जी एसटी विषयी माहीती – GST information in Marathi

जी एसटी विषयी माहीती , अर्थ ,घटक व GST फायदे – GST information in Marathi

मित्रांनो भारतात अनेक प्रत्यक्ष अणि अप्रत्यक्ष कर प्रणाली अस्तित्वात आहे.

पहिले आपणास विविध प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर भरावे लागत होते.ज्यामुळे नागरीकांची फार गैरसोय होत होती.

म्हणुन शासनाने हे सर्व विविध कर काढुन टाकले अणि सर्व मिळुन एकच कर सर्वाना समान पदधतीने लागु केला.ज्याचे नाव आहे जीएसटी.

आजच्या लेखात आपण ह्याच जीएसटी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जी एसटीचा फुलफाँर्म काय होतो?GST full form in Marathi

जीएसटीचा फुलफाँर्म goods and services tax असा होत असतो.

जीएसटी म्हणजे काय?GST meaning in Marathi

एखाद्या वस्तु तसेच सेवेचा उपभोग घेण्यासाठी ग्राहकांना जो कर द्यावा लागत असतो त्यालाच जीएसटी असे म्हणतात.देशामधल्या सर्व नागरीकांना हा वस्तु अणि सेवा कर समान रीतीने भरावा लागत असतो.

वस्तु अणि सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर असतो जो आपल्याला अप्रत्यक्षपणे भरावा लागत असतो.म्हणजेच आपण कुठल्याही वस्तुची तसेच सेवेची जर खरेदी केली तर त्यावर आपणास हा कर आकारला जात असतो.

जीएसटी कधी लागु करण्यात आली होती?

2017 साली 1 जुलै रोजी जीएसटी म्हणजेच वस्तु अणि सेवा कर लागु करण्यात आला होता.

See also  IDV म्हणजे काय? महत्व आणि कॅलक्युलेशन - Insured Declared Value information in Marathi

अणि ही कर प्रणाली 2017 मध्ये 29 मार्च रोजी संसदेमध्ये पारीत करण्यात आली.

वस्तु अणि सेवा यांवर जीएसटी का लागु करण्यात आली?

वर्तमानातील जी कराची संरचना होती तिच्यात सुधारणा घडवून आणण्याकरीता ही अप्रत्यक्ष कर प्रणाली लागु करण्यात आली होती.

ही जीएसटी आकारण्याबाबद सरकारची काही धोरणे तसेच नियम असतात.

यात प्रत्येक राज्यामध्ये कुठल्याही वस्तु तसेच सेवेवर एक समान पदधतीचा कर आकारला जातो.एकच समान कर असल्याने ग्राहकांना देखील याचा लाभ प्राप्त होत असतो.

वर्तमानात आज वस्तु अणि सेवेवर जी कर प्रणाली लागु करण्यात आली आहे तिच्या आधी वस्तु अणि सेवेवर अनेक प्रकारचे टँक्स लावले जायचे.हे सर्व कर प्रत्येक राज्यात विभिन्न पदधतीने विविध दर लावून आकारले जायचे.

याचा परिणाम असा होत होता की देशातील कर प्रणालीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ लागली.जिथे कमी कर आकारला जायचा त्या राज्यांत उद्योग व्यवसाय अधिक विस्तार पावत होते.

अणि जास्त कर आकारले जात होते अशा राज्यांमध्ये उद्योग व्यवसाय कमी विस्तार पावत होते.कंपन्या सुदधा कमी कर लागु असलेल्या राज्यातुन उत्पादन विकत घेत असत अणि त्याची विक्री इतर राज्यात करत होती.

म्हणुन देशाचा विकासाच्या हेतुने एका देशात एकच कर ही प्रणाली लागु करण्यात आली.ही एक कर प्रणाली लागु होण्याच्या आधी 30 जुन रोजी 2017 ला संसदेचे अधिवेशन भरविण्यात आले.

त्यातच राष्टपतींकडुन जनतेला जीएसटी लागु करत असल्याचे सुचित करण्यात आले अणि मग 1 जुलै 2017 पासुन हा कर लागु देखील करण्यात आला.

जी एसटी काऊंसिल म्हणजे काय?

ही एक मध्यवर्ती वैधानिक संस्था आहे जी वस्तु अणि सेवा कराचे नियमन करण्याचे काम करते.केंद्रीय अर्थमंत्र्यांना याचे अध्यक्ष बनविले जात असते.

जीएसटीचे प्रमुख घटक कोणकोणते आहेत?

