ब्लु टिक सर्विस म्हणजे काय? याचे फायदे कोणते असतात? – What is Blue Tick on Social media –

ब्लु टिक सर्विस म्हणजे काय?याचे फायदे कोणकोणते असतात? -What is Blue Tick on Social media

जे व्यक्ती आपल्या इंस्टाग्राम,फेसबुक ट्विटर अकाऊंटवरुन नेहमी व्हिडिओ इन्फोग्राफीकस इत्यादी असे विविध प्रकारचे कंटेट पब्लिश करत असतात.

अशा जेनयुअन म्हणजे रिअल अकाऊंट असलेल्या युझरला ह्या सोशल नेटवर्किंग साईटकडुन एक सर्विस उपलब्ध करून दिली जाते.

ज्याचे नाव ब्लु टिक सर्विस असे आहे.ही सर्विस आपणास ब्लु टिक व्हेरीफिकेशन प्रोसेस घडुन आल्यावर दिली जाते.

ब्लु टिक चा अर्थ काय होतो?

What is Blue Tick on Social media
What is Blue Tick on Social media

इंटरनेट वर आपणास ज्या व्यक्तींच्या इंस्टाग्राम फेसबुक तसेच टविटर अकाऊंट तसेच पेजवर ब्लु टिक दिसुन येते समजुन घ्यायचे हया व्यक्तींचे खाते इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यांच्याकडुन व्हेरीफाय करण्यात आले आहे.

हे ब्लु टिकचे चिन्ह ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर आपण मिळवू शकतो हे चिन्ह आपल्या अकाउंटवर आॅफिशिअल पेजवर आपल्या नावाच्या समोर दिले जात असते.

ब्लु टिकचे महत्व काय आहे?

जेव्हा आपणास इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर इत्यादी वर एखाद्या व्यक्तीच्या सोशल मिडिया खात्यावर पेजवर हे चिन्ह दिसुन आले तर समजुन घ्यायचे हे सोशल मिडिया पेज तसेच अकाऊंट हे त्या विशिष्ट कंपनीचे व्यक्तीचे ब्रँडचे ओरिजनल अणि आॅफिशिअल अकाऊंट तसेच पेज आहे.

याने आपणास कोणत्या नेत्याचे सेलिब्रिटींचे रिअल आॅफिशिअल अकाऊंट कोणते आहे हे कळत असते.याने फेफ अणि रिअल अकाऊंट पेज ओळखायला साहाय्य होते.

ब्लु टिकची सर्विस कोण कोण घेत असते?

ब्लु टिकची सर्विस राजकीय नेते,बिझनेसमन मोठमोठे ब्रॅड,
खेळाडु अभिनेता इत्यादी सेलिब्रिटी व्यक्ती आपल्या आॅफिशिअल अकाऊंट तसेच पेजवर ही ब्लु टिक सर्विस घेत असतात.

See also  जागतिक रंगभूमी दिन २०२३ | महत्त्व । इतिहास । World Theatre Day 2023 In Marathi

याचसोबत सर्वसामान्य व्यक्ती देखील ब्लु टिक सर्विसचा वापर करू शकतो.

फेसबुकवर ब्लु टिक सर्विस प्राप्त करण्यासाठी आपणास कोणते महत्वाचे निकष पुर्ण करावे लागतात?

आपल्याला ज्या सोशल मिडिया खात्यावर आॅफिशिअल पेजवर ब्रॅडसाठी ब्लु टिक हवे आहे आपले ते खाते पेज आॅथेंटिक असणे आवश्यक आहे.म्हणजे ते खाते पेज फेक वगैरे नसावे.

आपल्या सोशल मिडिया अकाऊंट पेजवरील प्रोफाईल हे पुर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे प्रोफाईल मध्ये अर्धवट माहीती वगैरे भरलेली नसावी ती पुर्ण भरलेली असायला हवी.

आपण आपल्या सोशल मिडिया अकाउंट तसेच पेज वर अबाऊट सेक्शन मध्ये आपल्या ब्रॅड विषयी कंपनी विषयी तसेच आपल्या विषयी सर्व माहिती भरायला हवी.

वरील सर्व निकषांची पुर्तता केल्यावर आपल्याला अर्ज केल्यावर आपल्या सोशल मिडिया अकाऊंट पेजवर ब्लु टिकची सर्विस प्राप्त होते.

टविटर वर ब्लु टिक सर्विस प्राप्त करण्यासाठी आपणास कोणते महत्वाचे निकष पुर्ण करावे लागतात?

आपले टविटर खाते सहा महिने इतक्या कालावधी पासुन सुरु असणे आवश्यक आहे.

आपले अकाऊंट पेज रिअल आॅथिंटिक असायला हवे.

आपल्या सोशल मिडिया अकाऊंट पेजवरील प्रोफाईल हे पुर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे प्रोफाईल मध्ये अर्धवट माहीती वगैरे भरलेली नसावी ती पुर्ण भरलेली असायला हवी.

आपले ट्विटर खाते कोणत्याही एका विशिष्ट कॅटॅगरी मधील असणे आवश्यक आहे.

टविटरकडुन टविटरचे सोशल मिडिया अकाऊंट वापराविषयीचे नियम तोडण्यासाठी एकदा देखील आपल्या अकाऊंटला बॅन केले गेले नसावे.

वरील सर्व निकष पुर्ण होत असल्यास आपण ब्लु टिक सर्विस करीता ट्विटरवर अर्ज दाखल करू शकतो.

टविटरकडुन ब्लु टिक सर्विस कधी काढुन घेण्यात येते?

आपले सोशल मिडिया अकाऊंट खुप दिर्घकालावधी पासुन वापरात आलेले नसेल इनॅक्टिवह असते तेव्हा आपले ब्लु टिक काढुन घेतले जाते.

आपल्या खात्यावर ट्विटरच्या पाॅलिसिचे उल्लंघन होईल असे कृत्य केले जात असेल किंवा आपले प्रोफाईल फोटो नाव डिटेल यात काही फेरफार केली जात असेल तर आपली ब्लु टिक सर्विस काढुन घेतली जाऊ शकते.

See also  पीएम केअर फंड विषयी माहीती - PM cares fund information in Marathi

आता टविटरने २०२३ मध्ये एक नियम बनवला आहे ज्या टविटर अकाऊंट पेजवर चार्ज भरून सबस्क्रिप्शन घेतले गेलेले नसेल त्याचे टविटर अकाऊंट पेजवर असलेले ब्लु टिक काढुन घेण्यात येणार आहे.

यामुळे शाहरुख खान अमिताभ बच्चन इत्यादी दिग्दज अभिनेत्यांसोबत अनेक राजकीय नेत्यांच्या क्रिकेटपटूंच्या
ट्विटर अकाऊंट पेज वरील ब्लु टिक हयाच कारणामुळे काढुन घेण्यात आले आहे.

म्हणजे आता ब्लु टिक सर्विस पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्व सेलिब्रिटींना २० एप्रिल २०२३ पासुन पेड सबस्क्रिप्शन घेणे बंधनकारक असणार आहे.फ्री मध्ये टविटर वर ब्लु टिक सर्विस घेतलेल्या सर्व खाते पेजवरील ब्लु टिक इलाॅन मस्कने काढुन घेतले आहे.