शिक्षक दिन कोटस शुभेच्छा संदेश -Teachers Day Quotes,Messages And Wishes In Marathi

शिक्षक दिन कोटस शुभेच्छा संदेश -Teachers Day Quotes,Messages And Wishes In Marathi

1)शिक्षक हा जगातील असा एकमेव व्यक्ती असतो जो स्वता मेणबत्तीप्रमाणे जळतो अणि आपल्या विदयार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करीत असतो. शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

2) जेव्हा सर्व दरवाजे मार्ग बंद होत असतात.तेव्हा एक व्यक्ती असतो जो आपणास नवीन मार्ग दाखवत असतो.जो आपणास फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाही तर आयुष्य जगायला देखील शिकवत असतो.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3) गुरूशिवाय ज्ञान नाही
अणि ज्ञानाशिवाय जगात सन्मान नाही

शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

4) विदयार्थ्यांना जीवन जगायचे कौशल्य शिकवतो तो शिक्षक.ज्ञानाचे खरे मोल महत्व पटवून देतो तो खरा शिक्षक.

शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

5) एक उत्तम शिक्षक फक्त विदयार्थ्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत नसतो तर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्या आतच शोधायला प्रेरीत करीत असतो.

माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

6) तुम्ही आम्हा विदयार्थ्यांना नेहमी शांततेचा धडा शिकविला,आमच्या जीवनामधील अज्ञानाचा अंधकार दुर केला तुम्हीच शिकवले राग दवेष तिरस्कारावर प्रेमाने विजय प्राप्त करायला.

7) आपल्या विदयार्थ्याला नेहमी खरे बोलावे अणि हिंसा करू नये,वाईट बोलु नये,वाईट ऐकु नये अशी अनमोल शिकवण देणारया

सर्व आदर्श शिक्षकांस माझ्याकडुन शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8) आपल्या विदयार्थ्याना नेहमी आधार देणारया,त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणारया,सदैव त्यांच्या डोक्यावर आपला आशिर्वादाचा हात ठेवणारया शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

9) ज्यांनी मला योग्य काय आहे अणि अयोग्य काय आहे यामधील फरक समजावून सांगितला
जीवणात दिशाहीन झालेलो असताना मला योग्य तो मार्ग दाखवला

अशा माझ्यावर संस्कार करणारया माझ्या सर्व आदर्श शिक्षक वर्गास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

10) एका विदयार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे महत्व कधीच कमी होणार नाही.ज्ञान तर आज आपण इंटरनेटवरून देखील प्राप्त करू शकतो पण योग्य अयोग्यची समज जाणीव ही आपणास आपले शिक्षकच योग्य पदधतीने करून देत असतात.

See also  Grey Market IPO काय आहे? - Grey Market IPO information in Marathi

माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11) खरा आनंद हा ध्येय प्राप्त करण्यात नसुन ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घेतलेल्या अथक परिश्रम मेहनतीत अणि प्रयत्नात असतो.ही शिकवण नेहमी तुम्ही आम्हास दिली. तुम्हाला शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

12) आत्मविश्वास तर प्रत्येक विदयार्थ्यात आधीपासुन असतो पण त्याला जागृत करण्याची आवश्यकता असते जे काम फक्त शिक्षक करीत असतात. माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

13) आपल्या आईवडिलांनंतर एकच अशी व्यक्ती असते जी आपल्या जीवनाला योग्य दिशा देत असते ते म्हणजे आपले शिक्षक. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

14) शिक्षक तो व्यक्ती असतो जो आपणास अज्ञान अणि अंधकारातुन ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जात असतो.

15) ज्यांनी आम्हाला चांगले अणि वाईट याची ओळख करून दिली नेहमी सत्याच्या मार्गावर चालायची शिकवण दिली जीवनाच्या प्रत्येक क्षणी मार्गदर्शन केले अशा देशाच्या उज्वल भविष्याची निर्मिती करणारया सर्व आदर्श शिक्षकांना शत शत नमन

शिक्षक दिनाच्या आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा

16) आमचे जीवन घडविण्यासाठी तुम्ही जे कठोर परिश्रम घेतले.स्वता जळुन आमच्या जीवनात जो ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला त्याबददल आम्ही सर्व विदयार्थी तुमचे सदैव मनापासुन त्रणी असु. शिक्षक दिनाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

17) आईवडिलांनी तर फक्त जन्म दिला पण जीवन जगण्यासाठी माणुस बनण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असते ते ज्ञान तुम्ही आम्हाला दिले.सर्व शिक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

18) तुम्ही आमच्या जीवणाचा खरा आधारस्तंभ आहात,तुम्हीच आमचे मार्गदर्शक तर आ्च्या जीवणाची प्रेरणा अणि आमचे गुरू देखील तुम्हीच आहात. तुम्हाला शिक्षक दिनाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा

