पुस्तक परीक्षण – अवेकन द जायांट विदिन – Book Review of Awake The Giant Within in Marathi

 

पुस्तक परीक्षण – अवेकन द जायांट  विदिन – Book Review of Awake The Giant Within in Marathi

जगात असा कोणताही व्यक्ती नसेल ज्याला यशस्वी व्हायचं नसेल.प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे आहे.काहीजण यशस्वी देखील झाली आहेत.

यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते.काहींसाठी चांगल आरोग्य असणे म्हणजे यश असते,तर काहींसाठी खूप पैसा कमावणे म्हणजे यश असते ,

तर काहींसाठी आनंदी राहणे म्हणजे यश असते.प्रत्येकासाठी यशाची व्याख्या जरी वेगळी असली तरी प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे हे मात्र खरे!

AWAKE THE GIANT WITHIN या पुस्तकामध्ये लेखक टोनी रॉबिन्स यांनी यशस्वी होण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत आणि यशस्वी लोकांनी कोणत्या गोष्टी अनुसरून आपल्या जीवनात यशाचा शिखर गाठला ,अशा गोष्टी लेखक टोनी रॉबिन्स यांनी AWAKE THE GIANT WITHIN या पुस्तकात सांगितल्या आहेत.

आपण या लेखामध्ये AWAKE THE GIANT WITHIN ह्या पुस्तकाची थोडक्यात SUMMARY पाहणार आहोत.

पुस्तकामध्ये सर्वप्रथम लेखकाने यशस्वी होण्यासाठी तीन टिप्स दिल्या आहेत:

 • यशस्वी होण्यासाठी नेहमी मोठे ध्येय ठरवा.
 • कारण जगात जेवढे ही यशस्वी लोक आहेत त्यांनी सुरवातीला मोठे ध्येय ठेवले आणि नंतर त्या ध्येयाचा पाठलाग केला.तुम्हीही यशस्वी होण्यासाठी मोठे ध्येय ठेवा.समजा तुम्हाला बॉडी बिल्डर व्हायचं आहे.यासाठी तुमचे तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय नामांकित बॉडी बिल्डर होणे हे जर तुमचे ध्येय असले तर तुम्ही फक्त जिल्ह्यापर्यंत फेमस होऊ शकता;
 • पण जर तुमचे ध्येय मिस्टर इंडिया किंवा मिस्टर वर्ल्ड बनण्याचे असेल आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असाल तर तुम्ही नक्की यशाच्या शिखरावर पोहोचू शकता.त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मोठे ध्येय ठरवले पाहिजे.
 • जेव्हा आपण मोठे ध्येय किंवा स्वप्न ठरवतो तेव्हा आपल्याला ते अशक्य वाटते.
 • समजा तुम्ही UPSC किंवा MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला कधी कधी असे वाटेल की आपल्या घरातील कोणीच ही एक्साम दिली नाही.
 • आपल्याला एक्साम क्रॅक होणार नाही.अशा वेळी आपला आपल्यावरतीच विश्वास नसतो.त्यामुळे यशस्वी होण्यासाठी ठाम आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे.
See also  ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल २०२३ विषयी माहिती - Amazon republic day sale 2023 in Marathi

तुमचा जर आत्मविश्वास प्रबळ असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.

प्लॅनिंग -नियोजन

 • आपल्याला ध्येय गाठण्यासाठी त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण निश्चित प्लॅनिंग केले पाहिजे.म्हणजे समजा तुम्हाला 15 दिवसामध्ये 5 विषयांचा अभ्यास करायचा आहे.पंधरा दिवसानंतर एक्साम आहे ,अशा वेळी तुम्ही 2 दिवस एका विषयाचा अभ्यास करून राहिलेल्या 5 दिवशी रिविजन केली तर तुम्हाला एक्साम मध्ये नक्कीच चांगले मार्क्स पडतील.
 • हे झाले एक्साम चे प्लॅनिंग पण तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठीचे परफेक्ट प्लॅनिंग केले पाहिजे.
 • तुम्हाला जर महान क्रिकेटर व्हायचे आहे तर तुम्ही क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकर ला तुमचा रोड मॉडेल समजले पाहिजे आणि सचिन तेंडुलकर यांनी महान क्रिकेटर बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या किंवा कोणकोणत्या चूका केल्या याचा अभ्यास करून त्यांनी केलेल्या गोष्टी आपल्या जीवनात उतरवुन आणि त्यानी केलेल्या चुका आपल्या जीवनात न करता तुम्ही एक महान क्रिकेटर बनू शकता.
 • वरील तीन गोष्टीचे तुम्ही जर अनुसरण केले तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल.

