मार्गारेट अल्वा यांच्याविषयी माहीती – Margaret Alva information in Marathi

मार्गारेट अल्वा यांच्याविषयी माहीती – Margaret Alva information in Marathi

एन डी ए पक्षाने उपराष्टपतीसाठी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणुन जगदिप धनखड यांचे नाव घोषित केल्यानंतर आता विरोधी पक्षाने देखील उपराष्ट्रपति पदासाठी आपल्या पक्षाकडुन उमेदवाराचे नाव घोषित केले आहे.

यूपी एने उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा यांचे नाव घोषित केले आहे.नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका बैठकीत राष्टवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांचे नाव घोषित केले आहे.

मार्गारेट अल्वा यांना अनेक पक्षांनी आपले समर्थन देखील दिले आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ह्या कोण आहेत?त्यांचा राजकीय इतिहास काय आहे?इत्यादी सर्व बाबींविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

मार्गारेट अल्वा कोण आहे?

  • मार्गारेट अल्वा ह्या भारतातील महिला राजकीय कार्यकर्त्त्या आहे.मार्गारेट अल्वा ह्या राजस्थान ह्या राज्याच्या राज्यपाल आहेत.
  • मार्गारेट अल्वा ह्या भारतीय राष्टीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणुन 1999 मधील लोकसभा निवडणुकीत कर्नाटक ह्या राज्यातील कनारा ह्या लोकसभा मतदार संघामधून निवडुन देखील आल्या होत्या.
  • 1974 ते 1998 ह्या कालावधीत मार्गारेट अल्वा ह्या राज्यसभेच्या सभासद होत्या.याचसोबत मार्गारेट अल्वा यांनी उत्तराखंड ह्या राज्याचे राज्यपालपदाचा देखील कारभार सांभाळलेला आहे.
  • मार्गारेट अल्वा ह्या आतापर्यत गोवा ह्या राज्याच्या सतराव्या राज्यपाल,गुजरात ह्या राज्याच्या तेविसाव्या अणि राजस्थानच्या विसव्या राज्यपाल,उत्तराखंड ह्या राज्याच्या चौथ्या अणि प्रथम महिला राज्यपाल राहिल्या आहेत.
  • याचसोबत मार्गारेट अल्वा व्यवसायाने एक वकिल सुदधा आहेत.

मार्गारेट अल्वा यांचे महाविद्यालयीन शिक्षण-

मार्गारेट अलवा यांनी बंगळुर मधील माऊंट काँर्बैल ह्या महाविद्यालयातुन पदवीचे शिक्षण बी ए करून पुर्ण केले.

यानंतर बंगळुर येथेच त्यांनी एका लाँ काँलेजमध्ये लाँ चे शिक्षण करून लाँची पदवी प्राप्त केली.

मार्गारेट अल्वा यांना प्राप्त झालेले पुरस्कार –

  • मार्गारेट अल्वा यांना त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दिलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल 2012 मध्ये मर्सी रवी पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले आहे.
  • मार्गारेट अल्वा यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?
  • मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 मध्ये मंगळुर कर्नाटक येथे एका रोमन कँथोलिक परिवारात झाला होता.

मार्गारेट अल्वा यांच्या पतीचे नाव काय आहे?

मार्गारेट अल्वा यांच्या पतीचे निरंजन अल्वा असे आहे.निरंजन अल्वा यांच्यासोबत 24 मे 1964 रोजी त्या विवाहबदध झाल्या होत्या.

मार्गारेट अल्वा कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत?

मार्गारेट अल्वा ह्या इंडियन नँशनल काँग्रेस ह्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत.

मार्गारेट अल्वा यांच्या मुलांची नावे काय आहेत?

मार्गारेट अल्वा यांच्या निरेत अल्वा,निवेदिता अल्वा,निखिल अल्वा,मनिरा अल्वा असे आहे.

Leave a Comment