389 इंग्रजी म्हणींचे मराठीत अर्थ 389 English proverbs with their Marathi meaning
1)a will Will find a way -इच्छा तिथे मार्ग
2) a stitch in time save nine -वेळीच केलेल्या उपायांमुळे संभाव्य हानी टळते.
3) first come first serve -हाजीर तो वजीर
4) every man is creature of his own fortune -प्रत्येक मनुष्य आपल्या भाग्याचा निर्माता आहे.
5) between two stools we come to the ground -दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
6) much display but no substance -बडा घर पोकळ वासा
7) all is well end is well -ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड
8) money makes the mare go – दाम करी काम
9) a day after the fair -बैल गेला नि झोपा केला
10) between the devil and deep sea -इकडे आड तिकडे विहीर
11) delay of justice is injustice -न्यायाला विलंब म्हणजे अन्याय
12) he who makes no mistakes makes nothing -जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही
13) patience is plaster for all sores -संयम सबुरी हा सर्व दुखावरचा इलाज आहे.
14) the wearer best knows where the shoe pinches -ज्याचे जळते त्यालाच कळते/जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे
15) a picture is worth a thousand words -एक चित्र हजारो शब्दांएवढे असते.
16) civility cost nothing -सौजन्य अनमोल असते.
17) birds of feather flock together -एकाच माळेचे मणी सारख्या विचाराचे व्यक्ती नेहमी सोबत असतात.
18) charity begins at home – चांगल्या कामाची सुरुवात स्वताच्या घरापासून करावी औदर्याची सुरूवात आपल्या घरापासून करावी.
19) as the king so are the subjects-यथा राजा तथा प्रजा
20) a fool and his money are soon parted-मुर्ख माणसाजवळ लक्ष्मी नांदत नाही.
21) where there is a will there is a way -ईच्छा असेल तर मार्ग दिसेल
22) all is fair in love and war – प्रेमात अणि युद्धात सर्व काही माफ असते.
23) cowards may die many times before there death -भित्यापाठी ब्रह्मराक्षस
24) it takes two to make quarrel -एका हाताने टाळी वाजत नाही.
25) cut your coat according to your cloth -अंथरूण पाहुन पाय पसरावे
26) a positive attitude can overcome negative situation -सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थिती वर देखील मात करता येते.
27) all that glitteres is not gold -चकाकते ते सर्व सोने नसते.
28) casting pearls before swine -गाढवापुढे वाचली गीता
29) passion leads to poverty -अतिराग भीक माग
30) a bird in hand worth two in bush -हातचे सोडुन पळत्याच्या मागे लागु नये
31) haste makes waste -अति घाई संकटात नेई
32) sound mind in a sound body -शरीर निरोगी तर मन निरोगी
33) a fireband in the hand of madman -माकडाच्या हाती कोलीत
34) action speaks louder than words -उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ
35) more than match – शेरास सव्वाशेर
36) doing is better than saying -क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे.
37) half a loaf than better than none -उपवास घडण्यापेक्षा अर्धी भाकर बरी
38) anger punishes itself – अतिराग भीकराग
39) courtesy cost nothing -सभ्यतेने वागायला पैसे लागत नाही
40) speech is silver and silence is golden -बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ
41) doctors after death – वराती मागुन घोडे
42) courage is the surest weapon in danger -संकटकाळी सर्वांना हमखास उपयोगी पडणारे हत्यार म्हणजे धैर्य
43) slow and steady wins the race -सावकाश अणि सातत्याने काम केल्याने यश मिळते.
44) look before you leap -पुर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नये
45) Penny wise pound foolish -विळा मोडुन खिळा करणारा
46) reap as you sow -पेरावे तसे उगवते
47) familiarity breeds contempt – अतिपरिचयात अवज्ञा
48) a good deed is a never lost -चांगले कार्य कधीही वाया जात नाही.
49) like father like son like mother like daughter -बाप तसा बेटा आई तशी बेटी (खाण तशी माती)
50) make hay while the sun shine-तापत्या तव्यावर पोळी भाजून घ्यावी वाहत्या गंगेत हात धुवून घेणे
51) habit is second nature – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
52) rome was not build in day -चांगले काम एका दिवसात होत नाही.
