जागतिक कला दिन महत्व तसेच इतिहास काय आहे world art day history and importance in Marathi
दरवर्षी १५ एप्रिल रोजी जागतिक कला दिवस (world art day) साजरा केला जातो.हा दिवस कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येत असतो.
आज आपल्या देशात तसेच संपूर्ण जगात लाखो तसेच करोडो व्यक्ती असे आहेत ज्यांचे कलेवर प्रेम आहे.ज्यांच्या मनात कलेविषयी रूची आवड आहे.अणि ते मनापासून कलेचा सन्मान देखील करतात.
या दिवशी समाजात कलेविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.लोकांना आपल्या जीवनात कलेचे महत्व काय आहे हे पटवून दिले जाते.
आजच्या दिवशी जागोजागी विविध प्रकारची प्रदर्शने सेमिनार आयोजित केले जातात यात प्रत्येक कलावंत आपापल्या कलेचे प्रदर्शन करीत असतो.
बंगाली नवीन वर्ष २०२३ च्या शुभेच्छा, कोट, संदेश, फोटो
जागतिक कला दिन सर्वप्रथम २०१२ मध्ये लिओनार्दो द विंची यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा करण्यात आला होता.लिओनार्दो द विंची हे इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध संशोधक,चित्रकार होते जे रेनेसान्स काळात होऊन गेले होते.
लिओनार्दो द विंची यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा युनेस्कोच्या जनरल काॅनफरन्स कडुन करण्यात आली होती.तेव्हापासुन लिओनार्दो द विंची यांचा जन्म दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जात आहे.
२०१७ मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट कडुन आपल्या पहिल्या अध्यायाची निर्मिती करण्यात आली होती.ह्या अध्यायानुसारच इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट कडून हा दिवस साजरा करण्यासाठी जनतेला आवाहन केले जाऊ लागले.
म्हणुन हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
कलाकारांसाठी हा दिवस कला उत्सवाचा दिवस असतो ह्या दिवशी सर्व कलावंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शने तसेच सेमिनार आयोजित करतात.यात विविध कलाकार आपल्या कलेचे जगासमोर प्रदर्शन करीत असतात.
या दिवशी कलाक्षेत्रातील कलावंतांच्या आवडीनिवडीचा रूचीचा विशेष विचार केला जातो.कलेशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा मसलत केली जाते.विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
लोकांना मनात कलेविषयी रूची निर्माण व्हावी लोकांचा कल झुकता कलेकडे अधिक वाढायला हवा यासाठी कलेला प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रम उपक्रम राबविले जात असतात.
जागतिक कला दिनी लहान मुले तसेच तरुण मंडळी यांना कलेसोबत जोडण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था विशिष्ट कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात.
कलेच्या माध्यमातूनच आपणास कोणत्याही ज्ञानाची,माहीतीची आपापसात देवाणघेवाण करता येत असते.आपले ज्ञानात वृदधी होत असते.म्हणुन आपण प्रत्येक कलावंताचा मनापासून आदर करायला हवा.
कला आपल्या अंगात सर्जनशीलता निर्माण करते शिकण्याची आवड निर्माण करत असते.कला आपणास कोणत्याही गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रेरित करत असते.कलेमुळे आपल्या आत्मसन्मानात वाढ होण्यास मदत होते.
आज कलेच्या जोरावर आपणास आपले पोट देखील भरता येते.लाखो लोक आज आपल्या अंगात असलेल्या कलेच्या जोरावर भरपुर पैसा देखील कमावताना आज दिसुन येतात.
अशा पद्धतीने मानवी जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.