घर गृहिणींसाठी करिअरचे 10 उत्तम पर्याय  – Career Options For Housewives Marathi

घर गृहिणींसाठी करिअरचे पर्याय  – Career Options For Housewives Marathi

आज आपल्या घरातील आवरानिवर करण्यात आपल्या घरच्यांची नवरा मुल बाळ सासु सासरे इत्यादी कुटुंबियांची काळजी घेण्यात त्यांना काय हवे काय नको हे बघण्यातच प्रत्येक गृहिणींचे संपुर्ण आयुष्य निघुन जात असते.

ज्यामुळे अनेक स्त्रियांना लग्नानंतर आपल्या स्वप्रांना पुर्णविराम द्यावा लागत असतो.पण आता तशी वेळ राहिलेली नाहीये.आजचे युग हे डिजीटल युग आहे तंत्रज्ञानाचे युग आहे जिथे आपण घरबसल्या देखील आपल्याला पाहिजे तो व्यवसाय फक्त आँफलाईन तसेच मोबाईल इंटरनेटचा वापर करून देखील करू शकतो.

जेणेकरून आपल्याला आपल्या घरातील जबाबदारी देखील सांभाळता येते आणि स्वताचा एखादा साईड इन्कम व्यवसाय पण करता येतो.

आजच्या लेखातुन आपण घरगृहिणींना घरबसल्या देखील ज्यात काम करता येईल असे काही उत्तम करिअरचे 10 आँप्शन कोणकोणते आहेत?हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

घर गृहिणींसाठी करिअरचे 10 उत्तम पर्याय कोणकोणते आहेत?

घरगृहिणी ज्या क्षेत्रात घरबसल्या देखील आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन काम करू शकता असे काही 10 उत्तम आँनलाईन तसेच आँफलाईन करीअर आँप्शन पुढीलप्रमाणे आहेत :

1)फिटनेस योगा कोच :

2) होम टयुशन :

3) कंटेट रायटिंग :

4)ब्युटीशियन :

5) ज्वेलरी डिझायनिंग :

6) बेबी सिटिंग :

7) केटरींग अँण्ड टिफिन सर्विस :

8) डेटा एंट्री आँपरेटर :

9) प्राँपर्टी

10) इंशुरन्स एजंट :

11)अँस्ट्रोलाँजर आणि टेरो रीडिंग :

1)फिटनेस योगा कोच :

आज आपल्या फिटनेसची हेल्थची काळजी प्रत्येकालाच असते.म्हणुन रोज सकाळी आपण योगा तसेच कसरत करत असतो.जर आपल्याला फिटनेसविषयी योगाविषयी उत्तम ज्ञान आहे तर आपण घरातच किंवा घराच्या टेरेसवर फिटनेस तसेच योगा क्लासेस घेऊ शकतो.

याने आपल्याला चार फायदे होत असतात रिकाम्या वेळाचे इतरांना मदत करून,योगा शिकवून योग्य रीतीने व्यवस्थापण करता येते.तसेच दोन पैसे कमविता येतात.सोबतच रोज योगा,एक्सरसाईज केल्याने आपले आरोग्य देखील उत्तम राहत असते.आणि आपल्याला आपल्यातील कलागुणांना कौशल्यांना बाहेर काढुन स्वताला सिदध करण्याची संधी प्राप्त होते.

See also  FSSAI  - खाद्य पदार्थ परवाना कसा काढावा - What is FSSAI food License and Procedure

आणि हे सर्व आपण आँफलाईन करण्यासोबत आँनलाईन इंटरनेटचा वापर करून आँनलाईन योगा क्लासेस घेऊनही करू शकतो.

2) होम टयुशन :

ज्या घरगृहिणींना शिक्षणाची आवड आहे आणि त्यांना लहान मुलामुलींना शिकवायला आवडते अशा स्त्रिया रिकाम्या वेळात घरातच बसुन आजुबाजुला राहत असलेल्या मुलामुलींना होम टयुशन देऊ शकतात.

यात घरगृहिणी आँफलाईन घरात क्लासेस घेऊन तर मुलामुलींना शिकवूच शकतात.त्याचसोबत इंटरनेटद्वारे आँनलाईन टिचिंग करून,क्लासेस घेऊन देशातीलच नव्हे तर परदेशातीलही विदयार्थ्यांना देखील शिकवू शकतात.फक्त यासाठी आपल्याला आंतरराष्टीय स्तरावर बोलल्या जात असलेल्या विविध भाषांचे ज्ञान असणे यासाठी खुप गरजेचे आहे.