53) a word is enough for the wise -शहाण्याला शब्दाचा मार
54) many a little makes a micckle -थेंबे थेंबे तळे साचे
55) money is the root of all evil-पैसा हेच सर्व अनर्थाचे मुळ
56) a good appetite needs to sauce -भुकेने भुत थाली पिठाला राजी
57) a drowning man catches at a straw -बुडत्याला काडीचा आधार
58) majority carries the point -पाचामुखी परमेश्वर
59) a guilty conscience pricks the mind -चोराच्या मनात चांदणे
60) might is right – बळी तो कान पिळी
61) man proposes god disposes-मनुष्य योजतो एक देवाच्या मनात असते वेगळेच
62) misfortune seldom come alone -संकटे एकटी येत नाही
63) diamond cuts diamond – काटयाने काटा काढणे
64) he plays well who win -ज्याच्या हाती ससा तो पारधी
65) friends agree at distance -दुरून डोंगर साजरा करणे
66) character is destiny -माणसाच्या भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.
67) no rose without a thorn-टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
68) more you struggle more you become strong -तुम्ही जेवढा अधिक संघर्ष करता तुम्ही तेवढे अधिक मजबुत कणखर बनता
69) no pain no gain – कष्टाविना फळ नाही
70) none but brave deserve the fair -शुर लोकच न्याय मिळविण्यास पात्र ठरतात
71) early to bed early to rise makes a man healthy wealthy and wise -लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे
72) nothing venture nothing have -साहसाशिवाय यश नाही.
73) an empty vessel makes much noise – उथळ पाण्याला खळखळाट फार
74) many hand work makes light -अनेकांच्या मदतीने काम सोपे बनते
75) as you sow so shall you reap -करावे तसे भरावे
76) one man meat and another man poison -एखादयाला ज्याचे आमिष तेच दुसरयासाठी विष
77) every light has its shadow -दिव्याखाली अंधार
78) spare the rod and spoil the child -छडी लागे छम छम विद्या येई गमगम
79) a thief always fancies that it is a moonlight -चोराच्या मनात चांदणे
80) a friend in need is a friend indeed -गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र
81) absence makes the heart grow fonder -विरहाने स्नेह भाव अधिक दृढ होतो
82) drops make an ocean -थेंबे थेंबे तळे साचे
83) change your thought and you will change your world -तुमचे विचार बदला तुमचे जग आपोआप बदलेल
84) distance lend enchantment to the view -दुरून डोंगर साजरे
85) one swallow does not make a summer -एखादया उदाहरणावरून नियम सिदध होत नाही.
86) hust to eat and stone to sleep -खायला कोंडा आणी झोपायला धोंडा
87) set a thief to catch a thief -चोराच्या वाटा चोरालाच माहीत
88) honesty is the best policy -प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे
89) an angel when pleased a devil when indignant -वळले तर सुत नाही तर भुत
90) failure is a stepping stone to success -अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
91) a bad workman quarrel with his tools -नाचता येईना अंगन वाकडे
92) listen to people but obey your conscience -ऐकावे जनाचे करावे मनाचे
93) dont cross bridge untill you come to it-संकटे येण्या आधीच त्याची चिंता करत बसू नका
94) one man fault is another man lesson -पुढच्यास ठेच मागचा शहाणा
95) every dog has his days -चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
96) to err is human -चुकणे हा मनुष्य धर्म आहे माणुस हा चुकीचा पुतळा आहे.
97) a fig for doctor when cured -गरज सरो वैद्य मरो
98) one cannot serve to masters -दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
99) confidence is a key to success -आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.
