महात्मा फुले यांनी केलेली शैक्षणिक कार्ये अणि त्यांचे शैक्षणिक विचार – Work of Mahatma Jotirao Phule in Educational field

महात्मा फुले यांनी केलेली शैक्षणिक कार्ये अणि त्यांचे शैक्षणिक विचार

महात्मा फुले यांनी केलेली शैक्षणिक कार्ये-

१) सामाजिक विरोधाला सामोरे जात स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला-

महात्मा फुले यांनी ज्या काळात स्त्री शिक्षणाला समाजात विरोध केला जायचा,

स्त्रीने फक्त चुल मुल सांभाळावे,स्त्रियांनी शिक्षण घेणे घराची चौकट ओलांडणे पाप आहे अशी समाजातील लोकांची विचारधारा होती त्या काळात स्त्री शिक्षणाला पाठिंबा देण्याचे धाडसी कार्य महात्मा फुले यांनी केले.

सर्व सामाजिक विरोधाला सामोरे जात समाजातील लोकांचा रोष सहन करत महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मोहीम हाती घेतली होती.अणि त्यांच्या ह्या महान शैक्षणिक कार्यात सावित्रीबाई फुले यांनी त्यांना साथ दिली.

ही स्त्रीशिक्षणाच्या कार्याची सुरुवात महात्मा फुले यांनी आपल्या घरातुनच केली आधी त्यांनी सावित्रीबाई यांना शिकवले साक्षर केले.पहिली स्त्री शिक्षिका बनवले

अणि मग आपल्या स्त्री शिक्षणाच्या मोहिमेत त्यांना देखील समाविष्ट करून घेतले.

महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पुण्यातील बुधवार पेठ भिडेवाडा येथील शाळेतील अशिक्षित मुलींना शिकवण्याचे साक्षर करण्याचे काम सावित्रीबाई करत होत्या.

१८४८ मध्ये महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईं समवेत पुणे येथील बुधवार पेठ येथे भिडे वाड्यात मुलींसाठी ही पहिली शाळा सुरू केली होती.हया शाळेत सर्व जातीच्या मुली होत्या.

महात्मा फुले यांच्या ह्या महान कार्यात त्यांना अनेक अडीअडचणींना अडथळ्यांना तोंड द्यावे लागले समाजाकडून त्यांच्या ह्या कार्यासाठी भरपुर विरोध देखील केला गेला.

कारण त्याकाळी मुलींना जास्त शिकवले जात नव्हते.त्यांचे आयुष्य चुल मुल इथपर्यंत सिमीत असायचे अशा परिस्थितीत समाजाच्या विरूद्ध जाऊन महात्मा फुले स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करत होते.

यासाठी सामाजिक रोषाला विरोधाला तोंड देत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महान कार्य सुरू ठेवले.

जेव्हा सावित्रीबाईं मुलींना शिकविण्यासाठी घरापासून पायी चालत जायच्या तेव्हा त्यांच्या ह्या कार्याला विरोध दर्शविण्यासाठी आजुबाजुचे लोक त्यांना शेणामातीचे गोळे देखील मारत असत.

See also  जागतिक बौदधिक संपदा दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? - World intellectual property day info Marathi

पण तरी देखील सावित्रीबाईं यांनी आपल्या कार्यात माघार घेतली नाही महात्मा फुले यांच्या सोबत मिळुन स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले.

२) प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले –

प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे.त्यामुळे हे प्रत्येक बालकास मिळायलाच हवे यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अणि मोफत करण्यात हया विचारांचा पुरस्कार महात्मा फुले यांनी केला.

भारतामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत अणि सक्तीचे करण्यात यावे हा विचार मांडणारे महात्मा फुले हे प्रथम व्यक्ती होते.प्राथमिक शिक्षण मोफत अणि सक्तीचे करण्यात यावे यासाठी त्यांनी आवश्यक ती पाऊले देखील उचलली होती.अणि प्राथमिक शिक्षण मोफत अणि सक्तीचे केले.

३) प्रशिक्षित शिक्षकांची नेमणुक केली –

महात्मा फुले यांना माहीत होते प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचे केल्यास विद्यार्थी वर्गाच्या संख्येत वाढ होईल अणि विद्यार्थी संख्या वाढल्याने त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी आपणास अधिक संख्येत दर्जेदार शिक्षकांची आवश्यकता पडणार आहे.

ही गरज लक्षात घेऊन महात्मा फुले यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दर्जेदार प्राप्त करून देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणुक करण्यावर विशेष भर दिला.

४) शिष्यवृत्ती अणि शैक्षणिक सुविधा –

खेडया पाडयात सुदधा शिक्षणाचा अधिक प्रचार प्रसार व्हावा ग्रामीण भागात देखील शिक्षणाचा अधिक प्रचार करण्यात यावा.

ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता यावे तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी महात्मा फुले यांनी खेड्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तसेच इतर शैक्षणिक सुविधा पुरवण्यास देखील सुरूवात केली.