3) कंटेट रायटिंग :

ज्या घरगृहिणींना लिहिण्याची आवड असेल त्या कंटेट रायटिंगचे काम देखील करू शकतात.यासाठी आपण विविध फ्रिलान्सिंग वेबसाईटवरून कंटेट रायटिंगच्या कामासाठी क्लाईंट शोधू शकतात.आणि त्यांना कंटेट रायटिंगची सर्विस देऊन चांगली कमाई करू शकतात.

कंटेट रायटिंगचे काम आपण आँनलाईन एखाद्या ब्लाँग वेबसाईट,न्युज चँनल,आँनलाईन मँकझिनसाठी लिहुन देखील करू शकतो तसेच आँफलाईन देखील हे काम करू शकतो.फक्त यासाठी आपल्याला कंटेट रायटरची आवश्यकता असलेल्या कंपनी एजंसींसोबत संपर्क साधून कामासाठी विचारपुस करावी लागेल.

4) ब्युटिशियन :

अनेक घरगृहिणी आपल्या घरातल्या घरात ब्यु पार्लर सुरू करू शकतात.आणि आपल्या रिकाम्या वेळात आजुबाजुच्या सोसायटी तसेच काँलनीमधील इतर स्त्रियांना ब्युटी पार्लरची सर्विस देऊ शकतात.

यासाठी आपण अनुभव म्हणुन एखादा ब्यूटी पार्लरचा कोर्स देखील करू शकतात.मग त्यानंतर ही सर्विस घरातुनच इतर स्त्रियांना देणे सुरू करू शकतात.

5)ज्वेलरी डिझाईनिंग :

आज प्रत्येक शहरामध्ये आर्टिफिशल ज्वेलरीच्या कामासाठी ज्वेलरी डिझाईनिंगचे काम स्त्रियांना दिले जाते.मुख्यकरून हे काम घरगृहिणींना करावयास दिले जाते.

ज्या स्त्रियांना ज्वेलरी डिझाईनिंग करता येते.त्या स्त्रिया तसेच घरगृहिणी हे काम आपल्या घरातील काम आवरून झाल्यावर सवड मिळेल त्या वेळेत देखील करू शकतात.याने त्यांना दोन पैसे कमवून घरात हातभार लावण्यास चांगली मदत होईल.

See also  भारतीय स़ंविधानाची मुलभूत कर्तव्ये - प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये कोणती? - Fundamental Duties of Indian Constitution

6) बेबी सिटिंग :

ज्या घरगृहिणींना लहान मुलांसोबत खेळायला त्यांच्या सोबत वेळ व्यतित करायला त्यांचा सांभाळ करायला आवडते अशा स्त्रिया हे काम देखील घरबसल्या करू शकतात.

आणि आज पुरूष आणि स्त्रिया दोघे कामाला जात असतात आणि कमवत असतात म्हणुन आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला कोणी हवे म्हणुन खुप जण बेबी सिटिंगची सर्विस घेत असतात.याने दोघे पती पत्नींना निश्चिंतपणे आपल्या बाळाची कोणतीही चिंता न करता कामावर जाता येत असते.त्यामुळे हे सुदधा एक चांगले करिअर आँप्शन आहे.

7) केटरींग अँण्ड टिफिन सर्विसेस :

स्त्रीला अन्नपुर्णा असे संबोधिले जाते कारण तिच्या हातात चविष्ट आणि खमंग अन्न पदार्थ तयार करण्याचे कौशल्य असते.

ज्या स्त्रियांना कुकिंगची आवड असेल असेल अशा स्त्रिया बाहेरगावी शिक्षणासाठी आलेल्या मुलामुलींना तसेच बाहेरगावी काम करत असलेल्या स्त्रिया पुरूषांना तसेच ज्यांची पत्नी बाहेरगावी कामानिमित्त गेलेली  असेल अशा परिवारांना घरबसल्या घरगुती पदधतीने तयार केलेला स्वयंपाक असलेले मेसचे डबे देण्याचे,टिफिन सर्विस देण्याचे काम करू शकतात.