19) खरच आम्ही विदयार्थी खुप नशिबवान आहोत की तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला मिळाले. तुम्हाला आम्हा सर्वांकडुन शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

See also  जगदीप धनखर यांचा जीवन परिचय (उपराष्ट्रपति पदाचे उमेदवार ) - Biography - Jagdeep Dhankhar Information In Marathi

20) तुम्ही ह्या जगातील सर्वात उत्तम शिक्षक आहात अणि बेस्ट टीचरचा अवाँर्ड देखील आम्ही तुम्हालाच देतो. तुम्हाला आमच्याकडुन शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

21) आज तुमच्यामुळेच आम्हा लाखो विदयार्थ्यांचे भविष्य सोनेरी झाले आहे.आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपले खुप खुप आभार.आपणास शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

22) लाखो विदयार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन देशाचे भवितव्य घडविणारया सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

23) तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला मिळाले आमच्यासाठी ही गोष्ट कुठल्या वरदानापेक्षा कमी नाही. शिक्षक दिनाच्या आपणास आम्हा सर्व विदयार्थ्याकडून खुप खुप शुभेच्छा

24) अपुर्णास आपण पुर्ण केले,शब्दांनी ज्ञान वाढविले तुम्ही,तुम्हीच आपल्या तत्वांतुन आम्हा सर्व विदयार्थ्यांच्या जीवनात मुल्ये रूजवली. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

25) तुम्हीच दिला जीवनाला आमच्या आकार तुमच्यामुळेच झाले आमचे जीवन अणि स्वप्र साकार,शिक्षक दिनाच्या तुम्हाला आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा

26) गुरूवर्य तुमच्या ह्या उपकाराचे कसे फेडु आम्ही मोल लाख मौल्यवान धनापेक्षा तुम्ही दिलेले ज्ञान आहे अत्यंत अनमोल.माझ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

27) काळया फळयावर पांढरया खडुने लिहुन तुम्ही माझ्यासारख्या कित्येक विदयार्थ्यांच्या आयुष्यात तुम्ही आजपर्यत रंग भरले.शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

28) तुम्ही आम्हा विदयार्थ्यांचे फक्त शिक्षक नसुन आधारस्तंभ,प्रेरणा,मार्गदर्शक,अणि एक उत्तम मित्र देखील आहात. शिक्षक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

29) आम्हाला ज्ञानाचे अनमोल धडे देऊन स्वताच्या पायावर उभे करणारया,खंबीर बनविणारया,जीवणात यशस्वी बनविणारया आमच्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

30) नेहमी तुम्ही आम्हा विदयार्थ्यांना सपोर्ट केलात.आपले अमुल्य मार्गदर्शन आम्हास दिले आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्यामुळेच आहोत. शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

31) शिकवता शिकवता तुम्ही आम्हा विदयार्थ्यांना आकाशास गवसणी घालण्याचे सामर्थ्य दिले त्याबददल आपले खुप खुप आभार ,शिक्षक दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा

See also  15 आँगस्ट निबंध अणि भाषण - Independence Day Essay And Speech In Marathi

32) गुरु ब्रम्हा गुरू विष्णु
गुरू देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रम्ह
तस्मे श्री गुरूवे नम

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

33) शिक्षण हे जगातील सर्वात मोठे वरदान आहे.अणि गुरूचे मार्गदर्शन लाभणे आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान जगात दुसरा कोणताही नाही.हँपी टिचर्स डे

34) तुम्हीच आम्हाला साक्षर बनविले.जीवन काय आहे हे आम्हा विदयार्थ्यांना समजावून सांगितले..शिक्षक दिनाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

35) शीलवान क्षमाशील अणि कर्तव्यनिष्ठ अशा सर्व शिक्षकांना माझे वंदन

शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

36) शिक्षणाची ज्योत पेटवून अज्ञानाचा अंधकार दुर करणारया तसेच नवभारताची भावी सुशिक्षित पिढी घडविणारया सर्व शिक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम

शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

37) आयुष्यात योग्य गुरूचा हात हातात मिळणे अणि साथ मिळणे खुप महत्वाचे असते.

हँपी टिचर्स डे

38) शिक्षक हा तो व्यक्ती आहे जो स्वता आहे तिथेच राहतो पण आपल्याला,आपल्यासारख्या लाखो करोडो विदयार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यत पोहचवतो.

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

39) आई वडील हे आपणास जीवन देतात पण त्या जीवणाला शिक्षणाच्या माध्यमातुन योग्य आकार अणि दिशा,वळण देण्याचे काम आपले शिक्षक करत असतात.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

40) एक शिक्षक लाखो करोडो विदयार्थ्यांचे जीवन बदलुन टाकत असतो.

41) कधी प्रेमाने समजावून सांगुन तर कधी ओरडुन मला जीवणाचा योग्य मार्ग दाखवणारया

माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा