व्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ – VRS meaning and full form in Marathi

व्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ VRS meaning and full form in Marathi

मित्रांनो जे लोक एखाद्या सरकारी खात्यात नोकरी करत आहे.त्यांना नोकरी करत असताना आपल्या कार्यकाळात सेवानिवृत्तीशी संबंधित एक शब्द नेहमी ऐकायला मिळत असतो तो म्हणजे व्ही आर एस.

अणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुदधा खुप जणांच्या तोंडुन हा शब्द ऐकत देखील असतो की अमुक व्यक्तीने व्हीआर एस घेतला तमुक व्यक्ती व्ही आर एस घेतो आहे.

पण याचा अर्थ काय होतो हेच आपणास माहीत नसते म्हणुन समोरचा काय बोलतो आहे हेच आपल्याला कळत नही.

म्हणुन आजच्या लेखात आपण व्ही आर एस म्हणजे काय?व्हीआर एस कशाला म्हणतात?व्ही आर कधी घेता येतो?कोणाला घेता येतो ह्या सर्व महत्वपूर्ण बाबींविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

व्ही आर एस फुलफाँर्म काय होत असतो?vrs full form in marathi

व्ही आर एसचा फुलफाँर्म हा voluntary retirement scheme असा होत असतो.

व्ही आर एस म्हणजे काय?VRS meaning in Marathi

व्ही आर एस म्हणजे स्वेच्छिक सेवानिवृत्ती योजना.ही योजना सर्व सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारींसाठी विशेषत असते.

ह्या व्हीआर एस सिस्टमदवारे कुठल्याही सरकारी खाजगी कंपनी,संस्था मधील कर्मचारी आपल्या ईच्छेनुसार स्वच्छेने नोकरी वरून सेवानिवृत्ती घेऊन सेवा निवृत्त होऊ शकतात.

See also  बाबा वंगा कोण आहे? | Who is Baba Vanga?

व्ही आर दवारे फक्त जुन्या कर्मचारींना सेवानिवृत्त केले जात असते.ह्या नियमात नवीन कर्मचारी समाविष्ट होत नसतात.

व्ही आर एस नियमामध्ये अशा कर्मचारींना सेवानिवृत्त केले जाते जे खुप जुने आहेत.वयोवृदध झाले आहेत तसेच वयस्कर होत आले आहेत.

व्ही आर दवारे कुठलाही कर्मचारी आपल्या निर्धारीत रिटायरमेंटच्या वेळेच्या अगोदर स्व ईच्छेने नोकरीवरून सेवानिवृत्त होऊ शकतो.तसेच कंपनी देखील ह्या नियमांतर्गत एखाद्या कर्मचारीला नोकरीवरून काढु शकते कमी करू शकते.

व्ही आर एस कोणाला घेता येत असतो?व्ही आर एसचे नियम काय असतात?

व्ही आर एस ची सुविधा ही सर्व सरकारी खाजगी कंपनी संस्थेतील कर्मचारी तसेच सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी असते.

● एखाद्या कंपनी तसेच संस्थेतील असे कर्मचारी ज्यांचे वय ५० आहे.किंवा त्यापेक्षा अधिक आहे अणि त्या कर्मचारीने २० तसेच त्यापेक्षा अधिक वर्ष सर्विस पुर्ण केली आहे.असा कर्मचारी व्ही आर एस घेण्यास पात्र ठरत असतो.

● यानंतर कर्मचारीला आपण आपली वीस वर्षाची सर्विस पुर्ण केली आहे अणि आपल्याला सेवानिवृत्त व्हायचे आहे असा अर्ज तसेच नोटीस आपल्या नियुक्ती प्राधिकरणाकडे पाठवावे लागते.म्हणजेच एक व्हीआर एसचा अर्ज पाठवावा लागतो.

● मग नियुक्ती प्राधिकरण अधिकारी हे कर्मचारीने व्ही आर एस घेण्यासाठी पाठवलेला अर्ज नोटीस तीन महिन्यांची एफडी प्राप्त झाल्याच्या तारखेपर्यत मोजत असतात.

● यात कर्मचारीने आपली पात्रता सर्विस पुर्ण केली आहे हे सिदध झाले की कर्मचारीला व्हीआर एस दिला जात असतो.

