द केरळा स्टोरी वरून कोणता वाद सध्या सुरू आहे?ह्या चित्रपटाला विरोध का केला जातो आहे?The Keralastory controversy

द केरळा स्टोरी वरून कोणता वाद सध्या सुरू आहे?ह्या चित्रपटाला विरोध का केला जातो आहे?

आज ५ मे २०२३ रोजी द केरला स्टोरी हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.मागील काही दिवसांपासून ह्या चित्रपटावरून खुप वादविवाद सुरू होते.

कोणी ह्या चित्रपटाला सत्य भावनिक कथा असे संबोधित होते.तर काही जणांकडून हया चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती.

चित्रपट रिलीज करण्याआधी हया चित्रपटातील काही सीन कट देखील करण्यात आले आहे.सेन्साॅर बोर्डाकडुन ह्या चित्रपटाला ए सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले आहे.

हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले असल्याने तामिळनाडू मध्ये चित्रपट रिलीज करण्याआधी सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की द केरला स्टोरी हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात का अडकलेला आहे ह्या चित्रपटाला विरोध का केला जातो आहे? यामागचे कारण काय आहे?

चित्रपटाला विरोध कोण करते आहे?

असे सांगितले जाते आहे की काही विशिष्ट गटाकडुन संघटनांकडुन द केरला स्टोरी ह्या चित्रपटावर कायमची बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हा चित्रपट कुठल्याही थिएटर मध्ये दाखवला जाऊ नये अणि यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी यासाठी कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

चित्रपटाला होत असलेल्या विरोधामुळे चित्रपटात कोणते महत्वाचे बदल करण्यात आले आहे?

द केरला स्टोरी हया चित्रपटाला होत असलेल्या विरोधामुळे सेनसाॅर बोर्डाने ह्या चित्रपटात दाखवलेले काही सीन कट देखील केले होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्वात मोठा पाखंडी आहे ह्या डायलॉग मधील भारतीय हा शब्द सॅन्साॅर बोर्डाच्या वतीने काढून टाकण्यात आला आहे.

द केरळा स्टोरी चित्रपटाचा टीझर देखील बदलण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.टीझर मध्ये ३२००० मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख न करता ३ महिलांचाच उल्लेख करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

See also  बँक आँफ बडोदाच्या व्हाँटस अँप बँकिंग विषयी माहीती -Bank Of Baroda WhatsApp Banking Information In Marathi

चित्रपटाला विरोध करण्याचे कारण काय आहे?

काही विशिष्ट गटांकडुन असा आरोप केला गेला आहे की ह्या चित्रपटाद्वारे विशिष्ट समुदायाला अपमानित कलंकित करण्यात आले आहे.

यावर सुप्रीम कोर्टाने केरळा स्टोरी ह्या चित्रपटाला रिलीज करणे थांबवता येणार नाही असे सांगत केरळ उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

द केरळा स्टोरी चित्रपटात असे दाखवले गेले आहे की केरळ राज्यातील हिंदु मुलींचे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन मुस्लिम मुलांकडून धर्मपरिवर्तन करण्यात येते.धर्म परिवर्तन घडवुन आणत येथील महिलांना मुलींना कसे दहशतवादी संघटनांमध्ये समाविष्ट करण्यात येते हे ह्या चित्रपटात दाखवले गेले आहे.

ह्या चित्रपटामार्फत केरळ राज्याची प्रतिमा मलिन करण्यात येत आहे.असे आरोप देखील अनेक राजकीय पक्ष तसेच गटांकडुन करण्यात आले होते.

चित्रपटात कोणाची प्रमुख भुमिका असणार आहे?

सिदधी इदनानी

अदा शर्मा

सोनिया बानी

योगिता बिहानी

आता ५ मे २०२३ रोजी रिलीज करण्यात आलेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून किती पसंती प्राप्त होते.अणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर किती कमाई करतो याचकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ह्या चित्रपटाचे एकुण बजेट ४५ कोटी इतके ठेवण्यात आले आहे.अदा शर्माला चित्रपटातील भुमिकेसाठी सर्वाधिक मानधन देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.