सुर्यग्रहण म्हणजे काय?सुर्यग्रहण कधी कसे अणि का घडुन येते? -What is a solar eclipse?

सुर्यग्रहण म्हणजे काय?सुर्यग्रहण कधी कसे अणि का घडुन येते?

सुर्यग्रहण म्हणजे काय?सुर्यग्रहण कधी घडुन येते?

ज्या वेळेस पृथ्वी चंद्र सुर्य हे तिघेही एका सरळ रेषेत येत असतात म्हणजेच जेव्हा पृथ्वी आणि सूर्य दोघांच्या मध्ये चंद्र येत असतो तेव्हा ह्या अवस्थेस स्थितीस सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

म्हणजेच सुर्याला ग्रहण लागण्याच्या स्थितीला सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

ह्या स्थितीला ग्रहण का म्हटले जाते?

पृथ्वीच्या मध्यभागी चंद्र आडवा आल्याने सुर्याचा भाग हा दिसेनासा होतो हा भाग दिसत नसतो म्हणून ह्या स्थितीला ग्रहण म्हटले जाते.सुर्यग्रहणाच्या कालावधीच्या वेळी अमावस्या असते.

सुर्य ग्रहण कसे अणि का घडुन येते?

सुर्य एक तारा आहे.अणि तारे हे स्वयंप्रकाशित असतात.याचाच अर्थ सुर्य हा देखील स्वयंप्रकाशित असतो.पृथ्वी ही सुर्याचा ग्रह आहे.अणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते तिच्या ह्या फिरण्याला परिभ्रमण असे म्हटले जाते.जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्याचप्रमाणे चंद्र देखील पृथ्वी भोवती फिरत असतो.

अणि जेव्हा फिरता फिरता चंद्र सुर्य अणि पृथ्वीच्या मध्यभागी येत असतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडत असते.

उदा,जेव्हा आपण खोलीत असतो अणि खोलीत समोरच्या भिंतीवर लाईट चालु आहे.अचानक आपल्या अणि लाईटाच्या मध्ये एखादी व्यक्ती मध्यभागी आडवी आली उभी राहिली तर त्या व्यक्तीची सावली आपल्या अंगावर पडत असते

अणि आपल्या अणि लाईटाच्या मध्ये दुसरी व्यक्ती आल्याने आपणास लाईट त्याचा प्रकाश दिसत नाही.एकदम त्याचप्रमाणे पृथ्वी अणि सुर्य या दोघांच्या मध्यभागी चंद्र आल्यावर चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडत असते.

See also  पत्रकार दिन महत्व अणि इतिहास - Journalist day history and importance in Marathi

यानंतर ह्या सावली पडलेल्या भागात जे लोक असतात त्यांना हा सुर्य दिसत नसतो.दिसेनासो होतो.हया स्थितीला सुर्यग्रहण असे संबोधिले जाते.

सुर्यग्रहण कधी दिसते?

सुर्यग्रहण हे साधारणत अमावस्येच्या आसपास दिसत असते.

सुर्यग्रहणाचे प्रकार किती अणि कोणकोणते आहेत?

सुर्यग्रहणाचे एकुण तीन प्रमुख प्रकार आहेत –

१) खग्रास सूर्यग्रहण-

२) खंडग्रास सुर्यग्रहण-

३) कंकणाकृती सुर्यग्रहण –

१) खग्रास सूर्यग्रहण -जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने सुर्य पुर्णपणे झाकला जातो.अशा सुर्यग्रहणाच्या स्थितीस खग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते.

२) खंडग्रास सुर्यग्रहण-

जेव्हा चंद्रामुळे पुर्ण सुर्य झाकला न जाता सुर्याचा काही भागच झाकोळला जातो.तेव्हा अशा सुर्यग्रहणाच्या स्थितीस खंडग्रास सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

३) कंकणाकृती सुर्यग्रहण –

जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या भोवती लंबगोलाकार कक्षेत फिरतो.जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असताना पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो.तेव्हा चंद्रामुळे पुर्ण सुर्य झाकला जात नसतो.अशावेळी सुर्याचा मधला भाग झाकला जातो.अणि गोलाकार बाजुचा भाग झाकला जात नाही.

अशा वेळी सुर्य हा एखाद्या वर्तुळाकार कंकणासारखा बांगडी सारखा दिसु लागतो अशा सुर्यग्रहणाच्या स्थितीस कंकणाकृती सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

२०२३ मधील सुर्यग्रहण कसे असणार आहे?

२०२३ मधील सुर्यग्रहण कंकणाकृती सुर्यग्रहण असणार आहे.

सुर्यग्रहण कसे पाहायचे?

असे सांगितले जाते की सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघु नये असे केल्याने आपणास अंधत्व देखील येऊ शकते.म्हणुन सुर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित काळा चष्म्याचा वापर किंवा काळी वेल्डिंगची काचचा वापर आपण करायला हवा.