त्वरित निश्चय -Decision making

 • तुम्हाला जीवनात यशस्वी बनण्यासाठी तुम्हाला त्वरित निश्चय घेण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे.कारण आपण वर्तमानात जे निर्णय घेतो त्यावरच आपला भविष्यकाळ अवलंबून असतो.तु
 • म्ही जर योग्य निर्णय घेतला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुम्ही जर अयोग्य निर्णय घ्याल तर त्याचा फटका तुम्हाला पुढे बसेल.त्यामुळे भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घेणे तुम्हाला जमले पाहिजे.

चांगल्या गोष्टी म्हणजे आंनद समजा -Be Happy

 • AWAKE THE GIANT WITHIN या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणजे टोनी रॉबिन्स चे वडील बिअर प्यायचे आणि बिअर पिल्यानंतर टोनी रॉबिन्स याना ते आनंदी वाटत.
 • यावरून टोनी रॉबिन्स याना असे वाटले की,बिअर पिल्यानंतर माणूस आनंदी होतो,म्हणून त्यांनी बिअर पिण्याची इच्छा त्यांच्या आईपाशी व्यक्त केली.
 • त्यांच्या आईने टोनी रॉबिन्स याना बिअर ची सवय लागू नये म्हणून त्यांनी टोनी रॉबिन्स हयाना प्रमाणाच्या बाहेर बिअर पाजली.प्रमाणाच्या बाहेर बिअर पिल्यामुळे टोनी रॉबिन्स याना चक्कर येऊ लागली.त्यांना बिअर पिल्यामुळे चक्कर येते,अशक्त वाटते असे वाटले.
 • टोनी रॉबिन्स पुस्तकात म्हणतात, चांगल्या गोष्टी म्हणजे आंनद समजा आणि वाईट गोष्ट म्हणजे दुःख समजा.आपला विश्वास आपल्याला घडवू देखील शकतो आणि बिघडवू देखील शकतो.
See also  Brahma Muhurta - ब्रम्हमुहुर्त म्हणजे काय? ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे फायदे  कोणते आहेत?

आनंदी

 • काही लोकांचे स्वप्न असते मोठा बंगला,अंगणात चार चाकी गाडी आणि तिजोरीत बक्कळ पैसा.ह्या तर फक्त वस्तू आहेत.
 • आपण ह्या मिळवण्याचा पर्यन्त का करतो!कारण आपल्याला त्या वस्तू मिळण्यानंतर मिळणारी भावना हवी असते. म्हणजे आपण त्या वस्तू त्या भावनांसाठी मिळवण्याचा पर्यन्त करतो.
 • भावना दोन प्रकारच्या असतात,पहिली म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला चांगले फील होते आणि दुसरी म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला वाईट फील होते
 • ज्या गोष्टीतून आपल्याला वाईट फील होते त्या गोष्टींपासून आपण लांब पळण्याचा विचार करतो.

अडचणी -Face Difficulties

 • जगात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकाला आपले प्रॉब्लेम्स दुसऱ्याच्या प्रॉब्लेम्स पेक्षा मोठे वाटतात.
 • जेव्हा आपल्या जीवनात काही अडचणी आल्या किंवा जेव्हा आपण दुःखी फील करतो तेव्हा समजून जा की आपण चुकीचे प्रयत्न करत आहोत आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गावर आहे.
 • ठाम रहा – Be firm – अढळ खंबीर राहणे
 • जगात यशस्वी झालेली प्रत्येक व्यक्ती आपल्या ध्येयावर ठाम असतात आणि आत्मविश्वास व कठोर परिश्रमाच्या बळावर आपले ध्येय गाठतात.

1 thought on “पुस्तक परीक्षण – अवेकन द जायांट विदिन – Book Review of Awake The Giant Within in Marathi”

Comments are closed.