जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके – आर्थिक सक्षमता – Top 10 Best Personal Finance Book

जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके Top 10 Best Personal Finance Book

आपल्याला सर्वानाच माहीत आहे की आर्थिक शिक्षण घेऊन आर्थिक साक्षरता प्राप्त करणे ही आपल्या जीवणातील सगळयात मोठी गुंतवणुक असते.आपल्या कमवलेल्या पैशाचे व्यवस्थित आणि योग्य पदधतीने व्यवस्थापण करण्यासाठी आपल्याला पर्सनल फायनान्सचे नाँलेज असणे फार आवश्यक असते.

पुस्तकांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते कारण आज आपण जे काही शिकतो आहे आपल्या व्यक्तीमत्वात जे बदल घडता आहे त्याचे एकमेव कारण आहे पुस्तकांचे वाचन करणे.

म्हणुन आज आपण जेवढयाही जीवणात यशस्वी आणि श्रीमंत लोकांविषयी जाणुन आहे त्या सर्व लोकांमध्ये एक काँमन सवय आपल्याला दिसुन येते ती म्हणजे पुस्तकांचे वाचन.

आजच्या लेखात आपण अशा काही टाँप 15 पर्सनल फायनान्स बुकविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्याचे वाचन आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी करायलाच हवे.

जगातील टाँप 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तकांची नावे कोणकोणती आहे?

आयुष्यात वाचन हे किती महत्वाचे हे आज आपल्याला प्रत्येकाला चांगलेच माहीत आहे.पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्याला अखंड ज्ञान,माहीती आणि प्रेरणा प्राप्त होत असते.आणि असे म्हटले जाते की वाचनाने माणुस जुना राहत नाही तो नवा बनत जात असतो.

म्हणुन आपण भरपुर वाचन करायला हवे आणि शिक्षित व्हायला हवे.आज आपण आपल्याला आर्थिक ज्ञान देत असलेल्या काही 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तकांविषयी जाणुन घेणार आहोत.

टाँप 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1)रिच डँड पुअर डँड :

2) द मिलिनिअर नेक्सट डोअर :

3) आय विल टीच यु टु बी रिच :

4) द टोटल मनी मेक ओव्हर :

5) युअर मनी आँर युअर लाईफ :

6) ब्रोक मिलिनिअल :

7) थिंक अँण्ड ग्रोव्ह रिच :

8) द सिंपल पाथ टु वेल्थ :

9) द अँटोमँटिक मिलिनेअर :

10)द वन पेज फाइनान्शिअल प्लँन :

11) क्लेव्हर गर्ल फायनान्स :

12) द साइकोलाँजी आँफ मनी :

13)द सायन्स आँफ मनी :

14) द मिलिनिअर फास्टलेन :

15) द सिक्रेटस आँफ मिलिनिअर माईंड :

1)रिच डँड पुअर डँड : रिच डँड पुअर डँड ह्या पुस्तकाचे लेखक राँबट कियोसाकी आणि शिराँन लेचर हे आहेत.या पुस्तकाचे लेखन 1997 मध्ये करण्यात आले आहे.

ह्या पुस्तकातुन आपल्याला आर्थिक साक्षरतेचे(financial literacy) चे महत्व कळते याचसोबत यातुन आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य(financial freedom) मालमत्तेमध्ये गुंतवणुक(property investment) कशी करावी इत्यादी महत्वाच्या बाबी शिकायला मिळतात.

2) मिलिनिअर नेक्सट डोअर :

 द मिलिनिअर नेक्सट डोअर हे थाँमस जे स्टँनले आणि विल्यम डी डँको यांनी 1996 मध्ये लिहिलेले पुस्तक आहे.

ह्या पुस्तकातुन लेखकाने अमेरिकन लक्षाधीशांच्या प्रोफाईलविषयी केलेल्या संशोधनाचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो.यात लेखक थाँमस जे स्टँनले आणि विल्यम डी डँको यांनी अमेरिकन लक्षाधीशांच्या वर्तनाची तुलना यात केलेली आहे.

