नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरयांना आता वर्षाला ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये मिळणार – NAMO shetakari mahasanman nidhi yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी – Namo shetakari mahasanman nidhi yojana

सर्व शेतकरी बांधवांची प्रतिक्षा आता संपणार आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरयांना आता वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहे.

केंद्र सरकारकडुन शेतकरी बांधवांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात पण आता महाराष्ट्र सरकारकडून देखील शेतकरयांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ६ हजार रूपये देण्यात येणार आहे.

म्हणजे केंद्र सरकारकडुन मिळणारे ६ हजार रुपये अणि महाराष्ट्र शासनाकडून दिले जात असलेले ६ हजार रुपये असे एकूण शेतकरयांना वर्षाला १२ हजार रुपये प्राप्त होणार आहे.

या संदर्भात १५ जुन २०२३ रोजी एक जीआर देखील काढण्यात आला आहे.हया जीआर मध्ये ह्या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील लाभार्थी शेतकऱ्यांना पहिला हप्ता,कसा दिला जाईल इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे.

ह्या योजनेसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहे.

ज्यांना केंद्र शासनाकडून २ हजार रुपये हप्ता ज्या शेतकऱ्यांना दिला जातो आहे.तोच हप्ता अजून २ हजार रूपयांचा त्या आधीच्याच शेतकरींना देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या अणि केंद्र शासनाच्या निकषांनुसार ज्यांना २ हजार रुपये दिले जात आहे त्यांनाच आता २ हजार रुपये अजुन मिळणार आहे.असे एकुण ३ महिन्याला ४ हजार रुपये दिले जाणार आहे.

पीएम किसान पोर्टलवर नवीन नो़ंंदणी करून लाभ प्राप्त केलेले पात्र लाभार्थी देखील ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.

म्हणजेच ज्या लाभार्थींनी नवीन नोंदणी केली आहे.अणि त्यांना २ हजार रुपये येणे सुरू झाले आहे त्यांना सुदधा तीन महिन्याला ४ हजार रुपये म्हणजे एकुण तीन हप्त्याचे १२ हजार रुपये मिळतील.

See also  सिम कार्ड साठी सरकारचे नवीन नियम - बल्क मध्ये सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन होणार Government new rules for sim Card in Marathi

ह्या योजनेची कार्यपद्धती अशी असणार-

पीएम किसान योजनेच्या पीएफ एम एस प्रणाली नुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी
जे पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत असे व्यक्तीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभास पात्र ठरतील.

सदर लाभार्थ्यांना राज्य शासनाकडुन विकसित केलेल्या पोर्टलवरून बॅक खात्यात थेट लाभ दिला जाणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पोर्टल –

पीएम किसान योजनेअंतर्गत जे रेजिस्ट्रेशन केले जाते त्यामध्ये मध्येच इथे पोर्टलला एकाचवेळी पोर्टलला राहील.

निधी वितरणाची कार्यपद्धती –

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ह्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेनुसार खालील वेळापत्रकानुसार लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणादवारे आयुक्त कृषी यांच्या मार्फत वितरीत करण्यात येणार आहे.

म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता जेव्हा मिळेल तेव्हाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकरींना दिला जाणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान २ हजार रुपये इतका दिला जाणार आहे.

दुसरा हप्ता आॅगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान २ हजार रुपये इतका दिला जाणार आहे.

तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान २ हजार रुपये इतका दिला जाणार आहे.

2 thoughts on “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरयांना आता वर्षाला ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये मिळणार – NAMO shetakari mahasanman nidhi yojana”

Comments are closed.