राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?national technology day 2023
आज आपल्या भारत देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात उत्तम कामगिरी दर्शवली आहे.मागील काही कालावधीत आपल्या भारत देशाने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उच्च शिखर गाठले आहे.
म्हणून आज आपल्या भारत देशाची गणना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असलेल्या अनेक दिग्दज देशांच्या यादीत घेतले जाते.
दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा ११ मे रोजी साजरा केला जात असतो.
पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्या करीता दरवर्षी हा विशेष दिवस संपुर्ण भारतात साजरा केला जात असतो.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आतापर्यंत आपल्या भारत देशाने किती प्रगती केली आहे.हया क्षेत्रात आपले किती मोठे अमुल्य असे योगदान दिले आहे हया सर्व गोष्टींची साक्ष देणारा हा एक विशेष दिवस आहे.
१९९८ सालात भारत देशाने केलेल्या एका विशेष अणुचाचणी पोखरण ह्या विशेष अणुचाचणी मुळे भारत देशाने भारत देश तंत्रज्ञानाच्या युगात किती पुढे गेला आहे किती प्रगती करतो आहे हे आपणास अणि समस्त विश्वाला इतर देशांना देखील दाखवून दिले होते.
ह्याच दिवशी भारत देशाने जागतिक पातळीवर महासत्ता बनण्यासाठी अनेक महत्वाचे पाऊल टाकले होते.
११ मे ह्या तारखेला भारताचे माजी राष्ट्रपती तसेच एरोस्पेस इंजिनिअर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान राज्यातील भारतीय लष्कर मधील पोखरण ह्या अणुचाचणी केंद्र क्षेत्रात शक्ती first ह्या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पडली होती.
यानंतर सुद्धा अजुन दोन चाचण्या घेण्यात आल्या.या तिन्ही चाचण्यांमुळे आपला भारत देश हा न्युक्लिअर क्लब मध्ये समाविष्ट होणारा सहाव्या क्रमांकाचा देश बनला होता.
११ मे १९९८ रोजी त्रिशुळ ह्या क्षेपणास्त्राची चाचणी देखील पुर्ण करण्यात आली आहे.ज्याचा सहभाग नंतर भारतीय वायुसेना अणि भारतीय लष्करात करण्यात आला होता.
यानंतर पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी ११ मे ह्या विशेष दिवसाला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केले होते.
११ मे हा दिवस भारत देशासाठी विशेष का मानला जातो?
११ मे ह्याच दिवशी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती.याचनंतर भारत देशाचा जगात महासत्ता म्हणून दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.
अणि ह्याच तारखेला जमिनीवरून हवेत हवेतून जमिनीवर मारा केला जात असलेल्या त्रिशुळ ह्या क्षेपणास्त्राची डीआर डीओ कडुन यशस्वीपणे चाचणी करण्यात आली होती.
हंसा ह्या पहिल्या स्वदेशी विमानाची चाचणी देखील ह्याच दिवशी करण्यात आली होती.म्हणुन हा दिवस भारत देशासाठी तंत्रज्ञानासाठी विशेष दिवस मानला जातो.