3) आय विल टीच यु टु बी रिच :

 आय विल टीच यू टु बी रीच ह्या पुस्तकाचे लेखक रमित सेठी हे आहेत.ह्या पुस्तकाचे लेखन 2009 मध्ये करण्यात आले होते.

 ह्या पुस्तकातुन आपण हे शिकायला हवे की नोकरी करून देखील आपण कशापदधतीने करोडपती बनू शकतो.यातुन आपल्याला बचत आणि गुंतवणुकीचे महत्व कळते आणि त्याविषयी महत्वपुर्ण माहीती देखील प्राप्त होते.

4) टोटल मनी मेक ओव्हर :

 द टोटल मनी मेक ओव्हर ह्या पुस्तकाचे लेखक डेव्ह रँमसे आहेत.

ह्या पुस्तकातुन कर्जापासुन मुक्त कसे व्हावे?कर्जापासुन दुर राहण्यासाठी आपण कोणते उपाय करायला हवे हे ह्या पुस्तकातुन आपल्याला शिकायला मिळते.ह्या पुस्तकाचे वाचन केल्याने आपले पैशाबाबतचे गैरसमज दुर होतात.

5) युअर मनी आँर युअर लाईफ :

 ह्या पुस्तकाचे लेखन विकी राँबिन,जोसेफ डोमिंग्ज,माँनिक टिलफोर्ड तीन जणांनी मिळुन केले आहे.

आपण आयुष्यभर नोकरी पैसा यांच्यामागे धावता धावता कसे आपल्या वैयक्तिक आयुष्यात निराश आणि हताश जीवण जगत असतो हे आपल्याला ह्या पुस्तकातुन पाहायला मिळते.

नोकरी पैसा,धन संपत्तीच्या पेक्षा आपले आयुष्य अधिक जास्त महत्वाचे आहे हे आपल्याला ह्या पुस्तकातुन शिकायला मिळते.

6) ब्रोक मिलिनिअल :

 ब्रोक मिलिनिअल चे लेखक ईरीन लाँरी हे आहे.

ह्या पुस्तकातुन लेखकाने आपल्याला असे सांगितले गेले आहे कशी तरूण पिढी आज पैशाच्या बाबतीत कंन्फ्युज आहेत आणि पैशामुळेच तणावात आहेत.यात आपण बजेटिंग कसे करायचे हे देखील आपल्याला सांगितले आहे.

7) थिंक अँण्ड ग्रोव्ह रिच :

 थिंक अँण्ड गोव्ह रिच ह्या पुस्तकाचे नेपोलियन हिल आहेत.ह्या पुस्तकाचे लेखन नेपोलियन हिल यांनी 1937 मध्ये केले होते.

ह्या पुस्तकातुन आपल्याला आपला वैयक्तिक विकास आणि आत्मसुधारणा करण्यास प्रेरणा मिळते.ह्या पुस्तकातुन आपण श्रीमंत व्यक्तीसारखा विचार करून कसे श्रीमंत बनून अधिक प्रगती करू शकतो हे आपल्याला शिकायला मिळते.

 

8) सिंपल पाथ टु वेल्थ :

 ह्या पुस्तकाचे लेखक जे एल कोलिन्स हे आहेत.ह्या पुस्तकाचे प्रकाशन 18 जुन 2016 मध्ये करण्यात आले होते.

ह्या पुस्तकातुन लेखक जे एल कोलिन्स यांनी श्रीमंत धनवान होण्याचे आणि आपल्या संपत्तीत वाढ करण्याचे काही सोपे मार्ग आपल्याला सांगितले आहेत.