● जो कर्मचारी आजारपणामुळे वय वाढल्यामुळे शारीरीक अणि मानसिक दृष्टया काम करण्यासाठी नोकरी करण्यासाठी सक्षम नसतात असे कर्मचारी आपल्या निर्धारीत रिटायरमेंटच्या वेळेच्या अगोदर स्व ईच्छेने नोकरीवरून सेवानिवृत्त होऊ शकतात.व्ही आर एस घेत असतात.

● ज्या कर्मचारींना आपल्या निर्धारीत रिटायरमेंटच्या वेळेच्या वयाच्या आधी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घ्यायची आहे असे कर्मचारी व्ही आर साठी अर्ज करून व्ही आर एस घेऊ शकतात.

See also  फेमिना मिस इंडिया 2023 मधील विजेत्यांची यादी - Femina Miss India 2023 winner list in Marathi

जुन्या कर्मचारींना व्ही आर एस का अणि केव्हा दिला जात असतो?

जुन्या कर्मचारींना काढुन त्याजागी नवीन तरूण होतकरू कर्मचारींची कामावर भरती करण्यासाठी त्यांना सेवेची नोकरीची संधी देण्यासाठी जुना स्टाफ काढुन कमी करून नवीन स्टाफची भरती करण्यासाठी जुन्या कर्मचारींना व्ही आर एस नियमांतर्गत नोकरीवरून काढले जात असते.

म्हणजेच कर्मचारींना व्ही आर एस दिला जात असतो.तसेच स्वेच्छिक पदधतीने व्ही आर एस घेऊन निवृत्त होण्यास सांगितले जात असते.

याचसोबत व्यवसायात मंदी निर्माण होत असते तेव्हा देखील हा नियम कर्मचारींची संख्या कमी करण्यासाठी लागु केला जात असतो.

जेव्हा व्यवसायात स्पर्धा वाढते तेव्हा व्यवसायाची परिस्थिति सुधारेपर्यत कर्मचारींना व्ही आर एस दिला जातो.

व्यवसायात नवीन तंत्रज्ञान तसेच उत्पादन हाताळण्याच्या नवीन पदधती लागु करण्यासाठी अणि जुन्या तंत्रज्ञान पदधतीला काढुन टाकण्यासाठी हा नियम लागु केला जात असतो.

कंपनी संपादन तसेच विलगीकरणाची प्रक्रियेत सुदधा हा नियम लागु केला जात असतो.

व्ही आर एस घेण्याचे फायदे कोणकोणते असतात?

● जे कर्मचारी व्हीआर एस नियमांतर्गत सेवानिवृत्त होत असतात अशा कर्मचारींना सरकारकडुन एक निश्चित रक्कमेत वेतन दिले जात असते.

● आयकर कायदा 1961 च्या कलम 10 सी-नुसार, व्ही आर एस मध्ये मिळालेल्या भरपाईच्या रकमेवर कमाल 500000 रुपयांची सवलत प्रदान केली जात असते.

● तसेच व्ही आर एस घेतलेला कर्मचारी हा एक ठराविक रक्कम भरल्यानंतर केंद्र आणि राज्याकडून दिल्या जाणारया इतर इतर सेवा सुविधांचा देखील लाभ घेऊ शकतो.

व्ही आर एस घेण्याचे तोटे –

व्ही आर घेण्याचे जसे फायदे होत असतात तसेच अनेक तोटे देखील कर्मचारींना सहन करावे लागत असतात.

व्ही आर एस घेतल्यानंतर जी रक्कम कर्मचारींना दिली जात असते ती रिटायरमेंटचा अवधी पुर्ण झाल्यानंतर जी रक्कम दिली जात असते त्यापेक्षा कमी असते.

रिटायरमेंटचा कालावधीनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर जे विशेष भत्ते अलाउन्स सोयसुविधा कर्मचारीला प्राप्त होणार असतात त्या पासुन त्याला वंचित राहावे लागते.

See also  CIBIL म्हणजे काय ? CIBIL full form in Marathi

जुन्या अनुभवी तज्ञ पारंगत कर्मचारीने व्ही आर घेतल्याने कंपनीचे देखील एक प्रकारचे नुकसान होत असते कारण त्यांनी एक चांगला कर्मचारी गमावलेला असतो.