लिओनार्डो द विंची कोण होते?
लिओनार्डो द विंची हे रेनेसान्स काळात होऊन गेलेले एक महान संशोधक तसेच चित्रकार होते.
कलेच्या इतिहासात आपल्या संशोधक वृत्तीमुळे लिओनार्डो द विंची यांनी जे अमुल्य योगदान दिले आहे ते अवर्णनीय आहे त्यामुळेच आज कलेच्या इतिहासात नेहमी त्यांचे नाव अग्रस्थानी घेण्यात येते.
लिओनार्डो द विंची यांनी विविध क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे पण इतिहासात त्यांची मुख्य ओळख ही एक महान चित्रकार म्हणून आहे.
लिओनार्डो द विंची यांनी आपल्या संपुर्ण कारकीर्दीत अनेक चित्रे काढली ज्यात त्यांची मेडोना आॅफ द राॅक्स,मोनालिसा द लास्ट सफर ही चित्रे फार गाजली.
लिओनार्डो द विंची यांचे पुर्ण नाव लिओनार्डो दी सेर पिएंदो दा विंची असे आहे.लिओनार्डो द विंची यांचा जन्म १५ एप्रिल १४५२ आंकियानो फ्लोअरन्स इटली येथे झाला होता.
लिओनार्डो द विंची यांचा मृत्यू २ मे १५१९ रोजी आंबवास इंद्र एलवहार फ्रान्स येथे झाला होता.लिओनार्डो द विंची हे एक इटालियन नागरीक होते.
आतापर्यंत लिओनार्डो द विंची यांनी चित्र कलेसोबत अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.लिओनार्डो द विंची हे अनेक शास्त्र तसेच विदयेमध्ये विदवान अणि पारंगत होते.
ज्यात अभियांत्रिकी,स्थापत्यशास्त्र,खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र,पुराजीवशास्त्र,शरीरशास्त्र गणित भुमिती अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो.ह्याच मुळेच लिओनार्डो द विंची यांना एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.
याचसोबत लिओनार्डो हे शिल्पकला,संगीतकला यात देखील पारंगत होते.
लिओनार्डो द विंची हे वास्तववादी चित्रे काढण्यात पारंगत होते.कारण याकरीता त्यांनी शरीरशास्त्र ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला होता.
लिओनार्डो द विंची यांची कलाकृती मोनालिसाचे चित्र ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखली जाते.ह्या कलाकृती मध्ये मोनालिसाच्या चेहर्यावर दाखविले गेलेले स्मित हास्य हे आजही आपणास कोड्यात टाकते.
फ्रान्सेस्को दि बतोर्लमिओ डेल गीओकोन्डो नामक व्यापारीची पत्नी वय वर्षे २४ मेडोना लिसा उर्फ मोनालिसा हिचे हे चित्र लिओनार्डो द विंची यांनी रेखाटले होते.
लिओनार्डो द विंची यांनी मोनालिसा हिच्या उजव्या बुबुळावर त्यांची सही देखील केली असल्याचे सांगितले जाते.
फेस रिकोगनाइझेशन साॅफ्टवेअर नुसार असे समोर आले आहे की लिओनार्डो द विंची यांनी चित्र काढलेली मोनालिसा पेंटिंग मध्ये दोन टक्के रागावलेली,नऊ टक्के नाराज,८३ टक्के आनंदी अणि सहा टक्के घाबरलेली दिसुन येते.
लिओनार्डो द विंची हे एक प्रथम व्यक्ती होते ज्यांनी आकाशाचा रंग निळा का दिसतो याचे कारण सांगितले आहे.
लिओनार्डो द विंची एकाच वेळी एका हाताने लेखन करायचे अणि दुसरया हाताने चित्र देखील काढत असत.
लिओनार्डो हे हेलिकॉप्टर पॅराशुट विमानाचे चित्र काढणारे पहिले चित्रकार होते.याचसोबत स्विमिंग पूल पॅडलबोट मोटरकार देखील डिझाईन केली होती.
लिओनार्डो यांनी काढलेले चित्र पेंटिंग मोनालिसा हे इतिहासातील सर्वोच्च विनामुल्य पेटिंग म्हणून ओळखली जाते.