9) आँटोमँटिक मिलिनेअर :

 द आँटोमँटिक मिलिनियर हे डेव्हिड बाच यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

या पुस्तकातुन आपल्याला संपत्ती तसेच धन निर्माण करण्यासाठी स्टेट बाय स्टेप प्लँन दिलेला आहे.आणि यात आपल्याला हे देखील सांगितले आहे की पहिले आपण आपल्या स्वताला पैसे द्यायला हवेत मग इतर बाबींसाठी खर्च करायला हवा.

10) वन पेज फायनान्शिअल प्लँन :

 द वन पेज फायनान्शिअल प्लँन हे कार्ल रिचर्ड यांनी लिहिलेले पुस्तक आहे.कार्ल रिचर्ड हे एक आर्थिक सल्लागार आहेत.

यात लेखक कार्ल रिचर्ड यांनी आपण आपल्या बचत आणि गुंतवणुकीला कसे सोपे बनवू शकतो  आणि कसे हे सर्व एका सिंगल पेजमध्ये प्लँन करू शकतो हे सांगितले आहे

11) क्लेव्हर गर्ल फायनान्स :

 क्लेव्हर गर्ल फायनान्स हे बोला सुकुंबी ह्यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

आपण आपली सर्व जुनी कर्जे फेडुन काढुन टाकायला हवी.पैसे वाचवून पैशांची अधिक बचत करायला हवी आणि आपली खरी संपत्ती तयार करायला हवी हे आपल्याला ह्या पुस्तकातुन सांगण्यात आले आहे.

12) साईकोलाँजी आँफ मनी :

 द साईकोलाँजी आँफ मनी ह्या पुस्तकाचे लेखक माँरगल हाऊसेल हे आहेत.

ह्या पुस्तकातुन आपल्याला हे सांगण्यात आले आहे की आपण जीवणातील सर्वात महत्वाच्या विषयांमध्ये एकाचाच अधिक चांगला अर्थ जाणुन घ्यायला हवा.

ह्या पुस्तकाने आपल्या पैशाविषयीच्या मानसिकतेत बदल होऊन आपण अधिकाधिक पैशांची गुंतवणुक करायला शिकतो.

13) सायन्स आँफ मनी :

 द सायन्स आँफ मनी हे ब्राईन स्ट्रेसी डँन स्ट्रझेल या दोघा लेखकांनी मिळुन लिहिलेले पुस्तक आहे.

द सायन्स आँफ मनी ह्या पुस्तकातुन पैसे कमविणे आणि पैसे बनविणे यासंबंधीचा आपला सर्व गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 14) मिलिनिअर फास्टलेन :

 द मिलिनिअर फास्टलेन हे एम जे डिमारको यांनी लिहिलेले पुस्तक आहे.

तरूण वयातच लवकर श्रीमंत बनण्याचे जलद मार्ग कोणकोणते आहे हे ह्या पुस्तकातुन एम जे डिमारको यांनी आपल्याला सांगितले आहेत.

या पुस्तकातुन आपल्याला हे शिकायला मिळते की श्रीमंत होण्यासाठी आपल्याला चाळीसीची वाट बघायची कोणतीही आवश्यकता नाहीये आपण तरूण वयात देखील अत्यंत जलद गतीने श्रीमंत होऊ शकतो.

15) सिक्रेटस आँफ मिलिनिअर माईंड :

द सिक्रेटस आँफ मिलिनिअर माईंड ह्या पुस्तकाचे लेखक टी हार्व एकर हे आहेत.

लेखक टी हार्वर यांनी मिलिनिअर लोकांचे विचार करण्याची पदधत,माईंडसेट जीवण शैली,स्वभाव इत्यादींचा अभ्यास करून लेखन केलेले हे पुस्तक आहे.

यातून टी हार्वर यांनी मिलिनिअर माईंड लोकांची काही सिक्रेटस आपल्याला सांगितली आहेत.जी जाणुन घेऊन आपण देखील त्यांच्यासारखे मिलिनिअर बनु शकतो.

3 thoughts on “जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके – आर्थिक सक्षमता – Top 10 Best Personal Finance Book”

Leave a Comment