100) you only lose when you give up -तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडुन देता
101) practice what you preach -बोलावे तसे चालावे
102) money makes the mare go -अडला नारायण गाढवाचे पाय धरी/पैशाभोवती फिरते दुनिया/दाम करी काम
103) when the cat away the mice will play -मांजराच्या अनुपस्थित उंदराचे राज्य
104) seeing is believing – हाताच्या कंकणाला आरसा कशाला
105) well begun is half done -चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यात जमा
107) contentment is happiness – संतोष हेच परमसुख
108) coming events cast their shadows before -मेघ गर्जती वर्षती आधी काळोख करती
109) bad news travel fast -वाईट बातमी लवकर पसरते
110) truth will be out -खातीचे गाल आणि न्हातीचे बाल झाकत नाही सत्य कधीच लपत नाही
111) he that burns most shines most -जो जास्त जळतो तोच जास्त चमकतो
112) avoid extremes excess of everything is bad -अति तेथे माती
113) it is never to late to mend -चुक केव्हाही दुरूस्त करावी कितीही उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले
114) hearing brings wisdom speaking repentance -ऐकल्याने ज्ञान बुद्धिमत्ता मिळते बोलण्याने पश्चात्ताप
115) delay is dangerous -उशीर विघातक असतो.
116) a figure among cipheres -वासरात लंगडी गाय शहाणी
117) all work and no play makes jack a dull boy -कामच काम नी नाही खेळ फुकट जातो सारा वेळ
118) a sovereign word is the law -राजा बोले दल हले
119) hope is a affirmation of positive thoughts -आशा हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे
120) every success has trails of failure behind it -प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.
121) man is known by his company-माणसाची ओळख त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींमुळे कळते
122) ill gotten ill spent -हपापाचा माल गपागपा
123) one nail drives out another -नाक दाबले की तोंड उघडते
124) dont count your chickens before they are hatched -बाजारात तुरी अणि भट भटणीला मारी/पिल्ले अंडयातुन येण्या पुर्वीच त्यांची गणती काय महत्वाची
125) bones for the late comers -हाजीर तो वजीर
126) fortune favours the brave -साहसाच्या घरी लक्ष्मी पाणी भरी/साहसे श्री प्रति वसती
127) give everyone his due -ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे.
128) health is wealth – आरोग्य हीच संपत्ती
129) a penny saved is a penny gained -वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा
130) you cannot make an omlette without breaking the eggs -त्यागाशिवाय भोग नाही
131) good handwriting is the mirror of good learning -चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.
132) the darkest hour is before the down -कुटट अंधाराची वेळ सुर्योदय पुर्वीची असते अपयशाच्या दाट अंधारानंतर यशाची पहाट होते.
133) a journey of thousands miles begins with first step -हजारो मैलाचा प्रवास पहिले पाऊल टाकल्यावर सुरू होतो.
134) beggars cannot be choosers – अन्नक्षत्रात जाऊन मिरपुड मागु नये
135) it is no use crying over spilt milk-गतकाळाचा शोक फुका
136) old is gold – जुने ते सोने
137) pride has a fall – गर्वाचे घर खाली
138) it is not work that kills but worry -कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणुस जास्त मरतो
139) union is strength – ऐक्य हेच सामर्थ्य आहे/एकी हेच बळ
140) more haste less speed -घाई उपयोगाची नाही
141) united we stand divided we fall-ऐकी हेच बळ बेकी हेच नाश
142) dissimilarity is the law of nature -पाचही बोटे सारखी नसतात.
143) self help is the best help -स्वताच स्वताची केलेली मदत ही चांगली मदत असते.
144) the child is the father of man -मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
145) work is worship – परिश्रम हीच ईश्वरपुजा
146) jack off all trades and master of none -एक ना धड भाराभर चिंध्या
147) a rolling stone gathers no moss -कडकडत जाणारया दगडाला शेवाळ चिटकत नाही.चंचलपणा उपयोगाचा नाही.
148) blood is thicker than water -कातडयापेक्षा आतडयाची ओढ अधिक असते.रक्ताचे नाते अतुट असते.
149) saying is one thing doing another-बोलणे सोपे करणे अवघड
150) pen is mightier than sword -तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ
151) do well and have well -करावे तसे भरावे
152) empty mind is devil workshop -रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर
153) a nine days wonder -नव्याचे नऊ दिवस
154) never judge by appearances -दिसते तसे नसते
155) experience is best teacher -अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरू आहे.
156) an apple day keeps the doctor away -दररोज एक सफरचंद दवाखान्यात जाणे बंद
157) jack of all master of none – एक ना धड भाराभर चिंध्या
158) a friend is easier lost than found -चांगला मित्र मिळवणे कठीण गमावणे सोपे
159) appearance is deceptive -दिसते तसे नसते.
