सर्वर म्हणजे काय? सर्वरचे प्रकार , कार्य व उपयोग – Server Meaning In Marathi

सर्वर बाबत माहिती ?- Server Meaning In Marathi

सर्वर हा एक असा शब्द आहे जो आपल्याला नेहमी कंप्युटरचे वर्क चालत असलेल्या ठिकाणी जसे की बँक,सायबर कँफे,आँफिस इत्यादी ठिकाणी ऐकायला मिळत असतो.

अनेक वेळा असे देखील होते की आपण एखादा महत्वाचा आँनलाईन फाँर्म भरत असतो आणि अचानक सर्वर डाऊन होऊन जात असते.

आणि हा एकाच ठिकाणी नव्हे तर कंप्युटरचा वापर केला जात असलेल्या प्रत्येक ठिकाणी हा प्राँब्लेम आपणास पाहायला तसेच ऐकावयास मिळत असतो.

तेव्हा कुतुहलापोटी हे सर्वर म्हणजे नेमकी काय असते?हे नेहमी डाऊन होण्याचे कारण काय?हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे.

आपल्या मनातील हेच कुतुहल दुर करण्यासाठी आज आपण सर्वर म्हणजे काय असते?त्याचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?तसेच हे सर्वर डाऊन का बर होत असते?इत्यादी विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

सर्वर म्हणजे काय?- Server Meaning In Marathi

सर्वर हा एक कंप्युटर असतो जो इतर कंप्युटर तसेच युझर्सला सर्विस देण्याचे काम करत असतो.

सर्वर हे एखादे हार्डवेअर डिव्हाईस असु शकते,एखादा कंप्युटरमधील स्टोअर असलेला प्रोग्रँम असु शकतो.जो इतर कंप्युटरला डेटा तसेच महत्वाची माहीती सेंड करायचे काम करतो.

याचसोबत सर्वर हा एखादा सिंगल कंप्युटर देखील असु शकतो.जो इतर कंप्युटर्सला सर्विस प्रोव्हाईड करत असतो.

सर्वरचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types Of Server In Marathi

See also  भारतातील ITI कंपनीने लाँच केले नवीन लॅपटॉप आणि मायक्रो पीसी – Smaash Lapto by ITI

मित्रांनो सर्वर हा कुठल्या एका प्रकारचा राहत नसतो तर त्याचे देखील विविध प्रकार असतात.आणि सर्वरचे असे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

1)प्राँक्सी सर्वर :

2) फाईल सर्वर :

3) एफटीपी सर्वर :

4) जंप सर्वर :

5) वेब सर्वर :

6) अँप्स सर्वर :

7) डेटाबेस सर्वर :

8) मेल सर्वर :

9) प्रिंट सर्वर :

1)प्राँक्सी सर्वर :Proxy Server Meaning In Marathiसर्वरचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत Types Of Server In Marathi

मित्रांनो प्राँक्झी सर्वरला आपण प्राँक्झी असे देखील म्हणत असतो.प्राँक्झी हे युझर आणि इंटरनेट या दोघांमध्ये असलेले एक गेट वे असते.

2) फाईल सर्वर : File Server Meaning In Marathi

फाईल सर्वर हा सर्वरचाच एक प्रकार आहे ज्यात फाईलला स्टोअर केले जात असते.

फाईल सर्वरमुळे आपणास युझर्ससोबत कुठलीही फाईल शेअर करता येत असते.

3) एफटीपी सर्वर :Ftp Server Meaning In Marathi

आज आपण इंटरनेटच्या माध्यमातुन रोज लाखो फाईल्स एका पीसी मधुन दूसरया पीसीमध्ये ट्रान्सफर करत असतो.

आणि ह्या सर्व फाईल सेंड करण्यासाठी आपण एफटीपी म्हणजेच(File Transfer Protocol) सर्वरचा वापर करत असतो.

4) जंप सर्वर : Jump Server Meaning In Marathi

विविध सिक्युरीटी कँटँगरीमधील उपकरणे जोडायला व त्यांचा वापर करायला जंप सर्वर वापरले जात असते.

जंप सर्वर हे विविध सिक्युरीटी कँटँगरीमधील उपकरणांमध्ये एक पुलाप्रमाणे काम करत असते.

5) वेब सर्वर :Web Server Meaning In Marathi

वेब सर्वर हे वेबसाईटला चालवण्याचे काम करते.ज्याला आपण सोप्या भाषेत प्रोग्रँम अस देखील म्हणू शकतो.

वेब पेजचे मुख्य काम हे वेब पेजेसला स्टोअर करणे आणि मग युझर्सकडुन एखाद्या विषयावर सर्च केले गेल्यानंतर त्यावर प्रोसेस करून त्याविषयी योग्य आणि अचुक माहीती युझर्सपर्यत पोहचवणे हे आहे.

