बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी – Significant Events of Dr. Ambedkar’s Life

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी- Significant Events of Dr. Ambedkar’s Life

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी केलेले कार्य –

बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४७ पासुन ४ वर्षे १ महिना अणि २६ दिवस परिश्रम घेत बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुसंहिता विधेयक तयार केले ज्याला हिंदु कोड बिल असे देखील म्हटले जाते.

हे विधेयक तयार करण्याचा बाबासाहेब आंबेडकर यांचा मुख्य हेतु हा स्त्रियांना कायद्याचे हक्क दर्जा अणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा होता.ह्या विधेयकाला स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणुन देखील संबोधिले जाते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी त्यांच्या सोबत केल्या जात असलेल्या भेदभावाला आळा घालण्यासाठी हे विधेयक तयार केले होते.

Significant Events of Dr. Ambedkar's Life
Significant Events of Dr. Ambedkar’s Life

ह्या विधेयकामुळे आपल्या भारतीय समाजातील स्त्रिया अधिक सक्षम बनतील असा बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वास होता.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जुन्या कायद्याच्या संहितेत बदल करून नवीन स्त्री केंद्रीत संहिता तयार केली जावी यासाठी हे पाऊल उचलले होते.

ह्या विधेयकात केलेल्या काही तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत –

 • मृत व्यक्तीची विधवा त्याची मुलगी व पुर्वी मृत झालेली त्याची मुलाची विधवा यांना वारशाच्या बाबतीत बरोबरीने श्रेणी देण्यात येईल
 • जुन्या कायद्यात स्त्री वारसदार यांच्यामध्ये आर्थिक परिस्थिती वैवाहिक दर्जा अशा अनेक कारणांवरून भेदवाव केला जात होता बाबासाहेब आंबेडकर यांनी हा भेदभाव नष्ट करण्यासाठी स्त्रियांमध्ये आपापसात भेदभाव निर्माण करत असलेल्या अशा सर्व मुददयांना नवीन विधेयकातुन काढुन टाकले.
 • दायभाग पदधतीत आईच्या तुलनेमध्ये वडिल आधी उत्तराधिकारी ठरत होते नवीन विधेयकातुन बाबासाहेब आंबेडकर यांनी वडिलांच्या आधी आईला उत्तराधिकारी ठरवले.
 • ह्या विधेयकातुन बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री धनाचे सर्व प्रकार काढुन टाकले अणि सर्व स्त्री धन एक आहे असे ठरवले यानुसार स्त्री धनाला वारशाचा देखील एकच नियम लागु करण्यात आला.
 • विवाहात मुलीने माहेरून हुंडयात आणलेली संपत्ती ही न्यास मालमत्ता मानण्यात येईल ह्या हुंड्याच्या रक्कमेचा उपयोग त्या स्त्रीला कामे येईल.
 • अठरा वर्षे पुर्ण झाल्यावर ह्या मालमत्तेवरील हक्कासाठी ती स्त्री पात्र होईल ही संपत्ती त्या स्त्रीच्या पतीला किंवा कुटुंबातील इतर सभासदांना नातलगांना पुरवली जाणार नाही अशी तरतुद बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल यामध्ये खासकरून महिलांसाठी करून ठेवली आहे.
 • बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या मर्यादित मालमत्तेचे रूपांतर अबाधित मालमतेमध्ये केले.
See also  आई.पी रेटिंग काय आहे -स्मार्टफोन वाटरप्रूफ आहे का ? Ingress Protection Rating Marathi

बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु कोड बिल मध्ये खास मुलांसाठी पुरूषांसाठी केलेल्या काही तरतुदी –

