२०२३ मध्ये अक्षय तृतीया कधी आहे? योग्य तिथी,शुभमुहूर्त पुजेची पदधत तसेच महत्व – Akshaya Tritiya 2023 information in Marathi

२०२३ मध्ये अक्षय तृतीया कधी आहे? योग्य तिथी,शुभमुहूर्त पुजेची पदधत तसेच महत्व

अक्षय तृतीया हा वर्षभरात येत असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात येतो.दरवर्षी अक्षय तृतीया हा सण उत्सव वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या तिसरया दिवशी साजरा करण्यात येत असतो.

२०२३ मध्ये अक्षय तृतीया कधी साजरी केली जाईल?

यंदाची अक्षय तृतीया ही २२ एप्रिल २०२३ ह्या तारखेला शनिवारच्या दिवशी सकाळच्या वेळी ७.४८ मिनिटांनी प्रारंभित होणार आहे.

२०२३ मध्ये अक्षय तृतीया कधी आहे? योग्य तिथी,शुभमुहूर्त पुजेची पदधत तसेच महत्व - Akshaya Tritiya 2023 information in Marathi
Akshaya Tritiya 2023 information in Marathi

अणि हयाची समाप्ती रविवारच्या दिवशी सकाळी ७ वाजुन ४६ मिनिटे ह्या कालावधीत होणार आहे.

पुजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे?

पुजेचा शुभ मुहूर्त हा २२ एप्रिल रोजी ७ वाजुन ४८ मिनिटांपासुन सुरू होऊन दुपारी १२ वाजुन २० मिनिटांपर्यत असणार आहे.

Sehri Mubarak २०२३ शुभेच्छा, संदेश, कोट्स

खरेदीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे?

खरेदीचा शुभ मुहूर्त २२ एप्रिल २०२३ ह्या तारखेला शनिवारच्या दिवशी सकाळच्या वेळी ७.४८ मिनिटांनी प्रारंभित होणार आहे.

अणि हया शुभ मुहूर्ताची समाप्ती रविवारच्या दिवशी सकाळी ७ वाजुन ४६ मिनिटे ह्या कालावधीत होणार आहे.

अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे?

ह्या दिवशी आपण कुठलेही कार्य शुभ मुहूर्त न बघता देखील पार पाडु शकतो.अक्षय तृतीयाच्या दिवशीच महर्षी व्यास यांनी महाभारत लिहायला आरंभ देखील केला होता.म्हणुन ह्या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन करायचे असते

अणि हया दिवशीच गंगा स्वर्गातुन पृथ्वीवर अवतरली असल्याचे सांगितले जाते.

अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण सोने खरेदी केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते अणि हे खरेदी केलेले सोन कधीही संपत नसते.हे सोन अक्षय होते असे ह्या दिवसाविषयी सांगितले जाते.

अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणे होय.हया दिवशी केलेले यज्ञ,होम हवन,जप तप,दान,पुण्य तसेच कुठलेही कर्म आपणास अक्षय फळप्राप्ती देण्याचे काम करते म्हणून ह्या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते असते.

ह्या दिवशी जे कार्य आपण करतो त्याचे आपणास श्रेष्ठ कधीही न संपणारे अखंड फळ प्राप्त होत असते.हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जात असतो.

ह्याच दिवशी भगवान विष्णू यांनी परशुराम हयग्रीव यांचा अवतार धारण केला होता.

अक्षय तृतीयेच्या दिवशी कशाचे दान केल्याने कोणते लाभ प्राप्त होत असतात?

अक्षय तृतीयेच्या दिवशी काय केले जाते?

ह्या दिवशी विष्णु देवता नारायण तसेच माता लक्ष्मीचे विशेष पूजन केले जात असते.वैशाख महिना भगवान विष्णू यांच्यासाठी अत्यंत प्रिय महिना मानला जातो.

म्हणून ह्या माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णू यांच्या मुर्तीची पुजा देखील केली जाते.हया दिवशी जर आपण लक्ष्मी मातेची उपासना केली तर आपणास माता लक्ष्मी अक्षय वरदान देत असते.

मातेच्या ह्या आशिर्वादाने आपल्या घरात कुटुंबात जीवणात सुख समृद्धी वैभव अखंड नांदते.या दिवशी जे लोक गंगेत स्नान करत असतात त्यांना आपल्या सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त होते.

अक्षय तृतीयेच्या दिवशी कशाचे दान करायला हवे?

अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खालील वस्तुंचे दान करणे पुण्यदायी मानले जाते.

 • वस्त्र
 • गहु
 • तांदूळ
 • जवस
 • पायातील वाहन
 • छत्री
 • पाण्याचे मडके
 • इत्यादी
 • अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणते काम मुहुर्त न बघता करू शकतो?
 • सोने चांदीची खरेदी करणे
 • वाहन खरेदी करणे
 • गृहप्रवेश करणे
 • घराची खरेदी करणे

अक्षय तृतीयेला पुजा कशापदधतीने करायची?

अक्षय तृतीयेच्या दिवशी आपणास सकाळी लवकर उठून अंघोळ करून घ्यायची आहे यानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे.

धुप अणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा.पिवळया आसनावर बसून तुळशीचे पुजन करायचे तुळशीला पिवळ्या फुलांची माळ अपर्ण करायची असते.

ह्या दिवशी विष्णु चालिसा वाचावी.भगवान विष्णुची आरती करायची असते.अन्नदान वगैरे करायचे असते.

अक्षय तृतीया विषयी पौराणिक कथा –

प्राचीन काळात एक गरीब व्यक्ती होता ह्या व्यक्तीची परमेश्वरावर खूप नितांत श्रद्धा होती.आपल्या रोजच्या दारिद्र्याने हा व्यक्ती खुप परेशान होता.

तेव्हा एकेदिवशी ह्या गरीब व्यक्तीस कोणीतरी अक्षय तृतीयेच्या दिवशी उपास कर याने तुझे दारिद्र्य नाहीसे होईल असे सांगितले.

हा गरीब व्यक्ती मग अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करतो.देवी देवतांची पूजा अर्चा करतो.दान धर्म देखील करतो.

त्याच्यावर प्रसन्न होऊन देवाने आशीर्वाद दिल्याने पुढच्या जन्मी त्याला श्रीमंत व्यक्तीचा जन्म प्राप्त होतो.