6) अँप्स सर्वर :Apps Server Meaning In Marathi

अँप्स सर्वर ही एक सर्वर आँपरेटिंग सिस्टम असते जिचा वापर कुठल्याही मोबाईल अँप्लीकेशनला डेव्हलप करण्यासाठी तसेच आँपरेट करण्यासाठी केला जात असतो.

7) डेटाबेस सर्वर :Data Base Server Meaning In Marathi

डेटा बेस सर्वर हा एक कंप्युटर सिस्टमचा प्रकार आहे जो डेटाला अँक्सेस तसेच मँनेज करण्याचे स्टोअर करण्याचे काम करत असतो.

8) मेल सर्वर :(Mail Server Meaning In Marathi)

मेल सर्वर ही सुदधा एक कंप्युटरची सिस्टम असते जी ईमेल सेंड करण्याचे आणि ईमेल रिसिव्ह करण्याचे काम करत असते.

See also  इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे?- How To Delete Instagram Account

मेल सर्वरला एमटीए (Mail Server Transfer Agent) असे देखील म्हटले जाते.

9) प्रिंट सर्वर :(Print Server Meaning In Marathi)

प्रिंट सर्वर हे एक सर्वर असते जे अलग अलग क्लाईंटला एकमेकांसोबत प्रिंटरने सामुहिक रीत्या जोडत असते.

सर्वरचे प्रमुख काम काय असते?

जे युझर्स इंटरनेटचा वापर करत आहे अशा युझर्सला इंटरनेटशी संबंधित सर्व सर्विस देणे हे सर्वरचे प्रमुख काम असते.

म्हणजे सर्वरचे काम असते की युझर्सला ती सर्व माहीती देणे ज्याचा ते इंटरनेटवर शोध घेत आहे.जी माहीती प्राप्त करण्याची रिक्वेस्ट युझर्सकडुन सर्वरकडे केली जात आहे.

सर्वर कशा पदधतीने काम करत असते?-How Server Is Works In Marathi

जेव्हा आपण गुगलवर तसेच युटयुबवर जाऊन एखादा किवर्ड टाईप करुन त्यावर माहीती सर्च करत असतो.

तेव्हा आपण किवर्ड टाईप करून सर्च बटणवर ओके केल्यावर आपण टाईप केलेला किवर्ड रिक्वेस्ट बनुन सर्वरकडे जात असतो.

आणि मग सर्वर इंटरनेटवर आपण सर्च केलेल्या त्या किवर्डवर जिथेही डेटा तसेच माहीती उपलब्ध तसेच संग्रहीत असेल तिथुन ती माहीती शोधून आपल्यासमोर रिझल्टच्या स्वरूपात दाखवत असतो.

इंटरनेटवरील कोणकोणत्या कामासाठी सर्वरचा उपयोग केला जात असतो?

इंटरनेटवर आज प्रत्येक कामासाठी सर्वरची आवश्यकता आपणास भासत असते.

सर्वरचा उपयोग पुढील काही महत्वाच्या कामात केला जात असतो-

एखादा महत्वाचा ईमेल सेंड करणे

● एखादी महत्वाची फाईल डाऊनलोडिंग

● आँनलाईन फाँर्म भरणे

● इंटरनेटवर माहीती सर्च करणे

इत्यादी कामासाठी सर्वरचा प्रामुख्याने उपयोग होत असतो.कारण सर्वर द्वारेच आपल्याला कुठलाही डेटा इंटरनेटवर प्राप्त होत असतो.

सर्वर डाऊन म्हणजे काय? -Server Down Meaning In Marathi

कुठल्याही क्लाईंट सर्वर आर्किटेक्चरमध्ये सर्वरचे प्रमुख कार्य असते आपल्या क्लाईंटला सर्विस देणे.पण जेव्हा सर्वर क्लाईंटला सर्विस देण्यात अपयशी ठरत असतो तेव्हा सर्वर डाऊन झाले आहे असे म्हटले जाते.

याचा थोडक्यात असा अर्थ होत असतो की एकतर सर्वर सापडत नाहीये किंवा सर्वर कुठलाही रिस्पाँन्स देत नाहीये.

याने युझरला जी इंटरनेट सर्विस हवी असते ती त्याला सर्वरकडुन प्राप्त होत नसते.

सर्वर डाऊन होण्याचे कारण काय असते?-Reason Of Server Down In Marathiसर्वर डाऊन होण्याचे कारण काय असते Reason Of Server Down In Marathi

सर्वर डाऊन होण्यामागे पुढील काही महत्वाची कारणे असु शकतात-

See also  २०२३ मधील भारतातील टॉप ५ ट्रॅक्टर कंपन्या । List of Top 5 Tractor Companies in India

नेटवर्क मध्ये प्राँब्लेम येणे

● अँप्लीकेशन क्रँश होणे

● आँपरेटिंग सिस्टम क्रँश होणे

● सर्वरवर हँकर्सकडुन डाँस अँटँक होणे

● पावर फेल होणे

कंप्युटर सर्वर म्हणजे काय?-Computer Server Meaning In Marathi

कंप्युटर सर्वर म्हणजे एखादा कंप्युटरमधील स्टोअर असलेला प्रोग्रँम.जो इतर कंप्युटरला डेटा तसेच महत्वाची माहीती सेंड करत असतो.