 • हिंदू कोड बिल विधेयक बनवताना बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलींसोबत मुलांचा देखील विचार केला होता.
 • स्त्रीधना मधुन मुलीच्या हिस्स्या मधील अर्धा हिस्सा मुलाला देखील दिला जावा अशी तरतुद बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या नवीन विधेयकात करून ठेवली होती.
 • बाबासाहेब आंबेडकर यांनी वडिलांच्या मालमतेवर जसा मुलीला मुलाच्या वाटयातील अर्धा हिस्सा भेटतो तसा आईच्या मालमतेवर देखील मुलाला मुलीच्या वाटयातुन अर्धा वाटा दिला होता.
 • असे बाबासाहेब यांनी याकरता केले कारण बाबासाहेब आंबेडकर यांना मुलगा आणि मुलगी असा सामाजिक भेदभाव निर्माण न करता सामाजिक समानता निर्माण करायची होती.
 • बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मध्ये एकपत्नीत्वाचे तत्व समाविष्ट केले.अणि विवाहातुन बाहेर पडण्यासाठी घटस्फोटाची तरतुद देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
 • ज्या हिंदु कोड बिल मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना समाविष्ट केले होते त्यावर समाजातील लोकांकडून विरोध करण्यात आला होता.स्त्रियांना मालमतेत वाटा देण्यास विरोध करण्यात आला होता.
 • यावर उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आज ह्या सुधारणेच्या युगात देखील पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान हक्क देण्यास विरोध का केला जात आहे?
 • शेवटी सामाजिक विरोधामुळे ह्या बिलातील फक्त चार कलमांना मंजुरी देण्यात आली.म्हणुन बाबासाहेब आंबेडकर यांनी निराश होत २७ सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला होता.
 • एवढयावरच बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत यानंतर देखील विविध मार्गाने बाबासाहेब स्त्रियांच्या हक्कांसाठी झटत राहिले.
 • आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळेच कामगार महिलांना प्रसुतीच्या वेळी भरपगारी रजा देखील देण्यात आली आहे.
 • याचसोबत बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री पुरुष यांना कामाच्या ठिकाणी समान काम दिले जावे समान कामासाठी समान वेतन यांना दिले जावे ह्यासाठी देखील प्रयत्न केला.
 • बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संरक्षण देण्यासाठी महिला कामगार संरक्षण हा कायदा सुरू केला.याचसोबत बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना देखील पुरूषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला.
See also  बीपीटीचा फुलफाँर्म - BPT full form in Marathi

जातीभेद निवारण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मध्ये केलेल्या तरतुदी –

बाबासाहेब आंबेडकर‘ ‘यांनी हिंदू कोड मध्ये बदल करत विवाह अणि दत्तक पदधती मधील जातीचे उच्चाटन केले.

१९५२ नंतर केंद्र सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या ह्या मसुद्यातुन चार स्वतंत्र कायद्याची देखील निर्मिती केली होती.

 • हिंदु मॅरेज अॅक्ट १९५५
 • हिंदु सक्सेशन अॅक्ट १९५६
 • हिंदु मायनाॅरीटी अॅण्ड गार्डनरशिप अॅक्ट आॅगस्ट १९५६
 • हिंदु अॅडोपशन अॅण्ड मेंटेनन्स अॅक्ट १९५६

बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या इतर दैदिप्यमान कामगिरी –

 1. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९०७ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास केली अणि महत्वाची बाब म्हणजे त्याकाळी अस्पृश्य जातीतील मॅट्रीक उत्तीर्ण झालेले ते भारतातील पहिले विद्यार्थी होते.
 2. भिमराव आंबेडकर यांच्या ह्या यशासाठी अभिनंदन करण्यासाठी ही सभा भरवली गेली होती.त्यांचे गुरूवर्य कृष्णाजी केळकर यांनी भगवान बुद्ध चरित्र हे पुस्तक त्यांना भेट म्हणून दिले होते.
 3. १९२० मध्ये अस्पृश्यते विरूद्ध जागृती करण्यासाठी मुकनायक हे वृत्तपत्र देखील सुरू केले होते.
 4. अस्पृश्य जातीतील लोकांच्या समस्या समाजासमोर मांडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२४ मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली.
 5. ४ जानेवारी १९२५ मध्ये अस्पृश्य विद्यार्थीसाठी पहिले मोफत वसतिगृह त्यांनी काढले होते.
 6. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य जातीतील लोकांना तळावरचे पाणी पिण्यास नकार दिला जात होता त्याविरूदध आवाज उठविण्यासाठी चवदार तळयाचा सत्याग्रह केला.पुढे जाऊन हे तळ अस्पृश्य जातीतील लोकांना खुले केले गेले.
 7. समतेचा कार्यप्रसार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये समाज समता संघाची स्थापना केली.
 8. १९२७ मध्ये विषमतेची शिकवण देणारया मनुस्मृतीस जाळले.
 9. १९२८ मध्ये त्यांनी अस्पृश्य जातीतील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समता नावाचे पत्रक सुरू केले.
 10. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर २६ पेक्षा अधिक डिग्री आहेत.
 11. बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारताचे संविधान लिहिले.
 12. मरणोत्तर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन देखील गौरविण्यात आले आहे.
See also  गिफ्ट निफ्टी काय आहे?gift nifty information in Marathi