपली वेगळी टेक्निक प्रोसेस फाँलो करायचे ती त्यांना करता येणार नाहीये.त्यांना सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचेच पालन करावे लागणार आहे.