जागतिक परिचारिका दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?national nurses day 2023
दरवर्षी १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जात असतो.
इसवी सन 1854 साली झालेल्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना मलमपट्टी करण्याचे काम करत फिरणारया आधुनिक नर्सिगचा पाया रचणारया पलोरेन्स नायटेंगल ह्या नर्सचा जन्म ह्याच दिवशी झाला होता.
म्हणून पलोरेन्स नायटेंगल यांच्या जन्मदिनाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
पलोरेन्स नायटेंगल ह्या विज्ञान,गणित,इतिहास ह्या तिन्ही विषयांत अत्यंत निपुण होत्या.पलोरेन्स वयोवर्ष सोळा झाले असताना पलोरेन्स नायटेंगल यांच्या मनात पीडीत रूग्ण इत्यादींच्या सेवेची इच्छा निर्माण झाली.
पलोरेन्स नायटेंगल ह्यांना परिचारिका बनुन समाजातील गरजु रूग्ण पीडीत इत्यादींची सेवा करायची होती.पण त्याकाळात पारिचारिका ह्या प्रोफेशन व्यवसाय उद्योगाकडे समाजात सन्मानाने पाहीले जात नव्हते.
म्हणून पलोरेन्स नायटेंगल यांच्या वडिलांना देखील पलोरेन्स यांनी निवडलेले हे प्रोफेशन मान्य नव्हते.तरी देखील समाजाच्या घरच्यांच्या विरोधाला तोंड देत आपल्या घेतलेल्या निर्णयावर पलोरेन्स नायटेंगल ह्या ठाम राहिल्या.
अणि मोठ्या जिद्दीने त्यांनी नर्सिगचे शिक्षणासाठी प्रवेश घेतला अणि आपले नर्सिगचे शिक्षण देखील पूर्ण केले.
1853 मध्ये पलोरेन्स नायटेंगल यांनी लंडन ह्या देशात स्त्रियांसाठी रूग्णालय सुरू केली.यांंतर 1854 दरम्यान क्रिमियाचे युद्ध झाले.
यात रशिया ह्या देशासोबत फ्रान्स ब्रिटन तुर्की ह्या देशाचे भीषण युदध घडुन आले होते.हया भयंकर युदधात अनेक सैनिक गंभीर जखमी झाले.
ह्या सर्व जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी पलोरेन्स नायटेंगल आपल्या नर्सिंग पथकाला घेऊन पोहोचल्या.युदध काळात पलोरेन्स नायटेंगल यांनी जखमी सैनिकांची दिवसरात्र सेवा सुश्रुषा केली होती.
युदधात जखमी झालेल्या रूग्णांवर उपचार केले त्यांच्या जखमेवर मलमपट्टी ड्रेसिंग सुद्धा केली.हातात लाल टेन घेऊन रात्रभर रूग्णांवर लक्ष ठेवले.त्यांना काय हवे काय नको त्याची विचारपुस केली.
सैन्याविषयी मनात असलेले अपार प्रेम अणि आदराची भावना बघता त्यांना लेडी विद लॅम्प असे देखील संबोधिले जायचे.
यानंतर ह्याच नावाने पलोरेन्स नायटेंगल यांना ओळखले जाऊ लागले.
13 आॅगस्ट1919 रोजी समाजातील गरजू रूग्णांची पिडितांची सेवा करणारया ह्या लेडी विद लॅम्प चे निधन झाले होते.
तेव्हापासून पलोरेन्स नायटेंगल यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा जन्म दिवस हा जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.
ह्या दिवशी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत रूग्णांची मनोभावे सेवा सुश्रुषा करणारया नर्सेसला आपल्या कार्यासाठी पलोरेन्स नायटेंगल हा नर्सिंगच्या क्षेत्रातील सेवेसाठी दिला जाणारा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
देशातील नागरीकांची रूग्णांची मनोभावे सेवा करणारया परिचारिका यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.त्यांचे आभार व्यक्त केले जातात.
हा दिवस सर्व परिचारिकांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे.