आँप्टिमिस्टिक अणि पेसिमिस्टिक म्हणजे काय? Optimistic,Pessimistic Meaning In Marathi

आँप्टिमिस्टिक अणि पेसिमिस्टिक म्हणजे काय?Optimistic,Pessimistic Meaning In Marathi

आँप्टीमिस्टिक अणि पेसिमिस्टिक हे जीवणाकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टीकोन आहेत.ज्यात एक आशा अणि सकारात्मकता दर्शवतो तर दुसरा फक्त निराशा अणि नकारात्मक भावना विचार दर्शवतो.

आँप्टीमिस्टीक म्हणजे काय?Optimistic Meaning In Marathi

आँप्टीमिस्टिक म्हणजे आशावादी असणे होय.आशावाद ही एक मानसिक वृत्ती असते ज्यात आपणास आपल्या कामातील यशाबददल सकारात्मकता असते अतुट विश्वास असतो.

आँप्टिमिस्टिक असणे म्हणजे आपल्या जीवनात सध्या कितीही वाईट घडत असले तरी चांगल्या गोष्टी देखील लवकर घडतील याची आशा बाळगणे.

आँप्टीमिझम म्हणजे काय?Optimism Meaning In Marathi

आपला येणारा भविष्यकाळ फार उज्वल असणार आहे त्यात सर्व काही चांगले घडणार आहे अशी आशावादी भावना असणे म्हणजे आँप्टीमिझम होय.

पेसिमिस्टिक म्हणजे काय?Pessimistic Meaning In Marathi

पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी असणे.नैराश्य निराशावाद ही सुदधा एक मानसिक वृत्ती असते ज्यात आपणास कुठल्याही कामात अपयश येण्याबददल मनात सतत भीती अणि नकारात्मकता असते.

आपल्या जीवणात कधीच काही चांगले घडणार नाही असे वाटणे म्हणजे निराशावाद आहे.

पेसिमिझम म्हणजे काय?Pessimism Meaning In Marathi

एखादी वाईट गोष्ट घटना प्रसंग घडेल अणि आपण आपल्या कामात सफल यशस्वी होणार नाही अशी श्रदधा,अपेक्षा,भीती मानसिक स्थिती असणे म्हणजेच पेसिमिझम.

आशावादी आणि निराशावादी व्यक्ती मध्ये कोणता फरक असतो?Difference Between Optimistic And Pessimistic Person In Marathi

● आशावादी व्यक्ती हा जीवणात आज कितीही अडीअडचणी वाईट प्रसंग संकटे असले तरी भविष्यात आपल्यासोबत चांगलेच होणार हा सकारात्मक विचार दृष्टिकोण ठेवत असतो.तर याच ठिकाणी निराशावादी व्यक्ती माझे जीवन कधीच बदलणार नाही माझे दुख अडीअडचणी कधीच संपणार नाही अशी नकारात्मक नैराश्यवादी मानसिकता ठेवून जगत असतो.

See also  लॉकडाऊन फायदे -5 Benefits of lockdown in Marathi

● आशावादी व्यक्ती वाईटात देखील चांगले बघण्याचा दृष्टिकोण ठेवते तर याचठिकाणी निराशावादी व्यक्ती चांगले घडत असताना त्यात सुदधा काही ना काही वाईट नकारात्मकता चुक शोधत असते.

● आशावादी व्यक्तीचा कुठल्याही गोष्टीकडे घटना प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोण हा सकारात्मक अणि आशावादी असतो.तर निराशावादी व्यक्तीचा कुठल्याही गोष्टीकडे जीवनात घडणारया घटना प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोण सदैव नकारात्मक अणि नैराश्यवादी असतो.