Data आणि information या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference between Information and Data

Data आणि information  म्हणजे काय Difference between Information and Data

 डेटा आणि इन्फरमेशन हे दोघेही शब्द आपल्याला समान वाटत असतात.कारण आपण आपल्या कंप्युटर तसेच लँपटाँपमध्ये जो महत्वाचा डेटा स्टोअर करून ठेवत असतो तो एक एक इन्फरमेशनच्या फाँरमँटमध्ये कधी कधी स्टोअर केलेला असतो.

म्हणुन आपल्याला असे वाटते की डेटा आणि इन्फरमेशन हे दोघे सारखेच असतात.आणि डेटा आणि इन्फरमेशन या दोघांचा अर्थ देखील एकच होतो.

जरी हे दोघे एकच आहे असे आपणास वाटत असले तरी पण या दोघांमध्ये काही सुक्ष्म भेद असतो जो जाणुन घेणे आपल्यासाठी फार आवश्यक असते.

कारण कधी कधी डेटा आणि इन्फरमेशन ह्या दोघांमध्ये आपले खुप कन्फ्युझन होत असते.

चला तर मग आजच्या लेखात आपण जाणुन घेऊया की डेटा आणि इन्फरमेशन या दोघांमध्ये काय साम्य आणि भेद आहे?जेणेकरून पुन्हा पुन्हा आपल्या मनात डेटा आणि इन्फरमेशन या दोघांविषयी कन्फ्युझन निर्माण होणार नाही.

Data म्हणजे काय?

डेटा हा एक संख्या,चिन्ह,वर्ण,शब्द तसेच एखादा कोड किंवा आलेख अशा स्वरुपात असु शकतो.डेटा हा एक कच्चा,असंगठित तथ्य असलेला तपशीलांचा निव्वळ एक संग्रह तसेच संचय असतो.ज्याचा कुठलाही निश्चित अर्थ आपल्याला जाणुन घेता येत नाही.

डेटाचा आपला कुठलाही विशिष्ट असा हेतु नसतो.तसेच त्याचे इतर कुठलेही महत्व देखील नसते.आणि याचसोबत डेटाचे मेझरमेंट बिट आणि बाईटसच्या संदर्भात केले जात असते.

उदा. जर आपण एखादा नंबर घेतला जसे की 101096 तर अशावेळी आपण हा रोल नंबर आहे की कोणाचा बँक अकाऊंट नंबर तसेच मोबाईलचा पासवर्ड आहे हे आपण सांगु शकत नसतो म्हणजेच डेटा हा एक अर्थहीन तपशीलांचा एक संग्रह असतो.

See also  श्रीगणेशाचे आगमन,शुभ मुहुर्त,स्थापणा अणि पुजा विधी याविषयी संपुर्ण माहीती -Ganesh Chaturthi 2022 Date, Shubh Muhuart And Rituals

Information म्हणजे काय?

 जेव्हा आपण एखाद्या डेटावर काही प्रोसेस करत असतो.आणि त्याचे एक क्रमबदधपणे स्ट्क्चर तयार करत असतो तसेच त्याच्यापासुन आपल्याला काही महत्वाचे तसेच उपयुक्त ज्ञान प्राप्त होत असते.तेव्हा त्याला इन्फरमेशन असे म्हटले जाते.

इन्फरमेशन हा एक पक्का आणि संगठित तथ्य असलेला तपशीलांचा संग्रह असतो.ज्याचा संदर्भ घेऊन एक निश्चित अर्थ आपल्याला एखाद्या विषयाविषयी जाणुन घेता येतो.

Data आणि information या दोघांमध्ये कोणता फरक आहे?Difference between Information and Data

डेटा आणि इन्फरमेशन या दोघांमध्ये पुढील फरक असतो:

  • डेटा ही एक अर्थहीन माहीती असते जिचा कुठलाही एक निश्चित अर्थ निघत नसतो.इन्फरमेशन ही एक संगठित तसेच तथ्यपुर्ण माहीती असते.जिचा एक निश्चित अर्थ आपल्याला जाणुन घेता येत असतो.
  • डेटाला कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती सहजपणे समजु तसेच जाणुन घेऊ शकत नाही.कारण एकाच डेटाचे विविध अर्थ देखील निघत असतात.

फ्री डेटा रिकव्हरी साँफ्टवेअर माहिती

इन्फरमेशनला कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती देखील सहज समजून घेऊ शकते.कारण यात एक समजेल अशा स्वरूपात कुठलीही माहीती दिलेली असते.

 

  • डेटाचा काहीच उपयोग होत नसतो.इन्फरमेशन म्हणजेच माहीतीचा मात्र कुठल्याही विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी भरपुर उपयोग केला जात असतो.

 

  • डेटा हा अन आँर्गनाईज्ड असतो.इन्फरमेशन ही वेल आँर्गनाईज्ड असते.

 

  • डेटा हा नेहमी टेक्सट नंबर तसेच एखाद्या सिम्बाँलच्या फाँरमँटमध्ये असतो.पण इन्फरमेशन ही शुदध टेक्सटच्या स्वरुपात समजेल अशा भाषेत दिलेली असते.

 

  • डेटा हा लँटिन भाषेतील शब्दांपासुन बनलेला शब्द आहे.इन्फरमेशन हा इंग्लिश तसेच फ्रेंच भाषेतुन बनलेला शब्द आहे.

 

  • डेटा हा कधीही इन्फरमेशनवर आधारलेला नसतो.इन्फरमेशन मात्र डेटावर आधारलेली असते.

 

  • आपण डेटाची मेझरमेंट बिट आणि बाईटस मध्ये करत असतो.इन्फरमेशन आपण वेळेचे युनिट,काँटिंटी मध्ये मेझर करत असतो.

 

1 thought on “Data आणि information या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference between Information and Data”

Comments are closed.