160) example is better than precept -उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ
161) many men many mind -वयक्ती तितक्या प्रकृती
162) one man loss and another man gain -पंत गेले राव चढले
163) prosperity makes friends -असतील शीते तर जमतील भूते
164) one good turn deserve another -उपकाराची फेड उपकारानेच करावी
165) the root of education are bitter but fruit is sweat -शिक्षणाची मुळे कडु असली तरी फळ गोड असते.
166) time is money – वेळ मौल्यवान आहे.
167) every house has its skeleton -घरोघरी मातीच्या चुली
168) the exception proves the rules -प्रत्येक नियमाला अपवाद असतो.
169) once bit twice shy – दुध पोळलेला ताकही कुंकुने पितो
170) tit for tat – जशास तसे
171) necessity knows no law -गरजवंताला अक्कल नसते.
172) it is better Said than done -बोलणे सोपे करणे अवघड
173) as the kings so are the subjects-यथा राजा तथा प्रजा
174) true wealth is celebrating the present movement -आत्ताची वेळ साजरा करता येणे हीच खरी संपत्ती आहे
175) too many Cooks spoil the broth -सतरा सुगरणी स्वयंपाक अळणी
176) the life without goal is life without meaning -ध्येयाविना जीवन निर्रथक आहे
177) when good cheer is lacking friends are packing-असतील शिते तर जमतील भूते
178) we don’t need candle to see the sun-स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याची आवश्यकता नसते.हाताच्या कंकणाला आरसा कशाला
179) make virtue of necessity -करून करून भागला नी देवपुजेला लागला
180) let bygones be bygones -झाले गेले ते विसरून जा
181) the early bird catches the worm -हाजीर तो वजीर
182) practice makes man perfect – सरावाने माणुस परिपुर्ण होतो
183) pain is gain – श्रम हीच शक्ती
184) a barking dog seldom bites -गरजेल तो पडेल काय
185) physician heal thyself -लोकासागे ब्रम्ह ज्ञान आपण कोरडे पाषाण
186) when in Rome do as the romans do -जसा देश तसा वेश
187) every cloud has silver lining -प्रत्येक दुर्दैवी क्षणानंतर आनंदाचा क्षण येणारच आहे संकटाच्या सागराला सुखाचा किनारा असतोच.
188) strike while iron is hot -तवा तापलेला आहे तोपर्यंत पोळी भाजून घेणे मिळालेल्या संधीचा लाभ घेणे
189) the brave die once,cowards many times -शुर लोक एकदाच मरतात भ्याड लोक भित्रे लोक प्रत्येक क्षणी मरत असतात.
190) to rob Peter to pay paul – हलवायाच्या घरावर तुळशीपत्र एखाद्याला लुटुन दुसरयाची भर करणे
191) a kick of cutt at all houres -बसता लाथ उठता बुक्की
192) cross the stream where it is the shallowest -कृती जेवढी सहजतेने होते तेवढे उत्तम
193) truth needs no evidence -हातच्या कंकणाला आरसा कशाला सत्याला पुराव्याची आवश्यकता नाही.
194) little things please little mind -कोल्हा काकडीला राजी
195) it never rains but it poures -संकटे ही एकटी येत नाही.
196) beauty is only skin deep -आकृतीपेक्षा कृती महत्वाची
197) instead of cursing the darkness be the one to the light a candle -परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थितीला सुधारण्यासाठी पुढाकार घ्या
198) every tide has its ebbs -भरती नंतर ओहोटी येते जीवनात चढ उतार येत असतात
199) still water run deep -संथपाणी खोलवर वाहत असते खरा विद्वान् व्यर्थ बडबड करत नाही.
200) silence is golden – झाकली मूठ सव्वा लाखाची
201) walls have ears – भिंतीला कान असतात.
202) necessity is the mother of invention – गरज ही शोधाची जननी आहे.
203) prayer is the voice of faith -प्रार्थना श्रद्धेचा आवाज आहे. प्रार्थना आत्म्याचा आवाज आहे.
