मुंबईत नवीन ॲपल स्टोअर ची १० वैशिष्ट्ये – Apple BKC first store in India.

मुंबईत सुरू करण्यात आलेल्या नवीन ॲपल स्टोअर ची १० वैशिष्ट्ये -Apple BKC first store in India.

ॲपल चे सीईओ टीम कुक सध्या भारतात मुंबई अणि दिल्ली येथे अॅपलचे दोन नवीन स्टोअर सुरू केले आहे.

खुप जणांच्या मनात याबाबत कुतुहल आहे की हे नवीन ॲपल स्टोअर कसे असणार आहे?यात आपणास इतर स्टोअर पेक्षा काय वेगळेपण पाहायला मिळणार आहे.

आपल्या मनातील ह्याच प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी
आजच्या लेखात आपण ह्या ॲपल स्टोअर ची प्रमुख वैशिष्ट्ये बघणार आहोत.

मुंबई अणि दिल्लीत लाॅच करण्यात आलेल्या ॲपल स्टोअर मध्ये इतर स्टोअरपेक्षा काय वेगळ

आहे?

Apple BKC first store in India.
Apple BKC first store in India.

मुंबई मध्ये लाॅच करण्यात आलेल्या अणि दिल्ली मध्ये लाॅच केल्या गेलेल्या नवीन ॲपल स्टोअर मध्ये फक्त आयफोन तसेच मोबाईल डिव्हाईस विकण्यापुरता सेवा मर्यादित नसणार आहे.

ह्या ॲपल स्टोअर दवारे ग्राहकांना अॅपल कडुन पुर्ण इको सिस्टमचा अनुभव दिला जाणार आहे.ग्राहक ह्या स्टोअर मध्ये जाऊन प्रश्न विचारून आपल्या सर्व शंकांचे निरसन करू शकतात.

आयफोन वगैरे कसा वापरायचा हे देखील शिकु शकणार आहे.ह्या स्टोअरमध्ये उत्पादन सोडुन इतर अनेक गोष्टी हायलाईट केल्या गेल्या आहेत.

याआधी ॲपल कंपनी आपले प्रोडक्ट्स वेगवेगळ्या थर्ड पार्टी तसेच ईकाॅमर्स वेबसाईट दवारे आॅनलाईन विकत होती पण आता हे नवीन स्टोअर लाँच झाल्यामुळे इथूनच अधिकतम प्रमाणात प्रोडक्टची उत्पादनाची खरेदी विक्री होताना आपणास दिसून येणार आहे.

ह्या नवीन स्टोअर मध्ये अनुभवी आणि एक्स्पर्टस असतील जे आपल्याला मदत करण्यास सदैव तत्पर असणार आहे.

ह्या ॲपल स्टोअर चे इंटेरिअर हे मुंबई शहराला रिप्रेझेंट करणारया काळी पिवळीच्या थीममध्ये डिझाईन करण्यात आले आहे.स्टोअरचा हा काळा पिवळ्या रंगाचा लुक सर्वांना आवडतो देखील आहे.

See also  ओपन मार्केट आँपरेशन म्हणजे काय? - Open market operation information in Marathi

हा ब्रॅड विदेशी आहे पण भारतीयांच्या दृष्टीने इथे देसी एफर्ट घेण्यात आल्याचे आपणास दिसून येते.हया स्टोअर मध्ये काम करण्यासाठी १०० जणांची टीम काम करण्यासाठी ठेवली आहे ह्या टीम मधील सदस्यांना तब्बल अठरा ते वीस भारतीय भाषा बोलता येतात.म्हणजे ग्राहकांना चांगला कस्टमर सपोर्ट येथे मिळणार आहे.

ह्या ॲपल स्टोअर मुळे जवळपास २५०० जणांना नोकरीची संधी रोजगार प्राप्त झाला आहे.हया स्टोअरच्या माध्यमातुन दहा पंधरा लाख इतक्या जाॅबच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे ॲपल स्टोअर आपल्या भारत देशातील पहिले ॲपल स्टोअर असणार आहे.

