सीएफ ए अणि सीए या दोघांमध्ये काय फरक असतो?Difference between CFA and CA

सीएफ ए अणि सीए या दोघांमध्ये काय फरक असतो?Difference between CFA and CA

आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की चार्टर्ड अकाऊंटंट अणि चार्टर्ड फायनान्शिअल अॅनॅलिस्ट या दोघांमध्ये काय फरक असतो.

कारण हे दोघे कोर्स काही बाबतीत एकदम सारखे असल्याचे आपणास दिसून येते.

उत्तीर्ण होण्याचा कालावधी,उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे टक्के इत्यादी बाबतीत chartered financial analyst हा कोर्स तर चार्टर्ड अकाऊंटंट ह्या कोर्सपेक्षा अधिक उत्तम आहे असे देखील आपणास वाटते.

सीए अणि सीएफ हे दोघेही फायनान्स क्षेत्रातील सर्वोच्च अणि मोठे कोर्स आहेत अशा परिस्थितीत आपणास प्रश्न असा पडतो की आपण सीएफ ए करावे की सीए.

आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी आज आपण सीए अणि सीएफ या दोघा कोर्समध्ये काय फरक आहे हे जाणून घेणार आहोत.

Difference between CFA and CA
Difference between CFA and CA

सीए –

सीए हा फायनान्स क्षेत्रातील प्रामुख्याने भारतातील तसेच सर्व जगातील सर्वोत्तम बेस्ट अणि प्रोफेशनल कोर्स मानला जातो.सीए हा एक जुना सर्वांना परिचित कोर्स आहे.

सी ए हा कोर्स इंस्टीटयुट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट दवारे उपलब्ध करून दिला जातो.इतर कुठल्याही संस्थेद्वारे हा कोर्स उपलब्ध करून दिला जात नाही.

सीए हा कोर्स केल्यानंतर आपणास भारतात नोकरीची अधिक संधी प्राप्त होते.कारण भारतात सीएला अधिक जास्त मागणी आहे.कारण भारतात प्रत्येक उद्योग व्यवसायात चार्टर्ड अकाऊंटंटची आवश्यकता असते.

सीए हा कोर्स पूर्ण करण्यासाठी सीएफ ए च्या तुलनेत अधिक वेळ लागतो.

सीए कोर्सला अॅडमिशन प्राप्त करण्यासाठी आपणास एकतर फाऊंडेशन लेव्हल पुर्ण करावी लागते.किंवा आपण डायरेक्ट इंट्री देखील घेऊ शकतात.

फाऊंडेशन लेव्हल मध्ये आपणास १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर सीए प्रवेशाकरीता एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते.यात चार विषय असतात.

See also  बीजप्रक्रिया - पीक संरक्षणामध्ये महत्व - Seed treatment importance in crop protection

किंवा आपण सीए कोर्सला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपणास डायरेक्ट अॅडमिशन देखील मिळुन जाते.

सीए कोर्स मध्ये एकुण तीन लेव्हल असतात या तिन्ही लेव्हल वर आपणास वेगवेगळे असे एकुण २४ विषय शिकवले जातात.

सीएफ ए कोर्स आपणास दोन वर्षांत देखील पुर्ण करता येतो.पण सीए हा कोर्स मध्ये आपण प्रत्येक लेव्हल एका प्रयत्नात क्लिअर केले तरी आपल्याला किमान चार वर्षांचा कालावधी लागतो.कारण यात आपणास तीन वर्षे कंपलसरी आर्टिकल शीप देखील करणे अनिवार्य असते.

सीए कोर्स मध्ये आपल्याला फायनान्स संबंधित सर्व सखोल नाॅलेज दिले जाते.

सी ए हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आपणास एक ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो.जरी आपण सर्व लेव्हलची यात परीक्षा फी रेजिस्ट्रेशन फी केले धरून चालले तरी देखील.

सीएफ ए –

सीएफ ए हा युएस बेझ्ड कोर्स आहे.हा सुदधा फायनान्स क्षेत्रातील बेस्ट प्रोफेशनल कोर्स आहे जो आपण सीएफ ए इंस्टीटयुट मधुन करता येत असतो.इतर कुठल्याही संस्थेद्वारे हा कोर्स आपणास उपलब्ध करून दिला जात नाही.

सीएफ ए हा कोर्स केल्यानंतर आपणास युएस मध्ये नोकरीची अधिक संधी प्राप्त होते.कारण परदेशात सीएफ ए ला अधिक जास्त मागणी स्कोप आहे.

अणि सीएफ ए हा फायनान्स क्षेत्रातील एक युएस बेझिड सर्वोत्तम प्रोफेशनल कोर्स आहे.त्यामुळे हा कोर्स केल्यानंतर आपणास परदेशात चांगल्या पदावर चांगले वेतन असलेल्या कंपनीत नोकरीच्या संधी प्राप्त होतात.

सीएफ ए हा कोर्स पूर्ण करण्यासाठी सीए च्या तुलनेत आपणास कमी वेळ लागतो.याचे पासिंग परसेंटेज अधिक असते.

सीएफ ए कोर्ससाठी प्रवेश प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत
एक म्हणजे आपल्याला चार वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.इथे आपण पदवीधर नसलो अणि फक्त बारावी उत्तीर्ण असलो तरी देखील आपणास सीए ए ह्या कोर्ससाठी अॅडमिशन मिळुन जाते.

अणि दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला कामाचा अनुभव नसल्यास आपण किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

See also  विवेक रामास्वामी कोण आहेत? - Vivek Ramaswamy the youngest Republican presidential candidate

सीएफ ए कोर्स मध्ये देखील सीए प्रमाणे एकुण तीन लेव्हल असतात या तिन्ही लेव्हल वर मिळुन आपणास एकुण १० विषय शिकवले जातात.

सीएफ ए कोर्स आपणास सर्व विषय एका प्रयत्नात पास करून दोन वर्षांत देखील पुर्ण करता येतो.

सीएफ ए कोर्स मध्ये आपल्याला फायनान्स संबंधित मोजक्याच काही टाॅपिकवर नाॅलेज दिले जाते.ज्यात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट टूल्स,अॅसेट क्लास, एवढ्याच तीन गोष्टींचे विशेष नाॅलेज दिले जाते.

सीएफ ए हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आपणास दोन तीन लाखांपर्यंत खर्च येतो.जरी आपण कोचिंग क्लासेस जाॅईन नाही केले तरी देखील.अणि कोचिंग क्लासेस जाॅईन केले तर चार पाच लाख इतका खर्च लागतो.

हा एक युएस बेझिड कोर्स असल्याने यात फी देखील अधिक आकारण्यात येत असते.याचसोबत सीएफ ए हा नवीन कोर्स असल्याने भारतात जास्त हा परिचित नाही.

Leave a Comment