जीएसटीमध्ये तीन प्रकारचे कर नागरीकांना भरावे लागत असतात.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर-central good and service tax

राज्याअंतर्गत ज्या वस्तुची सेवेची विक्री केली जात असते त्यावर त्या वस्तु अणि सेवावर केंद्र सरकार केंद्रीय वस्तु अणि सेवा कराची आकारणी करत असते.त्यालाच केंद्रीय अणि वस्तु सेवा कर असे संबोधित केले जाते.

See also  ब्रिजिंग लोन म्हणजे काय? - Bridging loan meaning in Marathi
राज्य वस्तू आणि सेवा कर-state good and service tax –

राज्यांतर्गत ज्या वस्तु अणि सेवेची विक्री केली जाते तिच्यावर राज्य सरकार जो कर आकारत असते त्याला राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणजेच state good and service tax म्हणतात.

जेव्हा विक्रीचा व्यवहार एकाच राज्यामध्ये होत असतो तेव्हा राज्य वस्तु सेवा कर लागु केला जात असतो.

म्हणजे समजा मी एक वस्तु महाराष्ट्र मध्ये खरेदी करून महाराष्ट्र मध्येच विकली तेव्हा मला त्या वस्तु तसेच सेवेवर राज्य वस्तु सेवा कर भरावा लागेल.

एकात्मिक चांगला आणि सेवा कर-integrated good and service tax

हा कर आंतरराज्यातील व्यक्तीसोबत केलेल्या विक्री व्यवहारावर लागु होत असतो.

म्हणजे मी महाराष्ट्र मध्ये राहतो अणि गुजरात राज्यामधील व्यक्तीला दहा हजाराचा माल विकतो आहे अणि सध्याचा जीएसटी रेट 18 प्रमाणे आहे तर अशा परिस्थितीत संपुर्ण व्यवहार प्रक्रियेवर मला 1800 इतका आयजी एसटी द्यावा लागेल.

हा आयजी एसटी केंद्र अणि राज्य दोघे मिळुन आकारत असते.

जी-एसटीचे फायदे काय आहेत?

● यात इनपुट क्रेडिट सिस्टम असते म्हणजे जीसटी टँक्स भरण्याच्या वेळी याआधी खरेदी करताना अगोदर आपण भरलेला टँक्स कमी करता येतो.अणि जितकी रक्कम बाकी असते तेवढयाच टँक्स आपणास भरावा लागत असतो.याने आपला हा फायदा होत असतो की वस्तुच्या किंमतीत वाढ होत नाही.

● आधीच्या कर प्रणाली मध्ये एक करावर दुसरा कर आकारण्यात येत होता.ज्यामुळे वस्तुची किंमत अधिक वाढताना आपणास दिसुन येई पण जेव्हापासुन जीएसटी लागु करण्यात आली तेव्हापासून एका करावर दुसरा कर आकारणे बंद झाले.एकाच गुड टँक्सची यात आकारणी केली जाते.

● सर्व वस्तु अणि सेवांवर सगळीकडे एकच कर आकारला जाईल.सर्व दशात एकच सारखा टँक्स असल्यान सर्व ठिकाणी वस्तुची किंमत सारखीच असणार आहे.ज्याने व्यवहारामध्ये पारदर्शकता निर्माण होण्यास हातभार लागेल.

See also  कार इन्शुरन्स म्हणजे काय ? वाहन विमा संपूर्ण माहिती - Car Insurance Marathi information

● कोणालाही टँक्स चुकवता येणार नाही.ज्याने देशाचा जीडीपी देखील वाढेल.

जी-एसटीचे काही तोटे –

● राज्य सरकारला प्राप्त होणारे विभिन्न टँक्स बंद होतील.

● सेवेच्या किंमतीत वाढ होऊ शकते कारण मागील करप्रणालीत वस्तुंवरचे कर अधिक होते अणि विविध सेवेवरचे कर कमी आहेत.पण जीसटी लागु झाल्यापासुन एकच टँक्स सर्वाना सगळीकडे लागु केला जात आहे.ज्याचे परिणामस्वरूप सेवेवरील करात वाढ होते अणि लोकांना कुठलीही सेवा विकत घेणे महागाईमुळे अवघड होत असते.लोक मग वस्तु सेवेची खरेदी करत नाही ज्याचे नुकसान व्यापारींना देखील सहन करावे लागते.कारण याने त्यांच्या मालाची विक्री मागणी कमी होऊ लागते.

2 thoughts on “जी एसटी विषयी माहीती – GST information in Marathi”

Comments are closed.