इंशुरन्स,इंशुअर्ड अणि इंशुरर म्हणजे काय? What is insurance,insured,insurer and insurance premium

इंशुरन्स,इंशुअर्ड अणि इंशुरर म्हणजे काय?What is insurance,insured,insurer and insurance premium

खुप जणांच्या मनात शंका असते की इंशुअर्ड अणि इंशुरर या दोघांमध्ये कोणता फरक असतो.

यात इंशुअर्ड विमा पाॅलिसी खरेदी करत असलेल्या व्यक्तीला म्हणायचे की विमा पाॅलिसी विकत असलेल्या व्यक्तीला म्हणायचे?

विमा पाॅलिसी खरेदी करत असलेल्या व्यक्तीला काय म्हणतात?विमा पॉलिसीची विक्री करत असलेल्या व्यक्तीला कंपनीच्या एजंटला काय म्हणतात असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात.

आजच्या लेखात आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

What is insurance,insured,insurer and insurance premium
What is insurance,insured,insurer and insurance premium

इंशुरन्स म्हणजे काय? insurance meaning in Marathi

आपण इंशुरन्स कंपनीकडुन जो काही विमा कव्हरेज प्राप्त करत असतो त्याला इंशुरन्स असे म्हटले जाते.

इंशुअर्ड म्हणजे काय?Insured meaning in Marathi

जेव्हा आपण एखाद्या इंशुरन्स कंपनीकडुन एखाद्या एजंटच्या माध्यमातून इंशुरन्स पाॅलिसी खरेदी करत असतो तेव्हा आपण इंशुअर्ड होत असतो.म्हणजे इंशुरन्स कंपनी कडुन आपला विमा उतरविण्यात आला आहे असा याचा अर्थ होत असतो.

म्हणजे जी व्यक्ती एखाद्या इंशुरन्स कंपनीकडुन विमा पाॅलिसी खरेदी करते आपला विमा उतरवत असते त्याला इंशुअर्ड,विमा उतरविण्यात आलेला असे म्हटले जाते.

जो व्यक्ती विमा संरक्षण घेत असतो तो इंशुअर्ड मानला जातो.

इंशुअर्ड नेम म्हणजे काय?Insured name meaning in Marathi

यात इंशुअर्ड नेम म्हणजे विमा उतरविण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव असते.

इंशुअर्ड पर्सन म्हणजे काय?Insured person meaning in Marathi

इंशुअर्ड पर्सन म्हणजे विमा धारण करणारा व्यक्ती.

See also  50 World's largest companies - कोणती कंपनी कोणत्या देशाची - company belongs to which country

इंशुरर म्हणजे काय?Insurer meaning in Marathi

जी इंशुरन्स कंपनी आपले इंशुरन्स प्रोडक्ट एखाद्या व्यक्तीला(विमा धारकाला)विकत असते त्या इंशुरन्स कंपनीला विमाकर्ता,इंशुरर असे म्हटले जात असते.

इंशुरर नेम म्हणजे काय?insurer name meaning in Marathi

आपण ज्या इंशुरन्स कंपनी कडुन विमा एजंटकडुन विमा पॉलिसी खरेदी करत असतो त्या इंशुरन्स कंपनीचे नाव किंवा तो विमा एजंट काम करत असलेल्या इंशुरन्स कंपनीचे नाव यालाच इंशुरर नेम असे म्हटले जाते.

इंशुरन्स प्रिमियम म्हणजे काय?insurance premium meaning in Marathi

  • इंशुरन्स प्रिमियम म्हणजे हप्ता.ही एक अशी विशिष्ट रक्कम असते जी आपल्याला आपण ज्या कंपनीची इंशुरन्स पाॅलिसी खरेदी केली आहे त्या इंशुरन्स कंपनीला द्यावी लागते.
  • इंशुरन्स प्रिमियम हा आपणास वेगवेगळ्या पद्धतीने भरता येत असतो.यात आपण रेग्युलर इंटरव्हल मध्ये देखील भरू शकतो किंवा एकाच वेळी सिंगल पेमेंट करून देखील भरू शकतो.
  • इंशुरन्स प्रिमियमची रक्कम आपण इंशुरन्स कंपनीला रेग्युलर इंटरव्हलमध्ये दर महिन्याला देऊ शकतो.किंवा तीन महिन्याने,सहा महिन्याने तसेच वर्षभरात देखील देऊ शकतो.

Leave a Comment