ओमेगा-3 फॅटी ऍसिड -Omega-3 Fatty Acids Marathi information

Omega-3 Fatty Acids Marathi information

मानवाच्या शरीराची आरोग्य रचना आशा पद्धतीने असते की की,शरीराला पोषक असणारे काही घटक शरीर स्वतःचे स्वतः तयार करते.परन्तु ओमेगा 3 फॅटी ऍसिड असा प्रमुख पोषक घटक आहे जो की तुम्हाला आहारातूनच मिळू शकतो.

ओमेगा 3 ह Poly Unsaturated ऍसिड चाच एक भाग आहे.हे पेशींच्या बाहेरील भागाला जोडलेले असते.साधारणतः ह्याला तीन प्रकारामध्ये विभागले जाते.

  • ALA-झाडांपासून मिळणारे ओमेगा-3 फॅटी ऍसिड,
  • DHA -सी पदार्थातून मिळणारे ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि
  • EPA नॉन-व्हेज म्हणजे मटण,चिकन,अंडी आणि मासे यांपासून मिळणारे ओमेगा-3 फॅटी ऍसिड,इत्यादी.आपण या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की आपल्याला जेवणातून योग्य प्रमाणात ओमेगा -3 फॅटी ऍसिड मिळतंय की नाही.

ओमेगा-3 फॅटी ऍसिड आपल्या शरीरासाठी गरजेचा का आहे ?

  • ओमेगा-3 फॅटी ऍसिड लहान मुलांमधील शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्वाचे आहे.
  • ओमेगा-3 फॅटी ऍसिड आपल्याला कॉर्डियो वस्क्युलर आणि हाडंसंबंधी होणाऱ्या आजारापासून वाचवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
  • महिला जर गरोदर असतील तर पोटातील बाळाच्या मेंदूच्या आणि डोळ्यांच्या विकासासाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिड युक्त जेवण प्रेग्नेंट महिलेने सेवन करणे गरजेचे आहे.
  • ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे लहान मुलांना सेरीबर्ल्स, पालसी सारख्या मानसिक आजारापासून वाचण्यासाठी मदत करते.
  • बाळाचा जन्म झाल्यानंतरही ओमेगा-3 फॅटी ऍसिड बाळाच्या मेंदूच्या आणि नर्व्हस सिस्टीम च्या विकासासाठी मदत करते.

ओमेगा-3 फॅटी ऍसिड घटक मिळण्याची प्रमुख स्तोत्रे –Omega-3 Fatty Acids Marathi information 

  1. नॉन-व्हेज खाणाऱ्या व्यक्तींना मटण,अंडी आणि मासे यामधून ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे पोषक घटक मिळतात.आणि ह्याचे सप्लिमेंट फिश कॉर्ड लिव्हर ऑइल पासून तयार केले जाते.
  2. या विरुद्ध फक्त व्हेज पदार्थ खात असणाऱ्या व्यक्तींसाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे पोषक घटक स्त्राबेरी,सर्व पालेभाज्या,सोयाबीन,कडधाने यामधून मिळतात.
  3. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे प्रमाण असते.त्यामुळे तुमच्या जेवनामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे.लहान मुलांच्या मेंदुला विकसित करण्यासाठी त्यांना दररोज 4 ते 5 बदामाचे दिले पाहिजेत.ज्याने की त्यांच्या मेंदूचा विकास पटकन होईल.
See also  दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे -Health benefits of eating curd daily

काही महत्वाच्या गोष्टी –

  • सतत आहारामध्ये एकाच तेलाचा वापर न करता दर तीन-चार महिन्याला वापरत असणारे तेल बदला.सारखे आहारातील तेल बदलल्यामुळे तुमच्या शरीराला प्रत्येक तेलातील पोषक घटक मिळतील.
  • फ्लेक्स सिड्स फायद्याचे असते,परन्तु जे हाय बिलीबेली पाईल्स यांचे रुग्ण आहेत त्यांनी याचे सेवन केले नाही पाहिजे.लहान मुलांना ही तुम्ही फ्लेक्स सिड्स देऊ नका.
  • जर तुम्हाला सी फूड्स ची ऍलर्जी असेल तर तुम्ही त्यापासून लांबच रहा.
  • डॉक्टरांची परवानगी न घेता आपण जर सप्लिमेंट चे सेवन केले तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे.

शरीरात ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे प्रमाण जर कमी असेल तर शरीराचे कोणते नुकसान  होऊ शकते ?

  • साधारणतः सारखा दम भरणे,शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढणे,रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यामुळे आपली पचनक्रिया योग्य रीतीने काम करत नाही.
  • शरीरातील ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे प्रमाण कमी झाल्यामुळे म्हाताऱ्या माणसामध्ये अलजाइमर आजाराचा धोका संभवू शकतो.यामुळे म्हाताऱ्या माणसांची शक्ती हळू हळू कमी होत जाते.

शरीरात जर ओमेगा-3 फॅटी ऍसिड चे प्रमाण वाढले तर शरीराचे कोणते नुकसान होऊ शकते ?

  • साधारणतः एका स्वस्थ व्यक्तीने दिवसाला 500 ते 1000 मिलिग्राम इतके ओमेगा-3 फॅटी ऍसिड ग्रहण केले पाहिजे,शरीरातील ओमेगा-3 फॅटी ऍसिड ची गरज आपण खात असलेल्या अन्नामुळे पूर्ण होते.
  • काही माणसे डॉक्टरांची संमती न घेता सप्लिमेंट खातात,या सप्लिमेंट मुळे त्यांच्या शरीराचे नुकसान होते.बॉडी बिल्डर किंवा ज्यांना शारीरिक फिटनेस जास्त हवाय अशी मंडळी जास्त करून सप्लिमेंट चा वापर करतात.
  • सप्लिमेंट मुळे शरीरातील पेशींवर अतिरिक्त फॅट जमा होते,ज्यामुळे आपल्याला हाय ब्लड प्रेशर आणि हृदय संबंधी आजाराचा सामना करावा लागतो.
  • तुम्ही जर आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ऍसिड घटकांचा म्हणजे भाज्या,फळे,मटण,चिकन,अंडी,इत्यादी चा समावेश कराल, तर तुम्ही स्वस्थ रहाल.

1 thought on “ओमेगा-3 फॅटी ऍसिड -Omega-3 Fatty Acids Marathi information”

Comments are closed.