204) to lock the stable door when the horse is stolen -बैल गेला नि झोपा केला वरातीमागून घोडे
205) love is blind – प्रेम आंधळ असत
206) two heads are better than one -एक से दो भले
207) knowledge is the power – ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञान हेच सामर्थ्य आहे.
208) money begets money – पैशाकडे पैसा ओढला जातो.
209) out of frying fan into the fire -अग्नीतुन फुफाट्यात एका संकटातून दुसरया संकटात
210) friends are many when pocket is full -असतील शिते तर जमतील भूते
211) life is love enjoy it -जीवनावर प्रेम करण्यात खरा आनंद आहे.
212) truth always triumph -सत्यमेव जयते
213) truth is always bitter – सत्य हे नेहमी कडवट कटु असते.
214) service to man is service to god -मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.
215) why cast pearls before swine -गाढवाला गुळाची चव काय
216) imperfect action is better than perfect inaction -परिपक्व निष्क्रियतेपेक्षा अपरिपक्व कृती कधीही चांगली मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले
217) what’s done cannot be done -एकदा जे घडले ते घडले
218) two is a company three is a crowd -तीन तिगाड काम बिघाड
219) as you make your bed so you must lie in it -जशी कृती तसे फळ
220) you cannot have cake and eat it too -झाड हवे तर लाकुड कसे मिळेल
221) better late than never -कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले चांगले
222) time and tide wait for none -काळ अणि वेळ कोणासाठी थांबत नाही.
223) happiness found in your heart,not in your circumstances -आनंद हा तुमच्या मनात असतो तुम्हाला मिळणारया गोष्टीत सभोवताली असलेल्या परिस्थिती मध्ये नसतो.
224) a burnt child dreads fire -पोळलेला मनुष्य अधिक काळजीपूर्वक वागतो दुधाने तोंड पोळले की मनुष्य ताक देखील फुंकुन पितो.
225) out of sight out of mind -दृष्टीआड तो सृष्टीआड
226) you scratch my back and i will scratch your-एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ
227) its fally to live in rome and strive with pope -पाण्यात राहुन माशाशी वैर घेऊ नये
228) trim a tree when it is young-संस्कार लहानपणापासूनच व्हायला हवेत.
229) never to old to learn never to late to turn -शिकायला वयाची अणि सुधारायला वेळेची मर्यादा नसते
230) good wine needs no bush -चांगल्या गोष्टीला जाहीरातीची गरज नसते.
231) must ado about nothing -काम थोडे अणि सोंग फार
232) oaks fall where reeds stand – महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती
233) dont put all eggs in one basket -एकावरच पुर्णपणे अवलंबून राहू नका
234) every man must carry his own cross -आपले मढे आपल्यालाच ओढावे लागते.
235) failure teaches success -अपयश यशाची पहिली पायरी आहे.
236) flattery brings friends truth enemies –
स्तुतीने मित्र मिळतात सत्य शत्रु निर्माण करते
237) everyone can find fault few can do better -प्रत्येक जण दुसर्याच्या चुका काढु शकतो थोडेच चांगले करू शकतात.
238) people living in glass houses should not throw stones -काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसरयावर दगडफेक करू नये.
239) great profits great risks -नफा म्हटले तर जोखिम येणारच
240) your best teacher is your last mistakes -तुमची झालेली चुक हीच तुमचा उत्तम शिक्षक आहे.
241) every day may not be good but there is something in everyday -प्रत्येक दिवस चांगला असेल असे नाही पण प्रत्येक दिवसांत काही तरी चांगले असतेच.
242) what is pound of butter amongst a pack of hounds -गाढवाला गुळाची चव काय
243) there is no washing the black white -कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच राहतो.
244) do not spur a willing horse -आपणहुन काम करणार्याच्या मागे लागु नये
245) grasp no more than they hand will hold -गरजेपेक्षा जास्त खाऊ नये
246) give a dog bad name and Kick it -शिक्षा देण्यासाठी चुक काढणे
247) prevention is better than cure -उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला
248) great mind think alike -सज्जन लोकांचे विचार सारखेच असतात.
249) while there is a life there is a hope -श्वास असेपर्यंत आशा असते.
250) tongue ever turns to the aching tooth -दुखी व्यक्तीकडे नेहमी सहानुभूतीने पाहिले जाते.
