डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर निबंध – Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण निबंध – Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

मित्रांनो डाँ सर्वपल्ली राधाकृषण यांना आपण एक आदर्श शिक्षक म्हणुन ओळखतो.डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा वाढदिवस हा संपुर्ण भारतात शिक्षक दिन म्हणुन ५ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जात असतो.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक प्रसिदध शिक्षक तर होतेच याचशिवाय ते एक उत्तम लेखक देखील होते.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडु मधील थिरूवनंतपुरम येथील एका गरीब ब्राहमण परिवारामध्ये झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी अणि मातेचे नाव सीताम्मा असे होते.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे वडील जमीन दारीचे काम करायचे.पण ते काम करून त्यांना पुरेसे वेतन प्राप्त होत नव्हते.

म्हणुन घरची परिस्थिति गरीबीची असल्याने आपले शिक्षण सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी स्काँलरशिप घेऊन पुर्ण केले.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे प्राथमिक शिक्षण हे तिरूपती स्कुल,ल्युथरन मिशन स्कुल,मद्रास ख्रिश्चन काँलेज मधुन पुर्ण केले.

याचसोबत त्यांनी आपले बीए एम ए चे शिक्षण देखील पुर्ण केले.त्यांना तत्वज्ञान ह्या विषयात विशेष आवड होती.

अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी 1903 मध्ये त्यांचा शिवकम्मुमा यांच्याही विवाह पार पाडला.1908 मध्ये दोघांना एक मुलगी झाली.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या वडिलांना एकुण सहा अपत्ये होती.ज्यात पाच मुले अणि एक मुलीचा समावेश होता.डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण हे त्यात दुसरे अपत्य होते.

1909 मध्ये मद्रास येथील प्रेसिडेंसी काँलेजात असिस्टंट प्रोफेसर म्हणुन कार्यरत झाले.एवढेच नव्हे तर भारत देशातील अनेक महाविद्यालया मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केले.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांना उपनिषदे,भगवदगीता,इत्यादी धार्मिक ग्रंथांची चांगली ओळख होती.याचसोबत त्यांना जैन बौदध पाश्चात्य तत्वज्ञानाचेही उत्तम ज्ञान प्राप्त होते.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण हे चांगले शिक्षक तर होतेच याचसोबत ते भारतीय संस्कृतीवर प्रेम करणारे एक उत्तम लेखक विचारवंत तत्वज्ञ देखील होते.आपल्या संपुर्ण कार्यकाळात तत्वज्ञांनावर आधारीत अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.

See also  ऋषि सुनक यांचा जीवन परिचय - Biography of Rishi Sunak in Marathi

सर्वपल्ली राधाकृष्ण दोनदा भारताचे पहिले उपराष्टपती अणि भारताचे दुसरे राष्टपती देखील बनले होते.

1952 ते 1962 या कालावधि मध्ये ते भारताचे उपराष्ट्रपति होते तर 13 मे 1962 रोजी त्यांची राष्टपती पदासाठी निवड करून नियुक्ती करण्यात आली.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे असे मत होते की समाजाच्या विकासामध्ये शिक्षक हा एक असा व्यक्ती आहे जो फार मोलाची अणि महत्वपूर्ण भुमिका पार पाडत असतो.

आज सर्वपल्ली राधाकृष्ण हयात नाहीये पण त्यांचे शैक्षणिक विचार आज देखील समाजात जिवंत आहेत.आजही त्यांचे विचार तरूणांना विदयार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करतात.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांना शिक्षण अणि राजकारण या दोघे क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानामुळे भारत सरकारकडुन 1954 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्नने सम्मानित करण्यात आले होते.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी तब्बल चाळीस वर्षे अध्यापणाच्या क्षेत्रात शिक्षक म्हणून काम केले.

डाँ राधाकृष्णन स्वामी विवेकानंद अणि वि.दा सावरकर यांना आपला आदर्श मानायचे.म्हणुन त्यांनी विवेकानंद अणि सावरकर यांच्या विषयी खोल अभ्यास देखील केला होता.

अशा ह्या आदर्श शिक्षक,विचारवंत,तत्वज्ञ,लेखक, राजकीय कार्यकर्ताचे 1975 मध्ये 17 एप्रिल रोजी दुखद निधन झाले होते.

शिक्षक दिन निबंध भाषण -Teacher Day Essay And Speech In Marathi

1 thought on “डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर निबंध – Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi”

Comments are closed.