Good Morning Messages in Marathi
दररोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या प्रियजनांना शुभ सकाळ संदेश आपण पाठवतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते, प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना.
हे Good Morning quotes in Marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांचा दिवसाची सुरवात अजून खास करू शकता.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!
खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना
!! शुभ सकाळ !!
❤️ मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे ❤️
🍁 शुभ सकाळ 🍂
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही !
शुभ सकाळ!
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
💐💐 शुभ सकाळ 💐💐
मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
🍁 शुभ सकाळ 🍁