कँपिटल मार्केट अणि मनी मार्केट मधील फरक – Difference between capital market and money market in Marathi

कँपिटल मार्केट अणि मनी मार्केट मधील फरक – Difference between capital market and money market in Marathi

कँपिटल मार्केट अणि मनी मार्केट मधील साम्य –

● कँपिटल मार्केट अणि मनी मार्केट हे दोघेही फायनान्शिअल मार्केटचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

Capital market – भांडवल बाजार

● कँपिटल मार्केट हे एक असे मार्केट आहे जे मध्यम मुदतीच्या आणि दीर्घकालीन सिक्युरिटीजशी व्यवहार करते.

● आपल्याला जर एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी पैसे हवे असेल तर आपण कँपिटल मार्केटमधुन पैसा उभा करत असतो.तसेच गोळा करत असतो.

● कँपिटल मार्केटमध्ये मोठमोठया वित्तीय संस्था,खासगी कंपन्या,परकीय गुंतवणुकदार,सामान्य किरकोळ गुंतवणूकदार हे यात सहभाग घेत असतात.

● कंँपिटल मार्केटमध्ये इक्विटी शेअर,प्रिफरन्स शेअर अणि बाँण्ड ही व्यवहाराची साधने असतात.

● कँपिटल मार्केट मध्ये आपणास जास्त पैशांची आवश्यकता नसते.कारण येथील सिक्युरीटीजची शेअर्सची किंमत फार कमी असते.म्हणजे इथे दहा रूपयाला देखील एक शेअर मिळत असतो.

● कँपिटल मार्केटमधील संसाधनांची लिक्विडीटी म्हणजे तरलता मनी मार्केट पेक्षा कमी असते.कारण हे दिर्घकालीन कालावधीसाठी असतात.

● यात फार जोखिम असते.कारण कँपिटल मार्केटमधील सिक्युरीटीज फार जोखिमदायी असते.रिटर्नच्या उददिष्टाने अणि प्रिन्सिपल रिपेमेंटच्या दृष्टीने देखील.कारण यात आपण एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे ती कंपनी लाँस मध्ये जात आहे पुर्णपणे डुबण्यावर बंद पडण्यावर आली आहे याचा अर्थ त्या कंपनीसोबत आपले खरेदी केलेले शेअर्स देखील डुबत असतात.आपल्याला यात कुठलाही रिटर्न इंटररेस्ट देखील मिळत नही,सोबत मुख्य परतफेड रक्कम देखील आपणास मिळत नसते.यामधील संसाधने लगेच कँश मध्ये रूपांतरीत देखील होत नसतात.

● कँपिटल मार्केटमधून आपणास मनी मार्केट पेक्षा जास्त परतावा मिळत असतो.यात आपल्याला रेग्युलर डिव्हीडंड प्राप्त होत असतो शिवाय आपणास इंटरेस्ट मिळत असतो.आपण यात लाँग टर्मसाठी गुंतवणुक करत असतो म्हणुन रिटर्न देखील मनी मार्केटच्या तुलनेत जास्त मिळत असतात.

● निश्चित भांडवलासाठी गरजेपुरता आपण कँपिटल मार्केटमधुन पैसा उभा करू शकतो.

See also  Derivatives market अणि Option trading म्हणजे काय?

उदा, जमिनीची खरेदी करणे,यंत्राची खरेदी करणे

Money market – मुद्रा बाजार

● आपल्याला काही शाँर्ट टर्म सिक्युरीटीज हव्या असतील थोडयाच कालावधीसाठी काही दिवसांसाठी तसेच जास्तीत जास्त एक वर्षाकरीता पैसे हवे असतील तर आपण मनी मार्केट मधुन पैसा गोळा करत असतो.

● मनी मार्केट मध्ये आरबीआय,वित्तीय संस्था,बँक,राज्य सरकार,सार्वजनिक तसेच इतर खाजगी संस्था मनी मार्केट मध्ये सहभाग होत असतात.मनी मार्केटमध्ये परकीय गुंतवणुकदार अणि सामान किरकोळ गुंतवणुकदार देखील सहभाग घेत नसतात.

● मनी मार्केट मध्ये फक्त मोठमोठया प्रतिष्ठित कंपन्या जसे की टाटा रिलायन्स विशेषकरून सहभागी होत असतात.म्हणुन इथे गुंतवणुकदारांचे पैसे डुबण्याची शक्यता फार तुरळक असते.

● ज्यांना आपले पैशांची सुरक्षितता हवी असते आपले पैसे बुडीत जाऊ नये ही सिक्युरीटी सेफटी हवी असते असे लोक मनी मार्केट मधुन पैसा गोळा करत असतात.उभा करत असतात.

● मनी मार्केट मध्ये ट्रेझरी बिल,कमर्शिअल बिल,डिपाँझिट सर्टिफिकेट ही व्यवहाराची साधने असतात.

● मनी मार्केट मध्ये आपणास जास्त पैशांची आवश्यकता भासत असते कारण यातील संसाधनाची किमान किंमत खुप जास्त असते उदा ट्रेझरी बिल,कमर्शिअल बिल,इत्यादी.

● मनी मार्केटमधील संसाधनांची लिक्विडीटी म्हणजे तरलता कँपिटल मार्केटच्या तुलनेत खुप जास्त असते.कारण यातील संसाधनांना आपण सहजपणे कँश मध्ये रूपांतरीत करू शकतो.

● मनी मार्केट मध्ये कँपिटल मार्केटपेक्षा सेफटी अणि सिक्युरीटी जास्त असते.कारण हे अल्पकालावधीसाठी असते.यात संसाधनांना सहजपणे कँश मध्ये रूपांतरीत देखील करता येत असते.म्हणजेच लिक्विडीटी देखील यात जास्त असते.

● मनी मार्केट मधुन आपणास कँपिटल मार्केटच्या तुलनेत कमी परतावा मिळत असतो.कारण हे काही कालावधीसाठी काही दिवसांसाठीच असते.म्हणुन यात आपणास कँपिटल मार्केट प्रमाणे हाय रिटर्न मिळत नसतात.

● जर आपणास कार्यरत भांडवलाची आवश्यकता आहे तर आपण मनी मार्केट मधुन पैसा उभा,गोळा करू शकतात.

उदा, आज आपणास पैशांची आवश्यकता आहे अणि काही दिवसांनी एखाद्याकडुन पैसे भेटणार आहे

See also  Personal Finance - बँकिंग,इन्कम वं इन्श्युरंस क्षेत्रातली 25 म्हत्वाचे शब्द - Useful Personal Finance terms in Marathi

Leave a Comment