251) if the cap fits wear it – दुसर्याच्या सुचनेचा उपयोग होत असेल तर अंमलात आणा
252) give him an inch and he will take an ell -भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी
253) fine feather makes fine birds -खाण तशी माती
254) who never climbed never fell-चढेल तो पडेल काय
255) every ass loves to hear himself bray -प्रत्येकजण स्तुती प्रिय आहे.
256) to kill the goose that lays the golden egg -सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारणे
257) necessity turn lion into fox -गरजेपोटी सिंह सुदधा कोल्हा होऊन जातो.
258) never putt off till tomorrow what you can do today -आजचा काम आजच करा उद्यावर टाकु नका
259) uneasy lies the head that wears the crown -जया अंगी मोठेपण तया यातना कठिण
260) we cannot make ropes of sand -दात कोरून पोट भरत नाही.
261) a straw shows which way the wind blows -शितावरून भाताची परीक्षा
262) hunger is harder than death -अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ अधिक कठिण असतो.
263) nothing succeeds like success-यशासारख यश नाही
264) kind words are worth much and cost little -सौजन्याने बोलायला पैसे लागत नाही.
265) the fountain is clearest as its sources -सुरूवातीला सर्व चांगलं असत.
266) he whom god steers sails safely -देव तारी त्याला कोण मारी
267) a full purse make mouth speak -दाम करी काम
268) a good name sooner lost than won -नाव कमवायला वेळ लागतो गमवावा वेळ लागत नाही.
269) two blacks do not make white -ठेविले अनंत तैसेचि राहावे
270) to run with the hound and hunt with the hare -तयारी वाघाच्या शिकारीची अणि शिकार करायची सशाची
271) to kill two birds with one stone -एका दगडात दोन पक्षी मारणे एकाच कृतीतून दोन कामे करणे
272) the strength of chain is its weakest link-साखळीची मजबुती तिच्या नाजुक दुव्यावरून ठरवावी.
273) the end justifies the means -साधनाची योग्यता साध्य ठरवते.
274)new brooms sweep clean -आरंभाला सर्वच चांगले असते.
275) kindle not a fire that you cannot put out -नसत्या भानगडीत पडू नये
276) speak well of your friends and of your enemy nothing -मित्रांबददल चांगले बोलावे आणि शत्रुबदददल काहीच बोलु नये
277) there is many a slip between the cup and the flip -हातातले तोंडात पडेलच असे नाही
278) to call a spade a spade -स्पष्टक वक्तेपणा असावा
279) faith can move mountains-श्रदधेने पर्वत सुद्धा हलते.
280) easier said than done -बोलण्यापेक्षा कृती अवघड
281) where there is nothing to lose there is nothing to fear -ज्याच्याजवळ गमावण्या सारखे काहीच नाही त्याला कसलीच भीती नसते.
282) he who moves not foreward goes backward-जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.
283) brevity is a soul of wit -संक्षिप्तपणा बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.
284) to spoil the ship for a half penny worth of tar -थोडयासाठी मोठे नुकसान करून घेऊ नका
285) too much of anything is bad -अति तेथे माती
286) a worm may turn -अती झाले तर गोगल गायही अंगावर येते
287) the last straw breaks the camels back -सहनशक्तीलाही मर्यादा असते.
288) the pot calls the kettle back -दुसरयाचे दोष नेहमी दिसतात.
289) progress is the law of life -पुढे चालत राहणे प्रगती करणे हा जीवनाचा नियम आहे.
290) they who only seek for faults find nothing else-
दुसरयात दोष शोधत बसल्यास गुण सापडतच नाही.
291) to know the disease is half the cure -कारण सापडले की अर्धे काम झालेच असे समजावे
292) two wrongs do not make a right -तो ही चुकला तरी चुक ही चुकच
293) vice is its own punishment virtue its own reward-दुर्गुन ही शिक्षा आहे सद्गुण हे बक्षिस आहे.
294) what belongs to everybody belongs to nobody -जो दुसरया वरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
295) where ignorance is bliss it is folly to be wise -अडाण्यांसमोर शहाणपण गाजवु नये
296) handsome is that handsome does –
देखणेपणापेक्षा उमेद वर्तन अधिक प्रशंसनीय असते.