ह्या स्टोअर मध्ये इनस्टोअर सर्विसिंग फॅसिलिटी देखील देण्यात आली आहे.हया सुविधेअंतर्गत कस्टमरला समस्या निवारण जिनिअस एक्स्पर्टस कडुन सल्ला मसलत केली जाईल.यासाठी स्टोअर मध्ये येणारया ग्राहकांना आधीच ह्या एक्स्पर्टसची अपाॅईटमेंट देखील घेता येणार आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे अॅपल सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी खूले करण्याआधी कंटेट क्रिएटर अणि ब्लाॅगर साठी खुले गेले आहे.जेणेकरून कंटेट क्रिएटर ब्लाॅगरला यावर रिव्ह्यु करता येईल.

एवढ्या सर्व बाबींसोबत ॲपल ने आपल्या मार्केटिंग आणि पब्लिसिटी साठी विशेष तरतूद करून ठेवली आहे.

असे सांगितले जात आहे की अॅपलचे प्रतिस्पर्धी २२ कंपन्यांना पोस्टर बॅनर लावणे लावु शकणार नाही इथे आपले स्टोअर देखील उघडु शकणार नाहीये

ह्या स्टोअरचे एकूण भाडे ४० लाखाच्या आसपास आहे.अणि दरवर्षी ह्या भाड्याच्या किंमतीत पंधरा टक्के इतकी वाढ होईल असे म्हटले जाते आहे.

ॲपल स्टोअर मध्ये कुठल्याही प्रकारची जीवाश्म इंधने वापरण्यात येणार नाहीये.हे सर्व स्टोअर सौर ऊर्जा वर चालणारे आहे.हया करीता सोलार पॅनलचा वापर केला गेला आहे.

याव्यतिरिक्त ह्या स्टोअरच्या आतील भागात हिरवीगार झाडे लावण्यात आली आहेत ज्यामुळे स्टोअर अधिक आकर्षक आणि उठावदार दिसत आहे.तसेच ह्या हिरव्यागार झाडांमुळे कस्टमरला आनंदी अणि प्रसन्न वातावरण प्राप्त होणार आहे.

See also  दिनविशेष 11 मे 2033- Dinvishesh 11 May 2023

ह्या स्टोअरच्या बाबतीत असे देखील ऐकायला मिळत आहे की हे स्टोअर मुंबई येथील बीकेसी जिओ वल्ड ड्राईव्ह माॅलमध्ये अकरा वर्षे इतका भाडेकरार करून उभे करण्यात आले आहे.हे स्टोअर दहा हजार स्क्वेअर फूट इतक्या अंतरावर पसलरले आहे.

ॲपल स्टोअर मध्ये काम करणारया कर्मचारीं वर्ग उच्चशिक्षित आहे त्यांच्या कडे हायप्रोफाइल डीग्री असल्याचे सांगितले जात आहे यातील काही कर्मचारी केंब्रिज विद्यापीठात शिकलेले आहेत.

ह्या सर्व कर्मचारींकडे एमबीए,बीटेक,एमटेक अशा आॅटोमोबाईल इंजिनिअरींग, रोबोटिक्स पॅकेजिंग इत्यादी उच्च पदव्या आहेत.हया कर्मचारींचे वेतन देखील इतर सर्वसामान्य स्टोअर मध्ये काम करत असलेल्या कर्मचारींपेक्षा चार पटीने जास्त आहे.

ह्या कर्मचारींना अॅपलकडुन काही विशेष सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ज्यात वैद्यकीय सुविधा,पगारी रजा, आरोग्य लाभ, शैक्षणिक अभ्यासक्रम फी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याचसोबत अॅपलचे प्रोडक्ट खरेदी केल्यावर यांना उत्पादन खरेदीवर भरपुर सुट दिली जाणार आहे.

अॅपलमध्ये काम करत असलेल्या ह्या सर्व कर्मचारींची निवड ही अनेक अवघड फेरया पार केल्यानंतर त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिमत करण्यात आली होती.