सुरुवातीला आपण स्वता हे काम करू शकतो आणि मग नंतर कमाई वाढल्यावर बिझनेस वाढवण्यासाठी मोठी टीम देखील तयार करू शकतो.

8) डेटा एंट्री आँपरेटर :

ज्या घरगृहिणींना कंप्युटरचे लँपटाँपचे चांगले नाँलेज असेल अशा महिला घरबसल्या विविध कंपनी तसेच एजंसीसाठी रिकाम्या वेळात आँनलाईन किंवा आँफलाईन डेटा एण्ट्रीचे काम करू शकतात.

आँनलाईन डेटा एण्टीचे काम मिळविण्यासाठी आपण डेटा एंण्ट्री आँपरेटरची आवश्यकता असलेल्या कंपनी तसेच एजंसीसोबत ईमेलद्वारे संपर्क करू शकतात.

किंवा आपल्याच राहत्या शहरात असलेल्या एखाद्या कंपनीत घरबसल्या डेटा एण्ट्रीचे काम प्राप्त होईल का याची विचारपुस करू शकतात.आणि त्यांच्यासाठी देखील डेटा एण्ट्रीचे काम करू शकतात.

आज डेटा एण्ट्रीच्या कँपच्या एण्ट्री वर्क फ्राँम होमच्या नावाखाली जागोजागी फ्राँड पण होत असतात आणि यात गरीब तसेच शिक्षण करून काम करण्याची ईच्छा असलेल्या तसेच घरातील काम करून रिकाम्या वेळात दोन पैसे कमविण्यासाठी डेटा एण्ट्रीचे काम शोधत असलेल्या महाविद्यालयीन मुलामुलींना तसेच घरगृहिणींना टार्गेट केले जाते

See also  List of rivers of India - भारत नद्यांची नावे

 अशा फ्राँड बनावट कंपनी तसेच वेबसाईटपासुन आपण नेहमी सावध राहायला हवे.

9) प्राँपर्टी एजंट :

दुर बाहेरगावी राहत असलेल्या लोक ज्यांना आपल्या शहरात प्राँपर्टी खरेदी करायची असेल अशा लोकांना घर जमीन प्लाँट अशा विविध प्राँपर्टी मिळवून देण्याचे प्राँपर्टी एजंटचे काम करून देखील घरगृहिणी आज चांगल्या कमिशनची कमाई करू शकतात.

फक्त यासाठी आपल्याला प्राँपर्टी डिलिंगचे चांगले नाँलेज असणे गरजेचे असते.

10)इंशुरन्स एजंट :

ज्या महिलांना इंशुरन्सचे चांगले नाँलेज आहे त्या घरबसल्या लोकांना इंशुरन्स मिळवून देण्याचे काम करू शकतात.आणि त्यात इंशुरन्स पाँलिसी एजंट म्हणुन चांगले कमिशन प्राप्त करू मिळवू शकतात.

यात आपल्याला इंशुरन्स काढत असलेल्या व्यक्तीच्या इंशुरन्समधून कायमचे एक फिक्स कमिशन देखील प्राप्त होत असते.म्हणुन कित्येक महिला तसेच पुरुष देखील पँसिव्ह इन्कमसाठी इंशूरन्स एजंटचे काम करत असतात.म्हणुन पँसिव्ह इन्कमसाठी इंशुरस एजंट बनणे हे देखील एक चांगले करिअर आँप्शन आहे.

11) अँस्ट्रोलाँजर आणि ट्रँरो रीडींग :

ज्या महिलांना ज्योतिष शास्त्रात चांगली रूची आहे अशा महिला अँस्ट्रोलाँजरचे टँरो रीडींगचे काम देखील करू शकत.

यात आपण लोकांचे भविष्य सांगुन चांगली कमाई करू शकतात.यात आपण आँनलाईन पण काम करू शकतात आणि आँफलाईन देखील.

आज डिजीटल टेक्नालाँजीचा वापर करून आँनलाईन देखील ही सर्विस लोकांना घरबसल्या देऊ शकतो.

अशा पदधतीने आज आपण घरगृहिणींना रिकाम्या वेळात देखील घरबसल्या करता येईल अशा काही उत्तम 10 व्यवसाय तसेच उद्योगांविषयी सविस्तरपणे जाणुन घेतले आहे.

1 thought on “घर गृहिणींसाठी करिअरचे 10 उत्तम पर्याय  – Career Options For Housewives Marathi”

Leave a Comment