याचसोबत कंप्युटर सर्वर हा एखादा सिंगल कंप्युटर देखील असु शकतो.जो इतर कंप्युटर्सला इंटरनेटची सर्विस प्रोव्हाईड करत असतो.

सर्वर साईड म्हणजे काय?-Server Side Meaning In Marathi

  • क्लाइंटच्या ऐवजी सर्व्हरवर घडणारया प्रत्येक गोष्टीला सर्वर साईड असे म्हटले जाते.
  • थोडक्यात असे प्रोग्रँम तसेच आँपरेशन जे फक्त सर्वरवर रन होत असतात.
  • सर्वर अनरिचेबल म्हणजे काय?-Server Unreachable Meaning In Marathi
  • सर्वर अनरिचेबल ही एक नेटवर्क कनेक्शन संबंधित समस्या असते ज्यात सिग्नल फार लो दाखवला जातो.हा प्राँब्लेम मोबाईल सिग्नलच्या बाबतीत नेहमी आपणास पाहायला मिळत असतो.

होम सर्वर म्हणजे काय?-Home Server Meaning In Marathi

  • जेव्हा एखाद्या सर्वरचा वापर फक्त आपल्या घरापुरता म्हणजेच एका मर्यादित क्षेत्रापुरताच केला जात असतो तेव्हा त्यास होम सर्वर असे म्हणतात.

सांबा सर्वर म्हणजे काय?-Samba Server Meaning In Marathi)-

  • सांबा सर्वर हा एक फ्री सिस्टम साँफ्टवेअरचा प्रकार आहे.ज्याची निर्मिती अँड्रयु टिगेली यांच्याकडुन करण्यात आली होती.
  • सांबा सर्वर हे लिनक्स आणि विंडोज या दोघी आँपरेटिंग सिस्टममध्ये प्रमामुख्याने वापरले जात असते.
  • सांबा सर्वरचा वापर करून आपण आँपरेटिंग सिस्टममध्ये फाईल ट्रान्झँक्शन करू शकतो.

सर्वरमध्ये कोणत्या आँपरेटिंग सिस्टम वापरल्या जातात ?(Operating System In Server In Marathi)

सर्वरमध्ये पुढील काही महत्वाच्या आँपरेटिंग सिस्टम प्रामुख्याने वापरल्या जात असतात-

● युनिक्स

● नेटवर्क

● लिनक्स

● विंडोज

सर्वरचे हार्डवेअर पार्ट किती आणि कोणते असतात?(Hardware Part Of Server In Marathi)

मित्रांनो जसे की आपण आधीच जाणुन घेतले की सर्वर हे एक हार्डवेअर डिव्हाईस तसेच एखादा कंप्युटर देखील असु शकतो.

ज्याचे हार्डवेअर पार्ट पुढीलप्रमाणे असतात-

● मेमरी -सर्वरची मेमरी ही डेटा कलेक्ट करत असते.आणि इंटरनेट युझर्सच्या गरजेनुसार तो डेटा त्यांना प्रोव्हाईड करत असते.रँम आणि रोम ह्या कंप्युटरच्या दोन मुख्य मेमरी आहेत.

● मदरबोर्ड -कंप्युटरच्या सर्व पार्टसला एकमेकांसोबत जोडुन ठेवत असतो.मदरबोर्डमध्ये सीपीयू प्रोसेसर इत्यादींचा समावेश होत असतो.

● प्रोसेसर -प्रोसेसरला सर्वरचा मेंदु म्हणजेच ब्रेन मानले जाते.कारण जसे आपण मेंदुशिवाय कुठलाही विचार करू शकत नाही एकदम तसेच प्रोसेसरशिवाय सर्वरला देखील कुठलेच कार्य करता येत नसते.

सर्वरचे फायदे कोणकोणते असतात? Advantages Of Server In Marathi)-

सर्वरचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

सर्वर मध्ये कुठलाही डेटा हा एकदम सुरक्षित स्टोअर राहत असतो ज्याने तो कधी चोरीलाही जात नाही.आणि कधी आपल्याकडुन लाँस्ट देखील होत नाही.

● सर्वरची डेटा स्टोरेज कँपिसिटी फार अधिक असते ज्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा डेटा यात स्टोअर करता येत असतो.

● सर्वरच्या मदतीने एका कंप्युटरला अनेक कंप्युटर्स जोडता येत असतात ज्याने डेटा शेअर करणे अधिक सोपे जात असते.

● सर्वर मध्ये स्टोअर असलेली माहीती तसेच डेटा आपण कधीही इंटरनेटदवारे उपयोगात आणु शकतो.