297) ill weeds grow space -अनिष्ट गोष्टींचा प्रसार लवकर होतो.
298) the hand that rocks cradles rules the world -जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उदधारी
299) every man has his price -प्रत्येक माणुस पैशाने जिंकता येतो.
300) it is no use crying over spilt milk-जे घडुन गेले त्याचा पश्चात्ताप नको
301) first come first serve – हाजीर तो वजीर
302) good mind good find -जशी दृष्टी तशी सृष्टी
303) might is right – बळी तो कान पिळी
304) sow the wind and reap the wind – जशी कृती तसे फळ
305) laughter is best medicine -हसा अणि निरोगी राहा
306) beauty without virtue has no value -सदगुणाशिवाय रूप कवडीमोलाचे असते
307) a thing is not valued where it belonged -पिकते तिथे विकत नाही.
308) better the devil you know then the devil you don’t -अनोळखी शत्रुपेक्षा ओळखीचा शत्रु बरा
309) pure gold doesn’t fear the flame – कर नाही त्याला डर कशाला
310) time once lost cannot be regained – काळ कोणासाठी थांबत नाही.
311) little knowledge is more dangerous -अधर्वट ज्ञान कधीही घातक असते.
312) all is well end is well – ज्याचा शेवट गोड त्याचे सर्वच गोड
313) there is a time for everything – प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
314) society moulds man -जसा समाज तसा माणुस
315) true lies at bottom of well -मोती खोल पाण्यात मिळतो.
316) to the good the worlds appear good -आपण भले तर जग भले
317) a man is known by his friends -कोणताही व्यक्ती आपल्या मित्रांवरून ओळखला जातो.
318) one nails drive another -काटयाने काटा निघतो
319) gather thisteles and expect pickle – बीज तसे अंकुर
320) style makes the man – पोशाख पाहुन मान मिळतो.
321) curiosity kills cat – जास्त नाक खुपसणे चांगले नाही.
322) beauty lies in beholder eyes -सौदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते.
323) no rose without a thorn -काटया शिवाय गुलाब नाही.
324) a leopard can’t change its spots -कुत्रयाचे शेपुट वाकडे ते वाकडेच
325) much good much care – व्याप तितका संताप
326) blood is thicker than water -मैत्रीपेक्षा नाते बलवत्तर
327) least said soonest mended- जास्त बोलण्याने माणुस कोडगा बनतो
328) money doesn’t grow on trees-पैसा झाडाला लागत नाही
329) a closed mouth catches no flies -रडलयाशिवाय आई देखील दुध पाजत नाही
330) easy come easy go -. सहज मिळणारे टिकत नाही
331) god help those who help themselves – जे स्वता कष्ट करतात त्यांना परमेश्वर साहाय्य करतो.
332) constant guest is never welcomed -नेहमी येणारया पाहुण्यांचे स्वागत केले जात नाही.
334)fool praise fools -गाढवाला गाढव ओळखतो
335) a wolf in sheeps clothing – गोगलगाय अणि पोटात पाय
336) a sovereign word is law- राजा बोले दल हाले
337) an army marches on its stomach – सैन्य पोटावर चालते.
338) great cry little wool -बडा घर पोकळ वासा
339) better an open enemy than false friend-कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा
340) exuberance is beauty -चेहरयावरील उत्साह प्रसन्नता हेच खरे सौंदर्य
341) never have resistance to change -चांगल्या बदलाला कधी नाकारू नका
342) hope is walking dream -आशा हे जागेपणाचे स्वप्र आहे.
343) good things happen to good people -चांगल्या लोकांसोबत चांगल्या गोष्टी घडतात.
344) to teach is to learn twice – दुसरयाला एखादी गोष्ट शिकवणे म्हणजे ती दुसरयांदा शिकणे आहे
345) No wisdom like silence -शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कुठले नाही.
346) difficulty is a severe instructor -आलेली समस्या खुप चांगली प्रशिक्षक असते.
347) good luck never come late -चांगले नशिब कधीच उशिरा येत नाही.
