सॅलरी अकाऊंट म्हणजे काय? Salary account meaning in Marathi

सॅलरी अकाऊंट म्हणजे काय?Salary account meaning in Marathi

ज्या बॅकेमधील खात्यात आपला म्हणजेच नोकरदार व्यक्तींचा दरमहिन्याला पगार येत असतो.त्याला सॅलरी अकाऊंट असे म्हणतात.

सॅलरी अकाऊंट हे आपल्या सेव्हिंग अकाऊंट प्रमाणेच असते.फरक फक्त एवढाच असतो की सॅलरी अकाऊंट मध्ये आपल्याला सेव्हिंग अकाऊंटच्या तुलनेत अधिक सुविधा प्राप्त होत असतात.

सॅलरी अकाऊंट वर आपणास सेव्हिंग अकाऊंट मधील सुविधा जसे की डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग,एटीएम चेक बुक इत्यादी सोबत इतर अनेक सुविधा देखील उपलब्ध होत असतात.

सॅलरी अकाऊंट कोण उघडु शकते?

जे नोकरदार व्यक्ती ज्यांचे दरमहीन्याला खात्यावर वेतन जमा होत असते असे व्यक्ती सॅलरी अकाऊंट उघडु शकतात.

हे अकाऊंट नोकरदार व्यक्तींना ज्या संस्था तसेच कंपनीमध्ये ते नोकरी करता आहे तिथुन दिले जात असते.

सॅलरी अकाऊंट ओपन केल्यावर कंपनी तसेच संस्थेकडुन कर्मचारींना एक सॅलरी अकाऊंट नंबर दिला जातो त्याच नंबरवर त्यांचे पैसे कंपनी दरमहीन्याला नेट बँकिंग वगैरे द्वारे त्यांच्या खात्यावर जमा करत असते.

सॅलरी अकाऊंटचे वैशिष्ट्य तसेच फायदे कोणकोणते आहेत?feature and benefits of salary account in Marathi

सॅलरी अकाऊंटचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बॅक खाते धारकास झिरो बॅलन्स सर्विस प्रदान केली जाते.

म्हणजे इथे आपले खाते चालू ठेवण्यासाठी आपणास आपल्या खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नसते.म्हणजे खात्यात किमान रक्कम शिल्लक नसताना देखील आपले खाते चालत असते.

अणि बॅक खाते धारकाकडुन कुठलाही चार्ज,दंड देखील वसुल करत नसते.

सॅलरी अकाऊंटचे दुसरे वैशिष्ट्य आहे खाते धारकास कर्ज घेण्याची दिली जाणारी सुविधा.सॅलरी अकाऊंट असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे लोन अत्यंत सहजरीत्या उपलब्ध होत असते.

कारण बॅक स्टेटमेंट मध्ये आपले एकुण उत्पन्न किती आहे हे बॅकेला लगेच दिसुन जात असते.ज्याने बँक देखील आपणास लगेच लोन देण्यास तयार असते.

इथे आपणास पर्सनल लोन,कार लोन,होम लोन असे कुठलेही लोन बॅकेकडुन घ्यायचे असेल तर सॅलरी अकाऊंटमुळे आपणास झटकन प्राप्त होत असते.

See also  ज्येष्ठ नागरिक बचत योजना मधील कमाल ठेवीची मर्यादा १५ लाखावरून ३० लाख केली जाणार - Senior citizens Saving scheme latest update in Marathi

सॅलरी अकाऊंटचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सॅलरी अकाऊंट धारकांना बॅकेकडुन ओवहरड्राफ्ट ची सुविधा देखील प्रदान केली जाते.फक्त आपले अकाऊंट किमान दोन वर्षे जुने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी जुने असणे गरजेचे आहे.

सॅलरी अकाऊंटवर आपणास फ्री मध्ये एटीएम ट्रानझॅक्शन सुविधा प्राप्त होत असते.अनेक बॅकेकडुन सॅलरी अकाऊंट धारकांना ही सुविधा प्रदान करण्यात येते.

ज्यांच्याकडे अधिक पैसे आहेत ते खाते धारक येथे आपले वेल्थ सॅलरी अकाऊंट देखील ओपन करू शकतात.इथे आपणास वेल्थ मॅनेजमेंट सुविधा सुदधा होत असते.

सॅलरी अकाऊंट मध्ये आपणास डिमॅट अकाउंट ओपन करण्याची सुविधा देखील प्राप्त होत असते.

सॅलरी अकाऊंट अणि सेव्हिंग अकाऊंट मधील मुख्य फरक –

सॅलरी अकाऊंट मध्ये जी रक्कम असते तिच्यावर आपणास बॅकेला कुठलाही इंटरेस्ट पे करावा लागत नसतो.पण सेव्हिंग अकाऊंट मध्ये जी रक्कम असते तिच्यावर आपणास बॅकेला चार ते सहा टक्के इतका इंटरेस्ट पे करावा लागत असतो.

सॅलरी अकाऊंट विषयी जाणुन घ्यायच्या काही महत्त्वाच्या बाबी –

जर खुप कालावधी पासुन आपल्या सॅलरी अकाऊंट वर पैसे म्हणजेच सॅलरी पाठविली जात नसेल तर आपले सॅलरी अकाऊंट हे सेव्हिंग अकाऊंट मध्ये रूपांतरित केले जाते अणि सॅलरी अकाऊंट वर आपणास बॅकेकडुन ज्या सुविधा दिल्या जात असतात त्या देखील मिळणे बंद होत असते.