348) a good deed is never lost – चांगले कार्य कधीच वाया जात नाही.
349) if you act to be happy you will be happy -जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्की आनंदी व्हाल
350) hard times are movement of reflection -कठिन परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य चिकाटी पाहण्याची वेळ आहे.
351) I listen and i forgot,I watched and i remembered I do and I understand -मी ऐकले अणि विसरलो मी पाहीले अणि माझ्या लक्षात राहीले मी करून पाहीले अणि मला समजले.
352) be concern with action only not with its result -आपले कार्य करत राहा त्याच्या फळाचा विचार करू नका
353) it is not how long but how well we live -किती काळ जगले यापेक्षा किती चांगले जगले हे फार महत्त्वाचे आहे
354) the great artist is a simplifier -महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.
355) desire is the very essence of man -अभिलाषा ईच्छा हाच मनुष्य जीवन सार तत्वज्ञान आहे.
356) hearing brings wisdom, speaking repentance -ऐकलयाने ज्ञान बुद्धिमत्ता मिळते आणि बोलण्याने पश्चात्ताप
357) character is simply habit long continue -तुमच्या दिर्घ चालत असलेल्या सवयीमुळे तुमचे चारित्र्य घडते.
358) the small link will sink great ship -एक लहानसे देखील विशाल जहाजाला बुडवू शकत
359) a new brooms sweep clean – नव्या दमाने काम करत असलेल्या व्यक्तींकडून जास्त काम होते
360) thats the way cookie crumble – हीच जगाची रीत आहे.
361) life is drama man is actor and god is director-जीवन हे एक नाटक आहे आपण ह्या नाटकाचे कलाकार आहोत अणि देव ह्या नाटकाचा दिग्दर्शक आहे.
362) a problem share is a problem halved -समस्या शेअर करणे म्हणजे समस्या कमी करणे आहे
363) a watched pot never boil -ज्या गोष्टींची आपण वाट बघतो ती घडायला वेळ लागतो.
364) everybody wants to heaven but nobody want to die – प्रत्येकाला स्वर्ग हवे असते पण मरायला कोणीच तयार नसते.
365) a dog in manager – स्वताही खायचे नाही अणि इतरांना पण खाऊ द्यायचे नाही
366) its folly to live in rome and fight with the pope-पाण्यात राहुन मगरी बरोबर वैर करू नये
367) when poverty comes in door love flies out of the windows -घर फिरले म्हणजे घराचे वसे देखील फिरतात.
368) behind every successful man there stands a woman -प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्रीचा हात असतो.
369) those who the god would destroy they first make mad -विनाशकाले विपरीत बुद्धी
370) give someone an Inch and they will take a mile -भटाला दिली ओसरी अणि भट पाय पसरी
371) marry in haste repent in leisure -घाईघाईत लग्न करा मग आरामात बसून पस्तावा करा
372) between two stools we come to the ground -दोन्ही डगरीवर ठेवला हात तोटा पडला हातात
373) there is no smoke without fire – आगीशिवाय धूर नाही.
374) by leaps and bounds – अत्यंत वेगाने
375) live and let live -जगा अणि जगु द्या
376) tomorrow never comes – उद्या कधीच उगवत नाही
377) to bell the cat – मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे
378) tomorrow is motto devil -उदया हे सैतानाचे वाक्य आहे.
379) they rust who rest – थांबला तो संपला
380) half a loaf is better than the bread-दगडापेक्षा वीट मऊ मऊ
381)a blind man is not judge of colour -आंधळयाला रंगाची काय जाण
382) the voice of people is voice of god – जनता जनार्दनाचा आवाज हाच ईशवराचा आवाज
383) pearl is not valued in water – घरकी मुर्गी दाल बराबर
384) great cry and little wool -डोंगर पोखरून उंदीर काढणे
385) a wish is father to the thought -ईच्छा ही विचाराची जननी आहे.
386) better be a wise man servant than fools master -शाहण्याचे गुलाम व्हावे वेडयाचे मालक नसावे
387) everything is good its proper place -पायातला जोडा पायातच बरा
388) soon ripe soon rotten -जे लवकर पक्व होते ते लवकर कुजते
389) as you make your bed you must lia on it – प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात.